ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
how-to-know-if-your-bra-is-too-tight-information-in-marathi

ब्रा चे माप योग्य नाही, ओळखण्याचे संकेत

चांगल्या फिगरसाठी योग्य फिटिंगची ब्रा घालणेही गरजेचे आहे. पण अनेक महिला बरेचदा गरजेपेक्षा अधिक टाईट अथवा लहान कप साईजची ब्रा खरेदी करतात. अशा महिलांना केवळ याचा त्रासच होतो असं नाही तर फिटिंगचे कपडे घालण्यासाठीही समस्या निर्माण होते. याशिवाय टाईट ब्रा घालण्याने शरीरामध्ये अनेक समस्याही निर्माण होतात. अॅसिडिटीसारख्या समस्या घट्ट ब्रा घालण्याने निर्माण होतात. तर त्याशिवाय खांद्यावर जोर निर्माण झाल्याने खांदेदुखीही सुरू होते. तुम्ही माना अथवा नका मानू ब्रा चे माप योग्य नसेल अथवा ब्रा अधिक टाईट असेल तर अनेक महिलांवर नकारात्मक प्रभाव पडतो आणि महिलांना शारीरिक वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. 

तुम्हाला कसं कळेल की, ब्रा अधिक घट्ट आहे

तुम्हाला ब्रा जर योग्य फिटिंगची वाटत नसेल तर कसं कळेल अथवा घट्ट आहे हे कसं कळेल. हे ओळखण्याच्या काही पद्धती वा संकेत आहेत, जे आम्ही या लेखातून शेअर करत आहोत. प्रत्येक महिलेला याबाबत माहिती असायला हवी.

त्वचेमध्ये जळजळ होणे  

skin allergy

घट्ट ब्रा घातल्यास अथवा ब्रा चे माप योग्य नसल्यास त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये डर्मेटायटिस, हिट रॅश अथवा हाईव्सचा समावेश आहे. जेव्हा घट्ट कपडे त्वचेवर रगडले जातात. तेव्हा येणाऱ्या घामामुळे हे रगडून त्यासह त्वचेवर जळजळ निर्माण होते. तसंच हे त्वचेवर सूज येण्याचे कारणही बनू शकतात. इतकंच नाही तर त्वचेवर बॅक्टेरिया आरामात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोकाही असतो. अति घाम येतो आणि ब्रा टोचू लागते तेव्हा समजावे की, ब्रा चा आकार तुमच्या स्तनांसाठी योग्य नाही.

अॅसिडिटी होणे 

जेव्हा ब्रा अति घट्ट असते तेव्हा केवळ त्वचेवरच नाही तर शरीराच्या अन्य भागावरही याचा ताण येतो. ब्रा चा खालचा स्ट्रॅप हा बऱ्याचदा फुफ्फुसाच्या भागावर दबाव टाकतो. रोज जर असा दबाव पडू लागला तर पोटावर दबाव पडून असिडिटी निर्माण होते. पोटात निर्माण होणारे अॅसिड हे वरच्या बाजूला येऊ लागते आणि त्यामुळे आंबट ढेकर येणे, छातीत सतत जळजळ होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे असे वरचेवर होऊ लागल्यास आपल्या ब्रा चे माप बदलून पाहावे. 

ADVERTISEMENT

शरीराच्या वरच्या भागात दुखणे 

जर ब्रा खूपच टाईट असेल पण तुम्हा जाणवत नसेल तर तुम्हाला सतत पाठदुखी सुरू झाल्यास, तुमची ब्रा योग्य आकाराची नाही हे समजून जावे. ब्रा चा आकार योग्य नसेल तर हे शरीराला घातक ठरते आणि मसल्स अथवा पाठदुखीचा कायमच्या त्रासाला सामोरे जावे लागते. बऱ्याचदा तुम्ही डिझाईनर ब्रा ची खरेदी करता आणि याची स्ट्रॅप जर पाठीवर सतत रगडली जात असेल तर पाठीची नस सतत दाबली जाते आणि त्याचा हाताच्या हालचालींवरही फरक पडतो. शरीराच्या वरच्या भागात खूपच दुखू लागते. त्यामुळे तुम्ही तुमच्या ब्रा चा आकार योग्य आहे की नाही हे तपासून मगच ती घालावी. 

ब्रा च्या कपमधून स्तन बाहेर येणे 

कधी कधी घरात आपल्याला जी ब्रा योग्य वाटते ती बाहेर पडल्यानंतर अथवा बाहेर फिरल्यानंतर त्यातून स्तन बाहेर येऊ लागतात. तुम्ही ब्रा चे माप तर योग्य घेतलेले असते पण त्याच्या कपची साईज तुम्ही नीट न बघितल्यामुळे ब्रा घट्ट होते आणि मग स्तन (boobs) त्यातून बाहेर येतात. यामुळे कपपेक्षा स्तन मोठे असल्याचे लक्षात येते. ब्रा जर अंडरवायर असेल तरीही तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमचे ब्रेस्ट कप फिट नसतील अथवा अंडरवायरचा ताण स्तनांवर येत असेल तर तुमची ब्रा लहान आहे आणि घट्ट आहे हे नक्की. त्यामुळे ब्रा ची खरेदी करताना त्याचे योग्य माप पाहावे.

ब्रा प्रत्येक वेळी सावरावी लागत असल्यास  

तुमची ब्रा जास्त घट्ट असेल तर तुम्हाला ती सतत टोचत राहाते. त्यामुळे अनेक महिला सारख्या ब्रा चे इलास्टिक खेचत राहतात अथवा अॅडजस्ट करत राहतात. जेव्हा ब्रा चे माप योग्य नसते तेव्हा महिलांना सतत काहीतरी चुकतंय असं जाणवत राहातं. तसंच कुठेही गेल्यानंतर आतमध्ये फिट वाटत नसल्याने महिलांचे लक्ष सतत ब्रा कडे लागून राहाते. त्यामुळे अशा वेळी ब्रा त्वरीत बदलून घ्यायला हवी. 

तुम्हालाही ब्रा घातल्यानंतर वरीलपैकी कोणतेही संकेत मिळत असतील अथवा यापैकी कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही वेळीच ब्रा चे योग्य माप ओळखून ब्रा बदलायला हवी.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

20 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT