हल्ली बिल्डींग आणि अपार्टमेंट या ठिकाणी कबुतरांचा वावर हा अधिक दिसतो. कबुतर हा असा पक्षी आहे ज्याला झाडावर राहण्याऐवजी अडगळ किंवा एखाद्या कोपऱ्यात राहायला खूप जास्त आवडते. त्यामुळे एखादे घर जर जास्त वेळासाठी बंद राहिले तर नक्कीच खिडक्यांमध्ये किवा एखाद्या सामानांमध्ये कबुतर दिसतात. कबुतराचा आवाज आणि त्यांनी केलेली घाण ही आरोग्यासाठीही हानिकारक असते. जर तुमच्या घरातही कबुतरांचा त्रास असेल. घरात सतत कबुतर येत असतील तर काही गोष्टींची काळजी तुम्ही नक्कीच घ्यायला हवी. जाणून घेऊया कबुतरांचा त्रास कमी होण्यासाठी नेमके काय करावे.
अडगळ करा कमी
खूप जणांना सामान खिडकीत ठेवायची सवय असते. त्यामुळे होते असे की त्या अडगळीमध्ये कबुतरांना राहण्यासाठी जागा मिळते. कबुतरांचा मेटिंगचा काळ हा वर्षभर असतो. त्यामुळे ते वर्षभरात अंडी घालत असतात. त्यांनी एकदा का अंडी घातली की, ते त्या अडगळीतून अजिबात कुठेही जायला बघत नाही. त्यातच त्यांना जर पिल्लं झाली तर ते अधिक घाण करतात. त्यामुळे खिडकीत पडून राहील असे सामान अजिबात ठेवू नका. लगेचच खिडकी स्वच्छ करा.म्हणजे तिथे कबुतरांचा त्रास होणार नाही.
फ्लोअर क्लिन्झर स्प्रे
हल्ली बाजारात अनेक सुगंधी फ्लोअर क्लिन्झर मिळतात. या क्लिन्झरचा उपयोग करुनही तुम्हाला कबुतरांना घालवता येईल. कबुतरांनी घाण केली असेल किंवा सतत येऊन बसत असतील तर तुम्ही पाण्यामध्ये असे लिक्विड घालून ते कबुतरांवर स्प्रे करा. त्यामुळे कबुतर जाण्यास नक्कीच मदत होईल. काही काळासाठी ते जातील पण ते पुन्हा परतल्यानंतर त्यांच्यावर हा स्प्रे मारा कारण कबुतर पुन्हा पुन्हा येतात. त्यांची ती सवय मोडण्यासाठी आधीच काळजी घेणे फार उत्तम
मिरचीचा ठेचा
खूप जण अघोरी उपाय करतात. त्यापैकीच एक म्हणजे मिरचीचा ठेचा. मिरची वाटून ती गॅलरीत घातली तर काही काळासाठी कबुतरांचा त्रास कमी होतो. कबुतरांना मिरचीचा त्रास होतो. हा त्रास झाला की, ते लगेचच त्या ठिकाणाहून निघून जातात. त्यामुळे अधून मधून तुम्हाला असे करायला काहीच हरकत नाही. मिरचीचा ठेचा तुम्हाला अघोरी वाटत असेल तर असे अजिबात करु नका
खिडक्यांना लावा बारीक जाळ्या
कबुतरांवर कोणतेही अघोरी उपाय करण्यापेक्षा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे खिडक्यांना बारीक जाळ्या लावणे. हल्ली अनेक बारीक जाळी मिळतात. त्यामुळे कबुतरांना आत येण्याची संधी मिळत नाही. इतकेच नाही तर ते आजुबाजूला भटकतही नाही. त्यामुळे तुम्ही कबुतरांच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी सरळ बारीक जाळी लावून टाका.
आता कबुतरांचा उपद्रव कमी करण्यासाठी नक्कीच हे सोपे उपाय करा.
अधिक वाचा
100+ Best Dog Names In Marathi – युनिक आणि ट्रेडींग कुत्र्यांची नावे मराठीतून
वास्तुशास्त्रानुसार सुख-समृद्धीसाठी घरात असावेत हे पाळीव प्राणी (Pets For Home In Marathi)