माणसं तितक्या प्रवृत्ती आणि तितकेच वाद.. कोणत्याही नात्यात भांडण ही स्वाभाविकपणे होतच असतात. काही वाद असे असतात जे काही केल्या टाळता येत नाहीत. पण कधीकधी आपल्यात होणारा वाद हा नाहक आणि सतत त्याच त्याच विषयावरुन होत असतो. तुमचाही कोणासोबत सारखा एकाच विषयाला धरुन वाद होत असेल तर काही गोष्टींची काळजी तुम्ही घेणे गरजेचे आहे. उदा. तू सारखा इथे टॉवेल का ठेवतोस? कधीतरी तो टॉवेल जागेवर नीट ठेवत जा….हे झालं एक साधं उदाहरण जी कदाचित तुमच्या आयुष्यात रोजच्या रोज घडत असतील. पण आपण त्याकडे कधीही इतके लक्ष देत नाहीत आणि ते वाद विकोपाला जातात. असे वाद तुमचेही कोणासोबत होत असतील तर तुम्ही आताच काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
शांत राहा त्या विषयावर बोला
वाद नको म्हणून जर सतत वाद होणारा विषय तुम्ही टाळत असाल तर अशी चूक तुम्ही कधीही करु नका. कारण जर त्यावर योग्यवेळी योग्य निर्णय घेतला नाही तर वाद हा जास्त वाढू शकतो. त्यामुळे ज्या विषयावर वाद होतोय तो विषय तुम्ही त्या व्यक्तिसोबत बोला. म्हणजे त्यावर शांत डोक्याने काय इलाज करायचा ते कळेल. कधीकधी भांडण होत असताना त्या विषयीवर बोलणे कोणालाच आवडत नाही.भांडणाच्या नादात ते कोणाला कळतही नाही. त्यामुळे त्यावेळी किमान शांत राहा आणि त्यावर बोला
उदा. तुमच्या नात्यात कोणा तिसऱ्यामुळे खूप तक्रारी येत असतील. याची जाणीव तुम्हाला होत असेल पण समोरच्याला होत नसेल तर तुम्ही जाणीव करुन देण्यासाठी तुमचे डोके शांत ठेवा नाही तर अशावेळी भांडणं होणे हे 100% ठरलेले आहे.
वाद टाळा, समजूतदारपणा ठेवा
कोणत्याही नात्यात समजूतदारपणा हा फारच महत्वाचा आहे तुम्ही समजूतदार असाल तर तुमचा समजूतदारपणा आधीच दाखवा. कधीकधी काही विषय हे फारच नाजूक असतात. जे वादाच्यावेळी चर्चा करायचे म्हटले तर नाते अगदीच मोडकळीस येते. विशेषत: नवरा बायकोच्या नात्यामध्ये बरेचदा असे वाद होतात की जे अगदी मोडकळीस येण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी तुम्ही थोडा समजूतदारपणा दाखवा. हा समजूतदारपणा तुम्ही स्वत:हून दाखवा. त्यामुळे भांडणं कमी होतील.
उदा. तुमचे भांडण हे खूप वर्षापासून काही मुद्द्यावर होत असेल तर तो वाद टाळण्यासाठी तुम्ही थोडा समजूतदारपणा राखणेच गरजेचे आहे. आता तुम्ही म्हणाल तुम्ही दोघेही समजूतदार नाही अशावेळी एकाने तरी वाद मागे घेणे गरजेचे नाही.
संशयाला घाला आवर
कोणत्याही नात्याचा शेवट हा खूप वेळा संशयावर घसरतो. झालेले असते एक आणि होते एक अशी अवस्था साधारणपणे सगळ्यांची होते. एखादा वाद करताना दुसऱ्या विषयावर घसऱणे ही मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे संशयाला आवर घालणे आणि जुन्या गोष्टी उकरुन काढणे या गोष्टी देखील होऊ लागतात. त्यामुळे या गोष्टी टाळणे देखील सगळ्यांसाठीच गरजेचे असते. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही तुमचा संशय आवरा म्हणजे तुमचे वाद नक्की आटोक्यात येतील.
आता एकाच विषयावरील वाद होताना समोरच्या व्यक्तिचे म्हणणे एकदा तरी ऐका म्हणजे तुमचे वाद नक्कीच कमी होतील.
अधिक वाचा
योग्य वेळी मुलं होऊ देण्याचा निर्णय चांगला, नवं विवाहितांनी नक्की वाचा