सुंदर चेहऱ्याची व्याख्या सांगायची झाली तर त्यावरील केवळ फिचर्स किंवा नाकीडोळी दिसणे हेच महत्वाचे नसते. त्यासोबत सुंदर त्वचा, नितळ त्वचा, बोलके डोळे (काळीवर्तुळे) नसलेले डोळे, अशा काही गोष्टी अगदी प्रकर्षाने पाहिल्या जातात. डोळ्यांचे सौंदर्य हे देखील फार महत्वाचे असते. त्यासाठीच बाजारात आयमास्क नावाचा प्रकार मिळतो. आयमास्क हा म्हणावा तितका स्वस्त असा प्रकार नाही. तुम्ही गुगल करुन आय शीट मास्क असे शोधले तर साधारण 500 रुपयांच्या पुढे किंवा त्याहून अधिक किंमतीचे आय शीट मास्क मिळतात. पण तुम्ही घरीच अगदी सोप्या पद्धतीने आय शीटमास्क म्हणजे तुमचे पैसे वाचतील
हायड्रेटिंग फेशिअल करेल तुमची त्वचा परफेक्ट (Hydrating Facial For Skin In Marathi)
आय शीटमास्क असे बनवावेत
आय शीटमास्क बनवणे हे अगदी सहज शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला काही ठराविक साहित्य लागेल. जे तुम्हाला बाजारात अगदी पटकन मिळेल.
साहित्य: कॉटन पातळ फॅब्रिक( फडताळाप्रमाणे सुती कपडा), गुलाबपाणी, अॅलोवेरा जेल, कॉटन वाईप्स
कृती:
- तुम्हाला कोणत्या गुणधर्मांनी युक्त असे वाईप्स हवे आहेत ते ठरवा. त्यानुसार तुम्हाला आणखी काही घटक त्यामध्ये घालता येतील. एक स्वच्छ रिकामी आणि गोलाकार डबा घ्या. गोल आकारात वाईप्स कापून घ्या. त्यांना डोळ्याचा आकार देण्यासाठी बाजारात जसा आकार असतो तसा आकार कापण्याचा प्रयत्न करा.
- एका भांड्यात गुलाब पाणी / अॅलोवेरा जेल / व्हिटॅमिन E / बदामाचे तेल जे तुम्हाला हवे ते त्यामध्ये घाला. पण एक बेस म्हणून तुम्हाला त्यामध्ये गुलाब पाणी घाला. आता ओले झालेले वाईप्स आता रिकाम्या डब्यात भरा.
- ज्यावेळी तुम्हाला आय शीट मास्क वापरायचे असेल त्यावेळी एका प्लास्टिक चमच्याने एक एक काढून तुम्ही डोळ्यांच्या खाली ठेवा. साधारण 10 मिनिटांसाठी ठेवा.
आय शीटमास्कचे फायदे
डोळ्यांच्या शांततेसाठी जर तुम्ही आय शीटमास्क वापरायचा विचार करत असाल तर त्याचे फायदे जाणून घेणे देखील गरजेचे आहे.
- डोळ्यांना हवा असलेला थंडावा तुम्हाला शीट मास्क लावल्यानंतर मिळतो.
- दिवसभराचा थकवा कंटाळा डोळ्यांमध्ये पटकन दिसून येतो. त्यामुळे आय शीट मास्क लावल्यामुळे डोळ्यांना एकदम शांती मिळते.
- डोळ्यांखाली येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आय शीट मास्कचा उपयोग केल्यानंतर तुमच्या डोळ्यांखालील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते
- अनेकदा डिहायड्रेशनमुळे डोळे निस्तेज वाटू लागतात. डोळ्यांना आय शीट मास्क लावल्यामुळे डोळ्यांना हायड्रेशन मिळण्यास मदत मिळते.
त्यामुळे अगदी आवर्जून आठवड्यातून एकदा तरी आय शीट मास्क लावावा.
डोळ्यांमुळे दिसत असेल वाढलेले वय तर आहेत ही कारणे