पुदिन्याचे अनेक फायदे असतात. पण उन्हाळ्यात पुदिना खाणे अधिक लाभदायक ठरते. पुदिना खाल्ल्याने उन्हाळी लागण्याचा त्रास होत नाही. तसंच तुम्ही अनेक आजारांपासूनही दूर राहाता. याशिवाय पोटासंबंधित त्रासांपासून पुदीना सुटका मिळवून देतो. पुदिन्यामध्ये अधिक प्रमाणात पचनशक्ती असते त्यामुळे पोटाचे विकार लांब राहतात. तसंच तुम्हाला श्वासाच्या दुर्गंधीचा त्रास असेल तर यापासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही पुदीना नियमित चावून खा. यामुळे दुर्गंधीचा त्रास निघून जाण्यास मदत मिळते. याशिवाय तुम्ही पाण्यात पुदीना उकळून त्याने चूळही भरू शकता. यामुळे दातात किटाणू राहात नाहीत. इतके सर्व फायदे असणारा पुदीना तुम्ही बाजारातून आणण्यापेक्षा घरातच उगवू शकता. आपल्या घरात एका कुंडीत तुम्ही पुदीना सहजपणाने उगवू शकाल. संपूर्ण उत्तर भारतामध्ये पुदीना अगदी सहज प्राप्त होतो. तुम्हाला बागकामाची आवड असेल तर तुम्ही घरच्या घरी पुदीना लावा आणि त्याची योग्य पद्धतीने वाढ कराल. जेणेकरून तुम्हाला घरीच त्याच्या ताज्या पानांचा वापर करता येईल. घरात पुदीना कसा लावणार त्याची योग्य पद्धत आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत.
4 ते 6 इंच खोल कंटेनरमध्ये तुम्ही लावा पुदीना
तुम्ही घरीच एखाद्या कंटेनरमध्ये पुदीना लाऊ शकता. यासाठी तुम्हाला साधारण 4 ते 6 इंच खोलीचा आणि थोडा रुंद असा कंटेनर लागेल. हलक्या ओल्या मातीमध्ये पुदीना जास्त चांगल्या पद्धतीने वाढतो. वसंत ऋतूमध्ये पुदीन्याची वाढ होते. त्यामुळे तुम्ही वसंत ऋतूमध्ये याची पेरणी केल्यास तुम्हाला याचा उत्तम परिणाम दिसून येईल. तुम्ही कटिंगद्वारे जर पुदीना उगवणार असाल तर तुम्ही 5 इंच लांब मजबूत असणारे पुदिन्याचे झाड सरळ मातीमध्ये पुरा. त्यानंतर तुम्ही ते कटिंग ग्लासभर पाण्यातही ठेऊ शकता. काही दिवसात याची मुळे पसरायला सुरूवात होईल आणि तुम्हाला एक मस्त पुदिन्याचे झाड घरातील कुंडीत मिळेल.
पुदिन्यासाठी योग्य तापमान
पुदीना जेव्हा तुम्ही उगविण्यासाठी पेरता तेव्हा त्यासाठी योग्य तापमानाचीही आवश्यकता आहे. पुदिन्यासाठी साधारण 15 ते 25 डिग्री सेल्सियस इतके तापमान योग्य आहे. अशा तापमानात पुदिन्याची व्यवस्थित वाढ होते आणि पुदिना कोमेजून जात नाही. त्याची व्यवस्थित काळजी घेता येते. अन्यथा उष्णतेचे पुदिन्याची वाढ नीट होत नाही.
बी चा करा वापर
पुदीना हा बी चा वापर करूनही उगवता येतो. याशिवाय याची तुम्ही कलमांमध्ये वापर करून वाढ करू शकता. बी रूजत घातल्यानंतर साधारण 7 – 15 दिवसांच्या कालावधीत अंकुरित होते आणि पुदीना कापण्याची वेळ ही साधारणतः 40 दिवसांनंतर सुरू होते. अर्थात पुदिन्याची पाने साधारणतः तुम्हाला दोन महिन्यानंतर फुललेली आणि वापरासाठी मिळू शकतात. पण पुदिन्याचे बी लावल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित काळजी घेत तो फुलेपर्यंत सावधानता बाळगावी लागते हे लक्षात ठेवा.
4 ते 6 तास असते उन्हाची गरज
पुदिन्याचे झाड वाढण्यासाठी साधारण 4 ते 6 तास उन्हाची गरज भासते. हे झाड उन्हासह थोड्याशा सावलीतही वाढते. ऊन सावलीच्या खेळात हे झाड व्यवस्थित वाढते. हीच त्याची वाढण्याची योग्य पद्धत आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक