ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
how to keep your kitchen cool in summer

उन्हाळ्यात स्वयंपाक करणं सुखावह करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

उन्हाळा  सुरू होताच वातावरणात उष्णतेचा पाराही वाढू लागतो. मे महिन्यात तर घरात बसणंही उष्णतेमुळे कठीण होतं. यात तर महिलांना स्वयंपाक घरात दोन वेळ गॅस जवळ स्वयंपाक बनवावा लागतो. घराबाहेरून येणारी उष्ण हवा आणि स्वयंपाक घरात गॅसजवळ निर्माण होणारी उष्णता सहन करणं अक्षरशः असह्य असतं. घरातील इतर रूम्समध्ये फॅनसोबत एसी अथवा कुलर लावता येतो. मात्र किचनमध्ये गॅस सुरु असल्यामुळे अशा गोष्टी लावतादेखील येत नाहीत. म्हणूनच महिलांनी या काळात स्वयंपाक करणं सोयीचं करण्यासाठी या टिप्स फॉलो कराव्या.यासोबतच जाणून घ्या उन्हाळ्यातील आहार | Food For Summer Days In Marathi

how to keep your kitchen cool in summer

स्वयंपाकघरातील कामं सकाळी लवकर आवरा

उन्हाळ्यात आपण आपल्या आहारावर नीट लक्ष द्यायला हवं. या काळात बाहेरचे मसालेदार पदार्थ खाण्यापेक्षा घरातील पौष्टीक पदार्थ खाणं सोयीचं ठरतं. यासाठीच महिलांनी या काळात सकाळी उठल्यावर लवकर स्वयंपाकाची कामे उरकून घ्यावीत. शक्य असल्यास सकाळच्या नाश्त्यासोबतच दुपारचा स्वयंपाक बनवावा. कारण दुपारपेक्षा सकाळचे वातावरण हे तुलनेने कमी उष्ण असते. त्यामुळे सकाळी स्वयंपाक करणं दुपारच्या मानाने कमी कठीण असतं. असं केल्यामुळे तुम्हाला दुपारच्या उन्हात किचनमध्ये काम करावं लागणार नाही. 

एग्झॉस्ट फॅनचा वापर करा

उन्हाळ्यात किचनमधील वातावरण थंड ठेवण्यासाठी जरी तुम्ही कुलर अथवा एसी नाही लावू शकला. तरी तुम्हाला एग्झॉस्ट फॅन अथवा चिमणीचा वापर करता येतो. ज्यामुळे स्वयंपाक करताना निर्माण होणारा धूर आणि उष्णता बाहेर टाकली जाते. लक्षात ठेवा स्वयंपाक करताना नेहमी किचनची खिडकी उघडी ठेवा. तसंच एग्झॉस्ट फॅन आणि चिमणी सुरू ठेवा. ज्यामुळे तुमचं किचन तुलनेने थंड राहील आणि तुम्हाला उष्णतेचा कमी त्रास होईल.

रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवशीचा मेन्यू ठरवा

सकाळी उठल्यावर जर तुम्हाला नाश्ता आणि दुपारचा स्वयंपाक दोन्ही आवरायचं असेल तर, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी उद्या काय काय स्वयंपाक करायचा आहे याचं नियोजन करा. ज्यामुळे तुमचा स्वयंपाक पटकन होईल आणि तुम्हाला जास्तवेळ स्वयंपाक घरात राहावं लागणार नाही. शिवाय असं केल्याने उन्हाळ्यासाठी जास्तीत जास्त पचायला हलके आणि पौष्टीक पदार्थ करण्यावर तुमचा भर राहील.

ADVERTISEMENT

कुकिंग अप्लायंसेसचा वापर करा

आजकाल जग खूप पुढे गेलं आहे. ज्यामुळे तुमचं किचन शक्य तितकं मॉर्डन करा. याचा फायदा हा होईल की तुम्हाला आधुनिक किचन अप्लायंसेसमुळे जास्तवेळ किचनमध्ये राहावं लागणार नाही. मिक्सर, फूड प्रोसेसर, बीटर, टोस्टर, कुकरच्या मदतीने तुमचा स्वयंपाक लवकर होईल. स्वयंपाकामधून वेळ वाचल्यामुळे तुम्ही तुमच्या बेडरूम अथवा लिव्हींग रूममध्ये एसीत बसून तुमच्या इतर आवडीच्या गोष्टी करू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

29 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT