ADVERTISEMENT
home / Care
थंडीत केसांचे मॉईश्चर टिकवण्यासाठी अशी घ्या काळजी

थंडीत केसांचे मॉईश्चर टिकवण्यासाठी अशी घ्या काळजी

थंडीला चांगलीच सुरुवात झाली आहे.थंडीच्या दिवसात त्वचेत जितका फरक पडतो तितकाच फरक केसांमध्येही होतो. थंडीत अनेकांचे केस हे पटकन तेलकट होतात किंवा कोरडे वाटू लागतात. याच दिवसामध्ये केसात कोंडा होण्याची शक्यता सर्वाधिक असते. तुम्हालाही तुमच्या केसांमध्ये आता फरक जाणवू लागला आहे का? केस ड्राय किंवा सारखे कोरडे वाटू लागले आहेत का? मग तुम्ही आताच केसांची काळजी घ्या नाहीतर केसांच्या इतर समस्या तुमच्या केसांचा वॉल्युम कमी करु शकतात. चला तर जाणून घेऊया नेमकी काळजी कशी घ्यायची ते.

सुंदर केसांसाठी वापरा बेस्ट हर्बल शॅम्पू (Best Herbal Shampoo In Marathi)

सतत करु नका शॅम्पू

सतत करु नका शॅम्पू

Instagram

ADVERTISEMENT

केस धुण्याची सवय ही चांगली असली तरी हिवाळ्यात सतत शॅम्पूचा प्रयोग केला की, केस अधिक कोरडे होण्याची शक्यता असते.शॅम्पूमधील केमिकल्स स्काल्पवर जाऊन बसतात. शिवाय केसांना अधिक कोरडे करतात. केसांचा हा कोरडेपणा प्रत्येक शॅम्पूच्यावेळी हिवाळ्यात वाढत राहतो. त्यामुळे गरज असेल त्याच वेळी केसांवर शॅम्पूचा प्रयोग करा. तुम्ही एखादी हेअर ट्रिटमेंट केली असेल तर त्याची काळजी घेणारे शॅम्पूही योग्य सल्ल्यानिशी वापरा. हे प्रोडक्ट कितीही महाग असले तरी थंडीमध्ये त्याचा अतिवापर त्रासदायक ठरु शकतो. 

DIY : फक्त तीन गोष्टींपासून असा तयार करा होममेड हेअर स्प्रे

कंडिशनरचा प्रयोग ठरु शकते घातक

थंडीत अंगावर थंड पाणी घेण्याचा काहीच प्रश्न नसतो. कडकडीत गरम पाण्याची आंघोळच आपल्याला हवी असते. शॅम्पू करताना तुम्ही असे गरम गरम पाणी डोक्यावरुन घेतले की, डोक्याची छिद्र मोकळी होतात. केस धुवून झाल्यानंतर कंडिशनर जर तुम्ही स्काल्पला चोळत असाल तर ते स्काल्पवर चिकटून राहण्याची शक्यता अधिक असते. शिवाय गरम पाण्यामुळे केसांना लावलेले कंडिशनर केसांवरुन पूर्णपणे निघत नाही. केसांवर हे कंडिशनर असेच राहिले की, त्यामुळे कोंड्याचा त्रास होऊ शकतो. 

 

ADVERTISEMENT

केसांना एकदा तरी लावा तेल

केसांना एकदा तरी लावा तेल

Instagram

केसांमधील ड्रायनेस कमी करण्याचे काम नैसर्गिकपद्धतीने तेल करु शकते. तेलामुळे केस मॉश्चरायईज होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही केसांना आठवड्यातून एकदा तरी तेल लावा. डोक्याच्या नसा या मोकळ्या करण्याचे काम हेडमसाज करते. त्यामुळे तुम्ही आठवडयातून एकदा तरी हेअर मसाज करा.

केसांना कापूर तेल लावण्याचे हे आहेत फायदे, हेअर केअर मध्ये करा समावेश

ADVERTISEMENT

हेअर स्पा टाळा

खूप जणांना हेअर स्पा करायला आवडते. पण या दिवसात तुम्ही हेअर स्पा करायला जाऊ नका. हेअर स्पा करताना क्रिमचा प्रयोग तुमच्या केसांना केला जातो. या स्पामुळे काही काळासाठी केस चमकत आहेत असे वाटले तरी देखील अगदी काहीच काळात केस तेलकट वाटू लागतात. त्यामुळे या काळात हेअर स्पा मुळीच करायला जाऊ नका. केसांच्या कोणत्याही ट्रिटमेंट या काळात टाळल्या तर फारच उत्तम. कारण केस कोरडे झाल्यामुळे केसांना कोणतीही ट्रिटमेंट केली की, त्यामुळे केस अधिक कोरडे  होण्याची शक्यता असते.  

थंडीच केसांचे मॉईश्चर टिकवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवत केसांची काळजी घ्या आणि सुंदर दिसा.

09 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT