केस हा खरं तर प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. ज्यांचे केस सरळ असतात त्यांना कुरळे केस आवडतात तर कुरळे असणाऱ्यांना केस सरळ करून घ्यायचे असतात. आता तर या दोन्हीसाठी अनेक उपाय आहेत आणि आपण घरच्या घरीही कोणत्याही हिटशिवाय नैसर्गिकरित्या केसांना कर्ल (natural curl hair in marathi) करू शकतो. आता त्यासाठी सतत पार्लरच्या फेऱ्या मारण्याची अजिबातच आवश्यकता नाही. त्यासाठी आपल्याला काही बेसिक माहिती जाणून घ्यायची गरज आहे. अर्थात केस कसे कर्ल करायचे याच्या पद्धती आणि स्टेप्स जाणून घेतल्या की घरच्या घरीही तुम्हाला केस कर्ल करणं अर्थात कुरळे करून घेणं सोपं होतं. बऱ्याच जणांना पार्टीला जाण्यासाठी अथवा काही ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळी हेअरस्टाईल करावीशी वाटते. प्रत्येकवेळी पार्लरला जाणं शक्य नसतं. शिवाय केसांना सतत कर्लर फिरवून त्रास देणंही नको वाटतं. अशावेळी नक्की काय करायचं आणि केसांना कसे कर्ल (curl on hair in marathi) काढू शकतो ते आपण या लेखातून पाहणार आहोत. आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत. तुम्ही त्यानुसार तुमच्या केसांना कर्ल करून घ्या.
स्क्रंचिंग (Scrunching)
तुमच्या केसांचे टेक्स्चर कसे आहे यावर तुमच्या केसांना नैसर्गिकरित्या तुम्ही कसे कर्ल करू शकता हे अवलंबून असते. पण स्क्रंचिंगमुळे तुमच्या केसांना नैसर्गिकरित्या चांगला कुरळेपणा तुम्हाला देता येतो आणि महत्त्वाचं म्हणजे ही सर्वात सोपी आणि केसांना लवकर कुरळे करण्याची पद्धत आहे.
तुम्हाला काय लागेल
- कर्ल करण्यासाठी मूस अथवा जेल
- व्हॉल्युमिंग शँपू
- टॉवेल
- हेअर जेल अथवा इतर कोणतेही उत्पादन जे केस कुरळे ठेऊ शकेल
पद्धत
- व्हॉल्युमिंग शँपूने तुम्ही तुमचे केस धुवा आणि त्यावर कंडिशनरदेखील लावा
- कंडिशनर हे केवळ तुम्ही तुमच्या केसाच्या खालच्या भागाला लावा. कारण खालच्या केसांचा कुरळेपणा लगेच निघून जातो
- त्यानंंतर व्यवस्थित केस धुऊन घ्या
- टॉवेलने केसातील पाणी पुसा. केस पुसताना खसाखसा चोळले जाणार नाहीत याची काळजी घ्या. खसाखसा चोळण्यापेक्षा त्यातील अधिक पाणी काढून टाका
- त्यानंतर हातावर जेल घ्या आणि त्याने तुम्ही मागच्या दिशेने केसांना लावायला सुरूवात करा. जेल लावता लावता तुम्ही तुमचे केस स्क्रंच करा आणि केस फ्रिजी होणार नाहीत अशा तऱ्हेने क्रंबल करा
- तुमच्या मुळापर्यंत मात्र कोणतेही जेल अथवा उत्पादन लाऊ नका. त्यामुळे केस खराब होतील. स्क्रंचिंग करून झाल्यावर केस सुकायची वाट पाहा. केस सुकल्यानंतर छान कुरळे दिसतील
DIY: प्रत्येक कार्यक्रमासाठी करा 31 सोप्या हेअरस्टाईल्स (Simple Hairstyle In Marathi)
2 पिन कर्ल्स (2 Pin Curls)
Shutterstock
ही क्लासिक स्टाईल कधीही आऊट ऑफ फॅशन होत नाही. तसंच कोणत्याही हिटशिवाय केसाना कर्ल देण्यासाठी ही अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्हाला फक्त रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या केसांना पिनअप करायचं आहे आणि सकाळी सुंदर कुरळे केस तुम्हाला दिसतील.
तुम्हाला काय लागेल
- टॉवेल
- मोठ्या दातांची फणी
- हेअर जेल
- हेअर पिन्स
- कॉटन स्कार्फ
- हेअर स्प्रे
पद्धत
- व्हॉल्युमिंग शँपूने तुम्ही तुमचे केस धुवा आणि त्यावर कंडिशनरदेखील लावा. मोठ्या दाताच्या फणीने तुम्ही कंडिशनर लावलेले असेल तेव्हा केस विंचरून घ्या. त्यामुळे केसांना चांगला व्हॉल्युम येईल
- अतिशय हळूवारपणे तुम्ही तुमचे केस टॉवेलने पुसा. अजिबात खसाखसा चोळू नका
- त्यावर हेअर जेल लावा
- तुमच्या केसांचा क्राऊन बनवा आणि त्याची एक पोनी बांधा
- त्यानंतर तुम्ही बाजूचे केस घेऊन एक एक इंचाचा भाग करा आणि तुमच्या बोटाने व्यवस्थित रोल करून ते पिन अप करा
- तुमच्या केसांच्या वरच्या बाजूला हे केस रोल करून घेऊन ये आणि तुमच्या चेहऱ्याच्या वरच्या दिशेला हे रोल केले जातील याची काळजी घ्या
- तसंच तुम्ही ज्या पिन्स केसांना लावणार आहात त्यांनी तुमच्या केसांना त्रास होणार नाही आणि केस ओढले जाणार नाहीत याची काळजी घ्या. तुम्ही खालचे केस पिन अप केलेत की क्राऊन सोडून त्याचे रोल्स करा
- रात्रभर कॉटन स्कार्फने हे व्यवस्थित झाका आणि जोपा. तुमच्या केसांचे मॉईस्चर स्कार्फ व्यवस्थित शोषून घेईल त्यामुळे डोकेदुखीचा त्रास होणार नाही
- सकाळी उठल्यावर या सर्व पिन्स काढा आणि केस व्यवस्थित सुकू द्या. यावर ब्लो ड्रायर वापरू नका अन्यथा तुमचे कर्ल्स खराब होतील
- तुम्ही पिन्स काढल्या की फक्त मोठ्या दाताच्या कंगव्याने तुम्ही व्यवस्थित केस हळूवारपणे विंचरून घ्या आणि त्यावर एकदा हेअरस्प्रे मारा जेणेकरून तुमचे केस बराच वेळ कुरळे राहतील
लग्नसमारंभात किंवा खास कार्यक्रमांसाठी घरीच करा अशी ‘अंबाडा’ हेअरस्टाईल
ब्रेडिंग अर्थात वेणी (Braiding)
Shutterstock
तुम्हाला जर उत्तम व्हेव्ज केसांमध्ये हवे असतील तर वेणी अर्थात ब्रेडिंग हा उत्तम पर्याय आहे. तुमचे केस कुरळे करण्याचा हादेखील एक सोपा उपाय आहे. कोणत्याही प्रकारची केसांना हिट न देता तुम्ही सोप्या पद्धतीने अर्थात नैसर्गिक पद्धतीने केस कुरळे करून घेऊ शकता.
तुम्हाला काय लागेल
- 2 हेअर टाईज (बो)
- हेअर स्प्रे अथवा हेअर जेल
पद्धत
- तुमचे केस धुवा आणि साधारण 70 टक्के केस सुकेपर्यंत वाट पाहा
- केसांचे दोन भाग पाडा अर्थात मध्ये भांग पाडा आणि एका बाजूची वेणी घाला
- दोन्ही बाजूंनी अगदी शेवटापर्यंत वेणी घाला
- नियमित वेणी घालण्याऐवजी खजूर वेणी अथवा फ्रेंच वेणी घाला जेणेकरून तुम्हाला केसांना अधिक चांगला कुरळेपणा देता येईल
- वेणी घट्ट असेल याची काळजी घ्या. वेणी सैलसर राहिल्यास, कुरळेपणा येणार नाही
- तुमचे केस पूर्ण सुकत नाहीत तोपर्यंत वेणी तशीच ठेवा. हवं तर रात्री वेणी घाला आणि सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्ही
- केस सोडाल तेव्हा तुमच्या केसांना कुरळेपणा आलेला दिसून येईल
- तुमच्या केसातून बोटं फिरा आणि मग हेअरस्प्रे मारून ते सेट करा
केस तुटण्यावरील उपाय (Remedies Of Hair Breakage In Marathi)
वेलक्रो रोलर्स (Velcro Rollers)
Shutterstock
हिटशिवाय केसांना कर्ल करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. आपण नेहमी हिरॉईन्सच्या केसांना पूर्वीपासून वेलक्रो रोलर्स लावलेले पाहिले आहेत. तुमच्या केसांना यामुळे चांगला व्हॉल्युम मिळतो. तसंच अगदी केस लहान असोत वा मोठे दोन्ही केसांना व्यवस्थित कुरळेपणा यामुळे देता येतो.
तुम्हाला काय लागेल
- टॉवेल
- वेलक्रो रोलर्स
- फणी
- हेअर स्प्रे
पद्धत
- व्हॉल्युमिंग शँपूने केस धुवा आणि त्यावर स्प्रे बॉटलचा वापर करा
- टॉवेलने तुमच्या केसांतील अधिक पाणी काढून टाका आणि पुसून घ्या
- तुमचे केस जाण असतील तर तुम्ही केस वरच्या बाजूने रोल करा
- तुम्ही केसांना व्यवस्थित वरच्या बाजून रोल करून वेलक्रो रोलर्स लावा. काही तास हे असंच ठेवा. तोपर्यंत तुम्ही तुमचा
- मेकअप आणि इतर कपडे बदलणं वगैरे करून घ्या. तोपर्यंत केस सुकतील आणि केस व्यवस्थित कर्लही होतील
- वेलक्रो रोलर्स काढल्यानंतर तुम्ही त्यावर हेअरस्प्रे मारून केस व्यवस्थित सेट करा
बंतू नॉट्स (Bantu Knots)
Shutterstock
या पद्धतीने तुम्हाला अगदी घनदाट कुरळ्या केसांचा फील घेता येतो. तुम्हाला तुमचे केस अधिक कुरळे दिसायला हवे असतील तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता. तुम्हाला कोणत्याही कर्लरची त्यासाठी गरज भासणार नाही.
तुम्हाला काय लागेल
- टॉवेल
- बॉबी पिन्स
- शॉवर कॅप
- हेअर जेल
- हेअर स्प्रे
पद्धत
- केस धुवा आणि कंडिशन करून घ्या
- तुमचे केस साधारण 80% सुकले की त्यानंतर तुमच्या केसांच्या अगदी छोट्या छोट्या वेण्या घाला. या वेण्या घट्ट असायला हव्या. अजिबात सैलसर ठेऊ नका
- एखाद्या दोरीप्रमाणे तुम्ही या केसांच्या बटा घेऊन घट्ट वेण्या बांधा
- त्या वेणी बॉबी पिन्स लाऊन व्यवस्थित टाईट ठेवण्याचा प्रयत्न करा
- त्या नॉट्सप्रमाणे दिसत नाहीत तोपर्यंत केस तसेच राहू द्या
- सकाळी तुम्ही आंघोळ करताना शॉवर कॅप घालूनच आंघोळ करा आणि तुमचे केस तसेच सुकू द्या
- त्यानंतर एक एक वेणी सोडा आणि मग केस फणीने न विंचरता तुमच्या बोटांनी केस विंचरा
- हेअरस्प्रे मारून केस सेट करा
वाचा – घरी केस कर्ल करण्याआधी या ‘8’ टीप्स अवश्य
पेपर टॉवेल मेथड (Paper Towel Method)
रोलर्स तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही टिश्यू पेपरचा वापर करून केसांना कर्ल करू शकता. तुम्हाला नैसर्गिक कुरळे केस बनविण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो
तुम्हाला काय लागेल
- टॉवेल
- पेपर टॉवेल रोल
- हेअरस्प्रे
पद्धत
- केस धुवा आणि कंडिशन करून घ्या आणि त्यातील अधिक पाणी टॉवेलने काढून साफ करा. केस हलक्या हाताने पुसा
- त्यानंतर पेपर टॉवेल फोल्ड करा आणि तुमच्या केसांना मध्ये अथवा शेवटी ते रोल करून लावा
- तुमचे केस वरच्या बाजून रोल करून ते पेपर रोल लावा
- वेगवेगळे केसांचे सेक्शन्स करून लावा जेणेकरून सर्व बाजूंनी केस कुरळे होतील
- रात्री झोपताना या पेपर टॉवेलसहच झोपा
- सकाळी उठल्यानंतर हे काढून टाका आणि बोटांनी केस विंचरा
- हेअरस्प्रे मारून केस सेट करा
सॉक मेथड (Sock Method)
तुमचे केस मोठे असतील तर तुम्हाला केस नैसर्गिकरित्या कुरळे करण्यसाठी सॉक पद्धत उत्तम ठरेल. तसंच तुमचे केस कुरळे झाल्यास सुंदर दिसतील.
तुम्हाला काय लागेल
- हेअर टाय
- बॉबी पिन्स
- सॉक
- कात्री
- हेअरस्प्रे
पद्धत
- स्प्रे बॉटलने तुमचे केस नीट स्वछ करून घ्या
- केसातील अधिक पाणी टॉवेलने साफ करा आणि साधारण 80% सुकेपर्यंत वाट पाहा
- त्यानंतर तुमचे केस वर घेऊन घट्ट पोनीटेल बांधा
- त्यानंतर कात्रीने सॉक डोनट शेपमध्ये कामा आणि केसांवर रोल करून घ्या
- तुमचे केस त्या सॉकच्या भोकातून बाहेर काढून घ्या
- त्यानंतर सॉकभोवती ते गुंडाळा आणि रोल करून वरच्या बाजूला न्या
- त्याला बॉबी पिन्स लावा
- जेव्हा केस व्यवस्थित सुकतील तेव्हा साधारण 5-6 तासाने बॉबी पिन्स आणि सॉक काढून टाका
- बोटांनी केस विंचरा
- हेअरस्प्रे मारून केस सेट करा
हेडबँड मेथड (Headband Method)
तुम्हाला केसांचा व्हॉल्युम परफेक्ट हवा असेल तर ही हेडबँड पद्धत खूपच चांगली आहे. तुम्हाला व्हेवी कर्ल्स यामुळे मिळतील.
तुम्हाला काय लागेल
- हेडबँड
- ब्लो ड्रायर (हवा असल्यास)
- सी सॉल्ट स्प्रे
पद्धत
- तुमच्या डोक्याला व्यवस्थित हेडबँड फिट करून घ्या
- त्यानंतर हेडबँडच्या आतमध्ये केस वळवून खोचत जा
- तुमचे केस आतमध्ये वळवून झाले की व्यवस्थित पिन लाऊन घ्या
- तुमचे केस व्यवस्थित सुकले की तुम्ही पिन्स काढून टाका
- तुमच्या बोटांनी केस व्यवस्थित करून घ्या आणि मग त्यावर सी सॉल्ट स्प्रे मारून केस सेट करा
ट्विस्ट बर्न्स (Twist Burns)
तुम्हाला लवकरात लवकर कर्ल्स हवे असतील तर ट्विस्ट बर्न्स हा सर्वात सोपा उपाय आहे.
तुम्हाला काय लागेल
- 2 हेअर टाईज
- सी सॉल्ट स्प्रे
पद्धत
- तुमचे केस स्प्रे बॉटलने धुऊन घ्या. केसांना चांगला व्हॉल्युम देण्यासाठी ही कल्पना चांगली आहे
- तुम्ही तुमच्या केसांचा दोन भाग पाडा
- एक भाग घेऊन तो दोरीसारखा ट्विस्ट करून वर बांधा नंतर दुसरा भाग तसाच करा
- त्यानंतर पोनीटेलने बांधा
- त्यानंतर रात्री झोपा आणि मग सकाळी केस सोडून व्यवस्थित बोटांनी केस विंचरा
- सी सॉल्ट स्प्रे ने केस सेट करा आणि स्क्रंच करून व्हॉल्युम सेट करा
प्रश्नोत्तरे (FAQs)
हिटशिवाय लवकरात लवकर केस कसे कर्ल करू शकता?
केस कर्ल करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकवेळी हिटची अर्थात कर्लरची वा आयर्नची गरज नाही. त्यासाठी तुम्ही वरील वेगवेगळ्या पद्धतीने केस कुरळे करून घेऊ शकता. तुम्हाला केस ओले करून त्याची घट्ट वेणी घालूनही केस कुरळे करून घेता येतात.
एका रात्रीत नैसर्गिकरित्या केस कसे कुरळे करता येतील?
केस धुऊन तुम्ही रात्री वेगवेगळ्या पद्धतीने केस बांधून ठेऊन नैसर्गिकरित्या केस हिटशिवाय कुरळे करून घेऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी काही वेळातही नैसर्गिकरित्या केस कुरळे करून घेऊ शकता. त्यासाठी फक्त वर दिलेल्या पद्धतीने तुम्ही केसांना ट्रिट करा.
हिटलेस कर्ल तुम्ही 5 मिनिट्समध्ये कसे करू शकता?
केसांना तुम्ही घट्ट वेणी घालून पिन अप्स करून 5 मिनिट्समध्ये कर्ल करून घेऊ शकता. तुम्हाला त्यासाठी जास्त त्रासही सहन करावा लागत नाही.