शाळेमध्ये रोजनिशी लिहिण्याचे फायदे तुम्ही नक्कीच वाचले असतील. लहानपणी शाळेत रोजनिशी अनेकांनी लिहिल्या असतील. दिवसभरात तुम्ही काय केले?कोणती कामे केली किंवा कोणती कामे करायची आहेत याची यादी अनेकांनी केली असतील. पण खूप जण डायरी हा प्रकार अजिबात करत नाहीत. पण काही गोष्टींच्या नोंदी केल्या तर कामं करणं सहज शक्य जातं. तुम्हालाही कामे पटापट व्हावी असे वाटत असेल तर तुमच्याकडे डायरी ही अगदी असायलाच हवी. तुमच्याकडे डायरी असेल तर कामांची यादी करणं ती कामे पूर्णत्वाला नेणं हे सगळं कळणं तुम्हाला फारच सोपे जाईल. चला जाणून घेऊया डायरीत नेमक्या कोणत्या गोष्टी नोंद करुन ठेवायच्या ते
डायरीत नोंदवायच्या गोष्टी
डायरीत काय नोंद करायची अशा विचारात असाल तर खाली दिलेल्या गोष्टी तुम्ही नक्कीच नोंदवू शकता.
- तुमच्या रोजच्या कामांची यादी तुम्ही त्यामध्ये लिहा. पानाच्यावर तारीख आणि वार लिहून त्या खाली दिवसभरात तुम्हाला कोणती कोणती कामे करायची आहेत. त्याची एक यादी करा. जी कामे तुम्ही पूर्ण कराल. त्यावर बरोबर अशी खूण करायची आहे. म्हणजे तुम्हाला किती कामं झाली ते कळू शकेल.
- पैशांचे काही व्यवहार केल्यानंतर आपण विसरतो. विशेषत: छोटे छोटे खर्च कमी मोठे होतात ते आपल्याला कळत नाही. मग काय महिन्याअखेरीस पैशांचा हिशेब लागत नाही. अशावेळी तुम्ही डायरीत रोजचा होणारा खर्च लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला ज्यावेळी खर्चाची सांगड बसत नसेल तर ती पटकन बसेल.
- डायरीमध्ये तुम्हाला भविष्यात काय काम करायची आहे ते देखील तुम्ही डायरीमध्ये लिहून ठेवा. त्यामुळे तुम्हाला काय काम करायची आहे त्यासाठी काय काय करायची आहे ती तयारी करणे सोपे जाईल.
- अनेकदा पैसे जमवणे हे खूप जणांसाठी कठीण काम असते. पण जर काही हिशेब आणि तुमच्या इच्छा अपेक्षा तुम्ही लिहून ठेवल्या तर तुम्हाला ते करणे फार सोपे जाते.
- घरी एखादा कार्यक्रम असेल किंवा भविष्यात एखादा कार्यक्रम असेल तर तुम्ही त्याच्या पूर्वतयारीविषयी डायरीमध्ये नोंद करा. उदा. लग्न किंवा एखादे मंगलकार्य असेल तर तुम्हाला त्या विषयी डायरीत नोंदवायचे असेल तर तुम्ही कार्यक्रम,लागणारे खर्च असे सगळे काही त्यामध्ये नोंदवू शकता म्ङणजे तुम्हाला त्याचे नियोजन करणे फारच सोपे जाते.
याही गोष्टी ठेवा डायरीमध्ये
डायरी ही केवळ कामासाठीच नाही तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही खास धडे देण्यासाठीही मदत करते
- तुम्हाला एखाद्या गोष्टीने त्रास दिला असेल तर तुम्ही ती गोष्ट मनातून काढून त्यातून बाहेर येण्यासाठीही डायरी लिहू शकता.
- कामावर भरपूर ताण असेल तर तो ताणमुक्त करण्यासाठी डायरीमध्ये छान स्केचिंग किंवा अशा काही गोष्टी करा. म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होण्यास मदत मिळेल.
- पैशांच्या समस्या तुम्हाला उद्धवत असतील तर तुम्ही त्या विषयी लिहा. त्यामुळे तुम्हाला तो ताण कसा कमी करायचा आहे ते देखील कळू शकेल.
आता तुम्ही रोज डायरी लिहा आणि त्यात या काही नोंदी नक्की करा.
अधिक वाचा
वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी सोप्या युक्ती जाणून घ्या
कणीक अधिक तास ताजी ठेवायची असल्यास वापरा सोप्या टिप्स
तुम्ही मोबाईलचे कव्हर किती दिवसांनी बदलता, जाणून घ्या