ADVERTISEMENT
home / Care
केसांना द्या अशा प्रकारे योग्य Volume…तेदेखील फक्त 20 सेकंदात!

केसांना द्या अशा प्रकारे योग्य Volume…तेदेखील फक्त 20 सेकंदात!

तुमच्या केसांची कोणतीही स्टाईल असो, जाड आणि voluminous केस हे कधीच ‘आउट ऑफ फॅशन’ होत नाहीत. आपल्याला प्रत्येकीलाच आपले केस सुंदर दिसावे असं वाटत असतं. अर्थात 80 च्या दशकातील अति voluminous असणाऱ्या केसांबद्दल आम्ही बोलत नाही. तर घनदाट, चमकदार आणि जाड केसांच्या बाबतीत बोलत आहोत जे पाहून लोक तुमच्याकडे पुन्हा पुन्हा पाहतील. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जर तुमचे केस कोरडे आणि चांगले नसतील तर यांना Volume कसा दिसणार. पण हे नक्कीच घडू शकतं. तुमच्या केसांनाही voluminous केसांचा आभास आपण देऊ शकतो,  तेदेखील तासनतास यावर काम न करता आणि स्टायलिंग न करता. यासाठी तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या म्हणजे –

– व्हर्टिकल ही योग्य दिशा आहे

– योग्य उत्पादनांचा वापर करणं

– केसांना फ्लिप करा

ADVERTISEMENT

कोरड्या केसांना द्या नवा श्वास – ट्राय करा वेगळ्या पद्धती

भांग बदलून पाहा

Shutterstock

तुमचे केस जर कोरडे झाले असतील आणि त्याचा लवकरात लवकर तुम्हाला चांगला परिणाम हवा असेल तर सोपा उपाय आहे. तो म्हणजे तुम्ही नेहमी ज्या ठिकाणी केसांना भांग पाडता, त्याच्या विरूद्ध दिशेला (opposite side) भांग पाडा. तसंच या गोष्टीची काळजी घ्या की, हा भांग तुम्ही अगदी डीप साईड काढायला हवा. यासाठी कंगव्याच्या मदतीने तुम्ही आयब्रोच्या वरील लाईनपासून भांग काढा आणि मागच्या बाजूला diagonally जात मध्यभागी पोहचा.

Teasing करा

ADVERTISEMENT

Shutterstock

तुमचे केस पातळ आणि कोरडे असतील तर, backcombing हा तुमच्या रूटीनचा एक भाग असायला हवा. तुमचे सुकलेले केस तुम्ही डोक्यावर एकत्र घ्या आणि मग कंगव्याच्या मदतीने केसांच्या मुळापासून वर आणि खाली अशा मोशनमध्ये tease करा. त्यानंतर लुक सॉफ्ट आणि नैसर्गिक ठेवण्यासाठी बोटांच्या मदतीने केसांना ब्रश करा.

व्हर्टिकल ही योग्य दिशा आहे

Shutterstock

ADVERTISEMENT

आपल्या कानांवरून केसांचा टॉप सेक्शन घ्या आणि हे सेक्शन दुसऱ्या बाजूने कानावरून वरपर्यंत घेऊन जा. हे सेक्शन वरच्या बाजूने vertically पकडा. आपला blow-dryer फ्लिप करा आणि केसांना वरून पकडून, ट्रायर मुळांच्या वरून फिरवा. जेव्हा केस कुल डाऊन होतील तेव्हा सोडून द्या. अगदी सहज तुम्हाला कमी वेळात अप्रतिम  voluminous केस मिळतील!

Layers तुमची आवश्यकता आहे

Shutterstock

बऱ्याचशा layers सह हेअरकट तुमच्या केसांना खूप वॉल्यूम आणि depth देतं. यामुळे तुमचे केस अतिशय निरोगी आणि चांगले दिसतात. तुम्ही जर बऱ्याच कालावधीपासून केस कापले नसतील तर तुम्ही लवकरच आपल्या हेअरड्रेसरची appointment घ्या. तुमचे केस योग्य असतील तर लक्षात ठेवा की, तुम्ही अतिशय सॉफ्ट लेअर घ्या. जो तुमच्या चेहऱ्याला योग्य फ्रेम करा.

ADVERTISEMENT

योग्य उत्पादनांचा वापर करणं (Choose Right Hair Products)

Shutterstock

जास्त harsh शँपू तुमच्या नैसर्गिक केसांमधील तेल शोषून घेतात. त्यामुळे केस अतिशय फ्लॅट होतात. तुम्हाला नेहमी voliminizing शँपूचा वापर करायला हवा आणि नेहमी कंडिशनरचा वापर करताना लक्षात ठेवायला हवं की, हे केसांच्या एन्ड्सला जास्त लावा. जास्त कंडिशनर लावणं हे तुमच्या केसांचं वजन कमी करू शकतं. जर तुमच्या केसांना मदतीची गरज असेल तर केवळ volimizing mousse चा वापर करणं चालू शकतं. तुम्ही तुमच्या केसांच्या मुळांना Paul Mitchell Extra Body Sculpting Foam चा वापरदेखील करू शकता.

Fuller पोनीटेलचा आभास

ADVERTISEMENT

Shutterstock

तुमचे केस जर चांगले असतील तर तुम्ही पोनीटेल नुसती बांधली तर चांगली दिसत नाही. याची एक साधीसोपी ट्रिक आहे. तुम्ही पोनीटेल दोन लहान horizontal सेक्शन मध्ये विभागा आणि इंस्टेंट बूस्टसाठी टॉप सेक्शनच्या खाली एक मिनी क्लिप लावा. तुमची पोनीटेल जाड आणि fuller दिसेल.

रूट लिफ्टिंग स्प्रे ट्राय करून पाहा

Shutterstock

ADVERTISEMENT

सकाळीच घाईच्या वेळी व्हॉल्युम मिळवण्यासाठी तुम्ही चांगल्या रूट लिफ्टिंग स्प्रे चा वापर करू शकता. केसांचे मूळ आणि क्राऊनवर स्प्रे करण्यासाठी कोणताही चांगला स्प्रे ट्राय करा. स्प्रे केल्यानंतर अधिक perfection साठी केसांमधून बोटांनी ब्रश करा.

केसांना करा फ्लिप

Shutterstock

त्वरीत लिफ्ट मिळवण्यासाठी तुमच्या डोक्याच्या बाजूने फ्लिप करा आणि त्यानंतर मुळांना ब्लो – ड्रायेदेखील करत राहा. असं केल्यामुळे केसांना लिफ्ट करण्यासाठी तुम्हाला gravity ची अधिक मदत मिळेल. जेव्हा केसांचं मूळ व्यवस्थित सुकेल तेव्हा डोक्यावर केस घेऊन या आणि बाकी केस सुकवून घ्या. जेणेकरून केस frizz होण्याची समस्या उद्भवू नये.

ADVERTISEMENT

तुमच्या मदतीसाठी आहेत ड्राय शँपू (Dry Shampoo)

Shutterstock

जेव्हा सर्व काही गोष्टी अपयशी ठरतात आणि तुमचे केस एकदम फ्लॅट होतात, शिवाय तुमच्याकडे केस धुण्यासाठीही वेळ नसतो. अशावेळी केसांसाठी ड्राय शँपूचा वापर करा. तुमच्या केसांना रिफ्रेश करण्यासाठी तुम्ही एक चांगला Big Sexy Hair Volumizing Dry Shampoo वापरू शकता. तसंच तुमच्या केसांमध्ये व्हॉल्युम आणण्यासाठी तुमच्या ब्युटी किटमध्ये एक सिक्रेट टूलदेखील समाविष्ट करून घ्या.

हेदेखील वाचा – 

ADVERTISEMENT

कुरळ्या केसांची स्टाईल करण्यासाठी वापरा 10 सोप्या टीप्स

कोरड्या केसांची काळजी घेणं आता अजून सोपं

केसगळती टाळण्यासाठी करा हे ’10’ घरगुती उपाय

24 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT