ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
कारल्याची भाजी

कडू कारल्याची भाजी अशी करा चविष्ट आणि मिळवा फायदेच फायदे

आज कोणत भाजी केली? कारल्याची…. अरेरे कारल्याची भाजी ऐकूनच तोंड वाकडे होते. कारल्याची भाजी काही जणांना खूप आवडते. तर काही जणांना ही भाजी केली तर अजिबात खाण्याची इच्छा होत नाही. कारल्याची भाजी करण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते. पण कारल्याचे फायदे लक्षात घेता कारल्याची भाजी नेमकी कशी करता येईल ते जाणून घेऊया.अशा पद्धतीने कारल्याची चविष्ट भाजी तुम्ही केली तर घरात कारलं न खाणारी व्यक्तीही कारलं खायल सुरुवात करेल.

अशी करा कारल्याची भाजी

सौजन्य: Instagram

साहित्य: कारले – 250gm .मोहरी, 1 छोटा चमचा जीरा , 1 छोटा चमचा  तेल,  २ चमचे लिंबाचा रस, साखर – 1 टेबलस्पून,चवीनुसार मीठ ,हिंग ,लसणाची पेस्ट – 1 टेबलस्पून,लाल तिखट, हळद पावडर ,धणा पावडर ,गोडा मसाला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट , भाजलेल्या कारळांच कूट ,भाजलेल्या तिळाचे कुट, बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:

कारल्याचे गोल गोल काप करुन घ्या. त्यातील बिया काढून टाका. एका कढईत तेल गरम करुन त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्या. जीरं-मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कारल्याचे काप घाला.
कारली थोडी चांगली शिजली की, त्यामध्ये मीठ घाला. त्यामध्ये लिंबाचा रस घालून भाजी परतून घ्या. त्यात एक चमचा साखर घाला.

भांडे झाकून कारली चांगली शिजू द्या. यावेळी गॅस पूर्णपणे मंद असू द्या म्हणजे भाजी जळणार नाही.  भाजी थोडी नरम झाली की त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट घाला.
त्यात लाल तिखट, हळद घाला, त्यात गोडा मसाला किंवा काळा मसाला आणि शेंगदाणा तिळाचे कूट, कारळाचे कूट घाला.भाजी कोरडी झाली असेल तर त्यात थोडासा पाण्याचा हबका द्या. आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. तुमची कारल्याची भाजी तयार

ADVERTISEMENT

खमंग भाजणी थालीपीठ रेसिपीज (Thalipeeth Bhajani Recipe In Marathi)

कारल्याच्या भाजीचे फायदे

सौजन्य : Instagram

कारल्याच्या भाजीमध्ये अनेक फायद्याचे घटक असतात. जाणून घ्या कारल्याच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे (karlyache fayde in marathi).

  1. दमा असणाऱ्यांसाठी कारल्याची भाजी फारच फायद्याची असते. 
  2. पोट खराब होण्याचा आणि गॅसेसचा त्रास तुम्हाला होत असेल तर तुमच्यासाठी कारले हे फारच आरोग्यदायी असते. 
  3. कारल्यासोबतच कारल्याची पानेसुद्धा आरोग्यासाठी फारच लाभदायक असतात. कारल्याची भाजी आणि त्याच्या रस प्यायल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. 
  4. रक्त शुद्धी करणाचे काम कारले करते. ज्यांना मधुमेहाचा त्रास असतो त्यांच्यासाठीही कारले फारच आरोग्यदायी आणि लाभदायी ठरते. 
  5. कारले खाल्ल्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत मिळते. 

आता तुम्हीही नक्की ट्राय करा कारल्याची अशी चविष्ट भाजी

चॉकलेट आवडत असेल तर नक्की ट्राय करा या रेसिपी

ADVERTISEMENT

चमचमीत पास्ता रेसिपी मराठीत (Pasta Recipe In Marathi)

11 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT