माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहावे असे आपल्याला कायम वाटते. लक्ष्मीची कृपा म्हणजेच पैसा,संपत्ती आपल्याकडे पुरेपूर असावी असे प्रत्येकाला वाटते. पण लक्ष्मी ही चंचल आहे. ती फार काळ कोणाकडे टिकत नाही. विशेषत: तिचा अपमान झाला तर ती जास्त काळ तुमच्याकडे टिकत नाही. सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी असा कालावधी येतो. ज्यावेळी पैशांची चणचण खूप जणांना भासू लागते. त्यातून कधीकधी मार्गही निघतात. 2022 या नव्या वर्षात माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावी असे तुम्हालाही वाटत असेल तर तुम्ही हमखास काही गोष्टी करायला हव्यात. जाणून घेऊया माता लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी तुम्ही काय करावे ते.
अपमान करु नका
तुमच्याकडे असलेल्या पैशांचे आभार माना. कारण लक्ष्मी त्याच्याकडेच जाते. जी व्यक्ती तिच्या असल्याचे समाधान व्यक्त करते. त्यामुळे तुमच्याकडे जो पैसा आहे किंवा जी लक्ष्मी आणि संपत्ती आहे त्याचे आभार माना त्यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर अधिक प्रसन्न राहते. त्यामुळे कधीही पैसा नाही किंवा माझ्याकडे काही नाही असे कधीही म्हणू नका. कारण तुमच्याकडे काही नाही असे म्हणणे म्हणजे नकारात्मकता आणणे असे होते. त्यामुळे कायम तुम्हाला मिळाले त्याचे कृतकृत्य माना. त्यामुळे तुमच्यावर लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होतील.
पैशांचा गैरव्यवहार करु नका.
लक्ष्मीचा मान ठेवताना तिचा वापर चुकीसाठी करु नका. जर तुम्ही तुमचा पैसा चुकीच्या गोष्टींसाठी वापरत असाल तर त्यामुळे लक्ष्मी नाराज होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. पैशांचा व्यवहार हा वाईट कामांसाठी करु नका. वाईट कामांसाठी पैसा वापरला तर तो वाढत नाही. जुगार किंवा अशा काही गोष्टींसाठी तुम्ही पैशांचा गैरव्यवहार करु नका. याशिवाय तुम्ही जर चुकीचे खर्च करत असाल किंवा कोणाला लुबाडत असाल तरी देखील तुमच्याकडे लक्ष्मी राहणार नाही.
राशीफळ 2022ः कसे असेल नवे वर्ष, कोण होईल आनंदी आणि कोणाला घ्यावी लागेल काळजी
रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावा
लक्ष्मी ही चंचल आहे. पण तिला प्रसन्न ठेवण्यासाठी रोज संध्याकाळी सकाळी देव्हाऱ्यात दिवा लावा.त्यामुळे घरात एक सकारात्मक उर्जा राहते. असे म्हणतात की, संध्याकाळच्या वेळेत लक्ष्मी माता ही फिरत असते. ज्याचे घर स्वच्छ आणि प्रसन्न असते अशा व्यक्तीच्या घरात ती वास्तव्याला राहते. त्यामुळे तुमच्याकडे लक्ष्मीमातेने जास्तीत जास्त राहावे तिने आपल्याला सगळी सुखं द्यावीत असे वाटत असेल तर तुम्ही रोज संध्याकाळी आणि सकाळी दिवा लावायला हवा.
रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावा
लक्ष्मी ही चंचल आहे. पण तिला प्रसन्न ठेवण्यासाठी रोज संध्याकाळी सकाळी देव्हाऱ्यात दिवा लावा.त्यामुळे घरात एक सकारात्मक उर्जा राहते. असे म्हणतात की, संध्याकाळच्या वेळेत लक्ष्मी माता ही फिरत असते. ज्याचे घर स्वच्छ आणि प्रसन्न असते अशा व्यक्तीच्या घरात ती वास्तव्याला राहते. त्यामुळे तुमच्याकडे लक्ष्मीमातेने जास्तीत जास्त राहावे तिने आपल्याला सगळी सुखं द्यावीत असे वाटत असेल तर तुम्ही रोज संध्याकाळी आणि सकाळी दिवा लावायला हवा.
जाणून घ्या गुरूपुष्यामृत योगाची माहिती | Gurupushyamrut Yoga Chi Mahiti
घर स्वच्छ ठेवा
वर सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी माता स्वच्छता असेल तिथे राहते. त्यामुळे 2022 मध्ये तुमचे घर आणि इतर आवार जास्तीत जास्त स्वच्छ राहील याची काळजी घ्या. घर स्वच्छ असेल तर घरात एक सकारात्मक उर्जा कायम राहण्यास मदत मिळते. त्यामुळे अगदी आठवणीने तुम्ही घर स्वच्छ ठेवा. घरातील सगळे कोपरे आणि तुळस यांची योग्य काळजी घ्या.
आता 2022 मध्ये तुमच्याकडे लक्ष्मी टिकून राहील फक्त तुम्ही या काही गोष्टी करायला विसरु नका.