ADVERTISEMENT
home / नातीगोती
वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी सोप्या युक्ती जाणून घ्या

वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी सोप्या युक्ती जाणून घ्या

वाढदिवस हा वर्षातून येणारा प्रत्येकासाठीचा खास दिवस होय. जो आपल्याला आठवण करून देतो सरलेल्या वर्षाची आणि येणाऱ्या नव्या वर्षाची. त्यामुळेच वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणं व आपल्या लोकांवर असलेलं प्रेम यानिमित्ताने दाखवणं आवश्यक आहे. जेव्हा आपण एखाद्याचा वाढदिवस साजरा करतो तेव्हा फक्त तो त्या दिवसांपुरता मर्यादित नसतो. त्यांनी आत्तापर्यंत आयुष्यात जे काही मिळवलं आहे त्याची गोड आठवण करून देणारा हा दिवस असतो. या दिवसाच्या निमित्ताने सरलेल्या वर्षातील कडू-गोड आठवणींना उजाळा मिळतो. 

वाढदिवस महत्त्वाचा आहे कारण या दिवशी प्रत्येकाला आपण खास असल्याची जाणीव हा दिवस देतो. त्यांच्यावर जवळच्यांच आणि इतरांचंही किती प्रेम आहे हे ते हा दिवस दाखवून देतो. वाढदिवसामुळे एखाद्याला पुन्हा एकदा नवचैतन्याने जगण्याचं बळ मिळू शकतं. मग त्या भावाला दिलेल्या वाढदिवस शुभेच्छा असो, 

अनेक संस्कृतींमध्येही वाढदिवसाला अन्यनसाधारण महत्त्व असल्याचं सांगितलं आहे. तुमच्या भविष्याप्रमाणे वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या ग्रहताऱ्यांची स्थिती असते. त्यानुसार अनेक गोष्टी तुमच्याबद्दल वर्तविल्या जातात. ज्यावरून तुमची पर्सनॅलिटी आणि भाग्यही ठरत असतं. तुमच्या वाढदिवसाच्या वर्षाप्रमाणे चायनीज कॅलेंडरमध्ये म्हणजेच लुनार कॅलेंडरमध्ये प्राणीसुद्धा सांगितला जातो.

वाढदिवस लक्षात कसा ठेवावा? (How To Remember Birthday)

अनेकदा आपल्याला एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश द्यायच्या असतात. जसं भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्नीकडून पतीला, आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा, बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या मैत्रिणींकडून मजेदार शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा बेस्ट फ्रेंडसाठी इ. पण प्रत्येकाचा वाढदिवस लक्षात ठेवणे सोपे नाही. आता सोशल मीडियामुळे आपल्याला एखाद्याच्या वाढदिवसाचं नोटिफिकेशन येतं. पण काहीजण सोशल मीडियावर नसतात तेव्हा मात्र त्यांचा वाढदिवस लक्षात ठेवण्यात पंचाईत होते. तसंच काहींचा वाढदिवस हा फेसबुक नोटिफिकेशनपेक्षाही आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपल्याला त्यांच्या खास दिवसाची आधीच तयारी करायची असते. हा वेळ आपल्याला फेसबुक देत नाही.

ADVERTISEMENT

वाढदिवस लक्षात राहण्यासाठी खास टिप्स (Tips For Remebering Birthdays)

तुमच्या फोनमधील किंवा शक्य असल्यास घरातील कॅलेंडरवर तुमच्या जवळच्यांचा आणि मित्रपरिवाराच्या वाढदिवसाचे दिवस नोंद करून ठेवा. यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्यांचे वाढदिवस पाहता येतील. जर तुम्ही डायरी लिहीत असाल तर त्यात वाढदिवसाच्या नोंदी करून ठेवा. आजकाल डिजीटल कॅलेंडर्सही मिळतात. ज्यामुळे तुमचं काम नक्कीच सोपं होईल. यामुळे तुम्हाला वाढदिवस यायच्या आधीच कळेल आणि वाढदिवसाचं प्लॅनिंगही करायला वेळ मिळेल.

वाढदिवसासाठी नोटबुक किंवा डायरी (Maintain Notebook or Diary)

साध्या कॅलेंडरवर कुठे प्रत्येक महिन्याला वाढदिवस लिहीत बसणार नाही का? त्यापेक्षा तुमच्या रोजच्या डायरीत किंवा नोटबुकमध्ये नोंद करून ठेवा तुमच्या आवडत्या व्यक्तींच्या वाढदिवसाची. कारण रोज उठल्यावर किंवा कामाला सुरूवात करण्याआधी बरेच जणांना डायरी पाहायची सवय असतेच. तर काहींना रात्री झोपण्याआधी डायरी लिहायची सवय असते.

वाढदिवसासाठी डिजीटल कॅलेंडर (Digital Calender)

आपल्या प्रत्येकाकडे आजकाल स्मार्टफोन असतोच. ज्याच्या कॅलेंडरमध्ये बरेचदा तुमच्या गुगल कॉन्टॅक्टप्रमाणे माहिती नोंदविली जाते. हे डिजीटल कॅलेंडर तुम्ही अपडेट ठेवल्यास तुम्हाला आपोआप मीटींग किंवा इव्हेंट रिमाइंडरसोबत बर्थडे रिमाइंडर्सही येतील.

वाढदिवसासाठी खास डिजीटल अॅप (Digital Apps)

वाढदिवसासाठी खास अॅप्स

ADVERTISEMENT

वाढदिवसासाठी खास अॅप्स

आजकाल डिजीटल अॅपचा जमाना आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आता अॅप उपलब्ध आहे. मग वाढदिवसासाठी नाही असं कसं होईल. वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठीही अॅप स्टोरवर अनेक अॅप उपलब्ध आहे. तुमच्या आवडीनुसार अॅप निवडा.

वाढदिवसाला शुभेच्छा देणं का आहे महत्त्वाचं (Why Its Important To Wish On Birthdays)

तुमच्या एका वाढदिवस शुभेच्छेने जर तुमचं नातं दृढ होणार असेल तर का नाही? मग ते प्रोफेशनली असो वा पर्सनली असो. जेव्हा एखाद्या बँकेकडून किंवा बिझनेसकडून कस्टमरचा वाढदिवस लक्षात ठेवला जातो. तेव्हा कस्टमरला नक्की छान आणि कौतुकास्पद वाटतं. जेव्हा आपला एखादा मित्र आपल्याला सरप्राईज किंवा स्पेशल गिफ्ट पाठवतो. तेव्हा आपल्याला आपली काळजी घेणारं कोणीतरी आहे असं नक्कीच वाटतं. जेव्हा एखादा बॉस आपल्या कर्मचाऱ्याला हॅपी बर्थडे विश करतो तेव्हा कर्मचाऱ्यालाही त्याच्या कामाची किंवा त्या कंपनीत असल्याची पोचपावती खऱ्या अर्थाने मिळत असते. 

मग तुम्हीही तुमच्या जवळच्या, मित्रपरिवार, ऑफिस सहकारी आणि ओळखींच्या लोकांना आवर्जून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि तुमची नाती दृढ करा.

ADVERTISEMENT
24 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT