वाईट स्वप्न पडणे हे चांगले लक्षण मानले जात नाही. कारण आपल्याकडे याचा सबंध थेट भविष्यात घडणाऱ्या अशुभ घटनांचा संकेताशी जोडला जातो. वाईट स्वप्न काय सांगतात, काय संकेत देतात यापेक्षा वाईट स्वप्न पडणे तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी चांगले नाही हे वेळीच ओळखा. वाईट स्वप्न (Bad dreams) पडत असतील तर त्यावर लवकर उपाय करा. ज्यामुळे तुमची या वाईट स्वप्नांपासून लवकर सुटका होईल. यासाठी जाणून घ्या वाईट स्वप्न उपाय करावेत.
ताणतणावापासून दूर राहा आणि मन शांत ठेवा (Avoid Stress And Keep Your Mind Calm)
मनातील ताणतणाव, भावनांचा कल्लोळ यांचा तुमच्या शारीरिक अवस्थेवर परिणाम होत असतो. जर तुम्ही सतत दुःखी, निराश, उदासीन असाल तर तुमचे मनात त्याच भावना निर्माण होत राहतात. झोपताना तुम्ही जे विचार करता त्यानुसार तुम्हाला स्वप्न पडू शकतात. त्यामुळे तुमच्या वाईट स्वप्न पडण्याचा तुमच्या मानसिक अवस्थेशी गाढ संबध असतो. यासाठी अशा भीतीदायक, वाईट स्वप्नांपासून दूर राहण्यासाठी ताणतणावापासून दूर राहा आणि मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही काय खात – पित आहात यावर बारकाईने लक्ष द्या (Pay Attention To Your Eating And Drinking Habits)
तुम्ही संध्याकाळी अथवा रात्री काय खाता अथवा पिता याचाही सबंध तुमच्या वाईट स्वप्नांशी असू शकतो. कारण जर तुम्ही संध्याकाळी अथवा रात्री कॅफेनयुक्त पदार्थ, मद्यपान अशा गोष्टी घेत असाल तर यामुळे तुमचा मेंदूला उत्तेजना मिळते. याचाच परिणाम तुम्हाला रात्री शांत झोप येत नाही आणि वाईट स्वप्न पडू शकतात. यासाठीच संध्याकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी हलका आणि पचेल असा आहार घ्या. ज्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल आणि वाईट स्वप्नांपासून सुटका मिळेल.
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ करा (Take Warm Bath Before Going To Bed)
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ केल्यामुळे तुमच्या शरीरातील सर्व अवयव आणि त्वचापेशी रिलॅक्स होतात. शरीराचे तापमान नियंत्रित होते आणि तुमच्या मेंदूला झोपण्याचे संकेत मिळतात. यासाठी झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी अंघोळ करणं गरजेचं आहे. रात्री झोपेसाठी पोहणे फायदेशीर आहे आणि ज्यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागेल आणि वाईट स्वप्न पडणं बंद होईल.
झोपेचे वेळापत्रक जाणिवपूर्वक पाळा (Follow Sleep Schedule Consciously)
प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीत असं सांगण्यात आलं आहे की, “लवकर निजे आणि लवकर उठे त्याला आरोग्यसंपदा लाभे” पण कामाचा ताण, जीवनशैलीतील चुकीचे बदल, उशीरापर्यंत जागं राहणं यामुळे लवकर झोपण्याची सवय आपल्याला नसते. मात्र रात्री झोपण्याचं आणि सकाळी उठण्याचं एक ठराविक वेळापत्रक पाळलं तर वेळेत झोप येणं नक्कीच शक्य आहे. जर तुम्हाला उशीरापर्यंत झोप येत नसेल आणि रात्री वाईट स्वप्न पडत असतील तर झोपेचे वेळापत्रक जरूर पाळा. याचा तुम्हाला चांगला फायदा नक्कीच होऊ शकतो.
Shutterstock
झोपण्यापूर्वी एक तास आधी मोबाईल फोन दूर ठेवा (Put Your Phone Away Before Sleeping)
मोबाईल हा सध्या सर्वांचा श्वासच झाला आहे. त्यामुळे सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हातात सतत मोबाईल फोन असतोच. जर तुम्हाला रात्री वाईट स्वप्न पडत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी मोबाईल फोन वापरणे बंद करा. कारण मोबाईलच्या ब्लू लाईटमुळे तुमच्या डोळ्यांवर ताण येतो आणि तुम्हाला झोप येत नाही. मोबाईलवर जगातील अनेक गोष्टींच्या घडामोडी दिसत असतात. जर झोपण्याआधी तुम्ही मोबाईवर काही वाईट गोष्टी पाहिल्या तर तुमच्या स्वप्नांवर त्याचा परिणाम होतो. यामुळे देखील तुम्हाला रात्री वाईट स्वप्न पडण्याची शक्यता असते.
खोलीत नाईट लाईट सुरू ठेवा (Keep The Night Light On In The Room)
बऱ्याच लोकांना खोलीत पूर्ण अंधार करून झोपण्याची सवय असते. रात्रीच्या अपूऱ्या उजेडामध्ये आपल्या शरीराचा काही भाग बघून भूता-खेताची भीती वाटू लागते. याच भीतीमुळे मग झोपेत वाईट स्वप्न पडतात. यासाठीच रात्री झोपताना खोलीत मंद प्रकाश देणारा दिवा सुरू ठेवा.
तुमच्या स्वप्नांविषयी मोकळेपणे बोला (Speak Freely About Your Dreams)
तुम्हाला जर सतत वाईट स्वप्न पडत असतील तर तुम्ही त्याबद्दल एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोलायला हवं. कारण तुम्हाला समजून घेणारी व्यक्ती याबाबत तुम्हाला चांगले मार्गदर्शन करू शकते. कधी कधी स्वप्नांचा सबंध तुमच्या मनातील ताणतणावाशी असू शकतो. एखाद्याशी याबाबत मनमोकळेपणाने बोलण्यामुळे तुमच्या मनातील ताण कमी होऊन तुम्हाला वाईट स्वप्न पडण्याचे बंद होऊ शकते.
Shutterstock
नियमित व्यायाम करा विशेषतः अॅरोबिक्स व्यायाम (Regularly Exercise Especially Aerobics)
जर तुम्ही बैठ्या स्वरूपाची कामे करत असाल तर तुमच्या शरीराला रिलॅक्स होण्यासाठी शारीरिक हालचालीची गरज असते. व्यायाम विशेषतः चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवणे, नाचणे, उड्या मारणे असे अॅरोबिक्स व्यायाम केल्यामुळे तुमचे शरीर रिलॅक्स होते आणि तुम्हाला शांत झोप लागते. नृत्य, धावणे आणि सायकल चालवण्याचे फायदेशीर आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील तर व्यायामाची सवय लावा. ज्यामुळे तुमच्या झोपेचे चक्र सुधारण्यास मदत होईल.
मेडिटेशन आणि योगा करा (Do Meditation And Yoga)
शरीर आणि मन यांना आराम आणि आरोग्यस्वास्थ देणारा सर्वात चांगला प्रकार म्हणजे योगासने आणि ध्यानधारणा. कारण या दोन्ही मुळे तुमचे मन शांत आणि निवांत होते. मनातील ताण कमी करण्यासाठी, शांत झोप लागण्यासाठी आणि वाईट स्वप्न कमी करण्यासाठी तुम्हाला योगासने आणि मेडिटेशनचा नक्कीच चांगला फायदा होऊ सकतो.
Shutterstock
मानसोपचार तज्ञ्जांची मदत घ्या (Seek Psychiatrist Help)
मन हा एक अती चंचल आणि हाती न येणारा प्रकार आहे. त्यामुळे तुमच्या मनातील गुंता सोडवण्यासाठी तज्ञ्जांची मदत घेणे नक्कीच फायद्याचे ठरू शकते. जर तुम्हाला सतत वाईट स्वप्न पडत असतील तर मानसोपचार तज्ञ्ज तुम्हाला चांगली मदत करू शकतात. त्यामुळे ही एक लहान गोष्ट समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच तज्ञ्जांची मदत घ्या.
वाईट स्वप्नांबाबत मनात येणारे प्रश्न – FAQ’s
1. वाईट स्वप्न काय सांगतात ?
आपल्याकडे वाईट स्वप्नांचा सबंध भविष्यातील घटनांशी जोडला जातो. मात्र वाईट स्वप्न पडणे यामागे तुमच्या मनाची अवस्था कारणीभूत असते. जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील तर यामागे तुमच्या मनातील ताण, चिंता, काळजी असू शकते.
2. अन्नामुळे वाईट स्वप्न पडू शकतात का ?
आपण जे खातो त्याचा परिणाम शरीर आणि पर्यायाने आपल्या मनावर होत असतो. जर तुम्ही संध्याकाळी अथवा रात्री तेलकट, तूपकट, तिखट, खारट असे पचायला जड पदार्थ खाल्ले अथवा कॉफी, चहा, मद्यपानासारखे मनाला उत्तेजित करणारे पेय घेतले तर त्याचा परिणाम तुमच्या शरीर आणि मनावर होतो आणि तुम्हाला शांत झोप येत नाही. ज्यामुळे तुम्हाला वाईट स्वप्न पडू शकतात.
3. वाईट स्वप्नांमुळे मृत्यू येऊ शकतो का ?
वाईट स्वप्नामुळे तुमच्या ह्रदयावर नक्कीच परिणाम होऊ शकतो. स्वप्न जरी खोटी असली तरी झोपेत तुम्ही ती प्रत्यक्ष अनुभवत असता. ज्यामुळे तुम्हाला घाम फुटतो, ह्रदयाची धडधड वाढते, अंग थंड पडते अशा स्थितीत ह्रदयावर परिणाम झाल्यास असे घडण्याची शक्यता असू शकते. मात्र असे सतत घडत असेल तरच जर तुम्हाला कधीतरीच अशी स्वप्न पडत असतील तर इतका गंभीर परिणाम होत नाही. यासाठीच वेळीच तज्ञ्जांची मदत घेणे फायद्याचे ठरेल.