लग्नाआधी प्री वेडिंग शूट करण्याचा आता ट्रेंड आहे. वेगवेगळ्या थीमनुसार प्री वेंडिग शूट केले जाते. रोमँटिक, पॅशनेट लव्ह, टुरिस्ट, सोलमेट अशा काही थीम यामध्ये ठरवल्या जातात. फोटो चांगले काढणे हे फोटोग्राफरचे काम असले तरीदेखील या शूटसाठी नेमके कोणत्या प्रकारचे कपडे निवडायचे हा अनेकांना कायम प्रश्न पडतो. कपड्यांची निवड करण्याआधी अनेक जण आधी झालेले प्री वेडिंग शूट पाहतात. त्यावरुन कपड्यांनी निवड करताना अनेकदा आपल्याकडून काही चुका होतात आणि मग शूटच्यावेळी ते कपडे फार चांगले वाटत नाही असे वाटू लागते. प्री वेडिंग शूटसाठी कमीत कमी खर्च करुन तुम्हाला रिच लुक हवा असेल तर तुम्ही या काही साध्या सोप्या कपड्यांची निवड करा.
वेडिंग सीझनमध्ये बॅकलेस ब्लाऊज किंवा चोळी घालण्याआधी घ्या ही काळजी
साडी ही प्री वेडिंग शूटचा भाग नसते. असे मुळीच होऊ शकत नाही. तुम्ही अगदी कोणत्याही कल्चरमधील असलात तरी देखील साडी ही नेसलीच जाते. पण या शूटसाठी तुमची डिझायर किंवा सुंदर काठाची साडी काहीही उपयोगाची नसते.कारण या फोटोमध्ये तुमची साडी किती सुंदर आहे या पेक्षा तुम्ही त्यामध्ये किती चांगले दिसता हे पाहिले जाते. त्यामुळे प्लेन रंगाची कोणतीही साडी यामध्ये चांगली दिसते. तुमच्या शूटमध्ये साडी असेल तर तुम्ही अगदी हमखास छान ब्राईट रंगाची जॉर्जेट किंवा जिचा फॉल चांगला पडेल अशी साडी घ्या. कारण अशा साडी तुम्हाला चांगल्या दिसतील.
वेस्टर्न आऊटफिटवर फोटो काढण्याचाही एक ट्रेंड आहे. आता अनेकांना वेस्टर्न आऊटफिट निवडताना फार छोटे आणि शरीर दाखवणारे कपडे आवडत नाहीत. कारण सगळेच वेस्टर्न आऊटफिटला शोभतील असे फिट अँड फाईन नसतात. कारण अनेकदा वेस्टर्न कपडे शरीराला घट्ट बसणारे असतात. त्यामुळे होते असे की, फोटोमधील पोश्चर किंवा आत्मविश्वास म्हणावा तितका उठून दिसत नाही. जर तुम्हाला फार तोकडे कपडे नको असतील तर तुम्ही फुल गाऊन, पार्टी गाऊन असे कपडे देखील शूटसाठी निवडू शकता. कारण अशा लांब गाऊनमध्ये तुमच्या कपड्यांसोबत बरेच काही करता येते. ज्यामुळे तुमच्या शरीरापेक्षा त्याकडे अधिक लक्ष जाते.
घरात लग्नकार्य आहे, मग मुंबईतील हे 'वेडिंग प्लॅनर्स' तुमच्यासाठी आहेत बेस्ट
इंडो- वेस्टर्न कपडे हे हल्ली ट्रेंडमध्ये आहेत. मुलांनाही अशा प्रकारचे कपडे मिळतात. इंडो-वेस्टर्न ड्रेस हे बहुतेकदा कॉटन किंवा सिल्क मटेरिअलमध्ये येतात. ते तुम्हाला हव्या तेवढ्या लांबीचे असतात. या आऊटफिटवर तुमच्या जोडीदाराला अगदी कोणतेही कपडे निवडता येतात. त्यामुळे इंडो-वेस्टर्न आऊटफिट हा त्यावर एकदम योग्य पर्याय आहे. असे कपडे तुम्हाला इतरवेळीही घालता येतात. वरील प्रकारातील 3 कपडे तुमच्याकडे नक्की असायला हवे.
आता प्री वेडिंग शूटसाठी भारंभार कपडे घेण्यापेक्षा योग्य आणि चांगल्या कपड्यांची निवड करा.