ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
perfect-samosa-at-home-tips

घरी खुसखुशीत सामोसा बनवायचा असेल तर, सोप्या ट्रिक्स

संध्याकाळच्या वेळी चहा – कॉफीसह गरमागरम समोसे (Samosa) खायला मिळाले तरत त्याची मजा काही औरच असते. विशेषतः चटपटीत चटणीसह समोसे अप्रतिम लागतात. समोसे खायला जितके अप्रतिम आणि स्वादिष्ट असतात तितकेच ते बनवायला कठीण आहेत असं वाटतं. पण तुम्ही घरीदेखील बाजारातील दुकानाप्रमाणे खुसखुशीत सामोसे नक्कीच बनवू शकता. याच्या काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. कोणत्याही त्रासाशिवाय तुम्ही घरी सामोसे बनवू शकता

कसे असावे सामोशाचे फिलिंग (Samosa Feeling)

  • जेव्हा तुम्ही सामोसे बनवता तेव्हा त्याचे फिलिंग अर्थात आतील सारण हे अत्यंत स्वादिष्ट असायला हवे, ज्यामुळे सामोशाचा स्वाद वाढतो 
  • याचे सारण तुम्ही दोन पद्धतीने बनवू शकता. पहिले म्हणजे उकडलेल्या बटाट्याचा वापर करू शकता आणि दुसरे म्हणजे बटाट्याचे लहान तुकडे कापून तुम्ही सारण बनवू शकता 
  • बटाटा उकडून नंतर व्यवस्थित मॅश करा आणि त्याची पेस्ट तयार करा 
  • तुम्ही जर बटाट्याचे सारण तयार करत असाल तर तुम्ही बटाटे लहान तुकड्यांमध्ये कापून कढईमध्ये फ्राय करून घ्या. याची चव अधिक चांगली लागते 

कसे भिजवायचे समोशासाठी पीठ 

  • समोशासाठी जेव्हा तुम्ही मैदा भिजवणार असाल तेव्हा लक्षात ठेवा की, मैदा भिजवताना त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि ओवा त्यात मिक्स करा. समोशाचा बाहेरचा हा भाग खुसखुशीत व्हावा यासाठी तुम्ही भिजवताना त्यामध्ये तेल घाला
  • समोसा तयार करण्यासाठी जेव्हा तुम्ही मैदा भिजवता तेव्हा तो जाड भिजवा. नरम पीठ भिजवल्यास, समोसा कुरकुरीत आणि खुसखुशीत बनणार नाहीत अथवा समोसे तळताना त्यात बुडबुडे येण्याची शक्यता असते 
  • मैदा भिजवताना तेल नक्की घाला नाहीतर समोसा अजिबात खुसखुशीत होणार नाही. जेव्हा तुम्ही तेल मिक्स कराल तेव्हा तेल यामध्ये व्यवस्थित मिक्स झाले आहे की नाही याची खात्री करून घ्या 
  • तुम्ही एक कप मैदा घेतला असेल तर त्यामध्ये 2 चमचे तेल घाला आणि याच प्रमाणात तुम्ही मैद्यामध्ये तेलाचे मोहन घालून मिक्स करून घ्या 
  • तुम्ही हिवाळ्याच्या दिवसात समोसा बनवणार असाल तर तुम्ही मैदा भिजवताना कोमट पाण्याचा वापर करा 
  • मैदा भिजवल्यानंतर कमीत कमी 15-20 मिनिट्स तुम्ही हे भिजवून ठेवा 

आजीच्या सोप्या ट्रिक्स (दादी माँ के नुस्खे)

  • तुम्हाला झटपट सामोसे बनवायचे असतील तर तुम्ही समोशाचे सारण थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे सारण लवकर थंड होईल आणि सामोसे लवकर बनतील 
  • जेव्हा तुम्ही सामोशासाठी गोळा लाटता तेव्हा गोल आकाराची पोळी बनवता. पण सामोशाला त्रिकोणी आकार देण्यासाठी ही गोल पोळी तुम्ही मधून अंधचंद्रकार आकारात कापून घ्या जेणेकरून तुम्हाला सामोशाचा योग्य आकार देता येईल 
  • तसंच बंद करताना तुम्ही पाण्याचा वापर करा. यामुळे समोसा फुटत नाही आणि आतील सारणही तळताना बाहेर येण्याची भीती राहात नाही
  • समोसाच्या सारणामध्ये आमचूर पावडर घालायला विसरू नका. याचा स्वाद अधिक चांगला येतो
  • मैदा भिजवताना यामध्ये ओवा आणि मीठ नक्की मिसळा 
  • तसंच तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कसूरी मेथीही कुस्करून सारणामध्ये मिक्स करू शकता. यामुळे स्वाद अधिक वाढतो 

करू नका या चुका 

  • समोसे बनवताना तुम्ही बटाट्याची गरम भाजी त्यात भरू नका 
  • मैदा भिजवताना जास्त पाण्याचा वापर करू नका आणि तेलदेखील योग्य प्रमाणात वापरा. मैदा घट्ट भिजवा 
  • समोसा तळण्यापूर्वी तेल आधी मोठ्या आचेवर गरम करून घ्या आणि मग समोसा तळताना गॅसची आच मंद करा 
  • मोठ्या गॅसवर कधीही समोसा तळू नका. असं केल्याने आतून कच्चे राहण्याची भीती असते

आम्ही सांगितलेल्या ट्रिक्स तुम्ही जर वापरल्यात तर तुम्हीही घरी खुसखुशीत सामोसा तयार करून खाऊ शकता. तसंच तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

11 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT