आपल्याकडे साडी हा पूर्वपरंपरागत चालत आलेला फॅशन प्रकार आहे. आजही महिलांचं साडीप्रेम कमी होत नाही. नव्या पिढीतील मुलींना साडी नेसायची सवय नसते हे खरं असलं तरीही साडी आवडत नाही असं सहसा होत नाही. तुम्हाला साडी नेसताना सर्वात जास्त त्रास साडीच्या निऱ्या काढताना होतो ना? खरं आहे ना? अनेक वर्ष साडी नेसणाऱ्यांनाही अजून निऱ्या काढताना त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला वाईट वाटून घ्यायची गरज नाही. तुम्हाला जर साडी नेसायची असेल आणि निऱ्या काढायला जमत नसतील तर आम्ही खास तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने साडीच्या निऱ्या कशा काढायच्या हे सांगणार आहोत. तुम्हीही या स्टेप्स वापरून नक्की साडी अगदी सुंदर पद्धतीने नेसू शकता आणि एका वेगळ्या लुकमध्ये स्वतःलाही पाहू शकता.
स्टेप – 1
सर्वात पहिले ही गोष्ट लक्षात ठेवा की, साडीच्या निऱ्या (saree plates) या नेहमी सरळ असायला हव्यात आणि सर्व निऱ्या या समान रेषेत असायला हव्यात. त्यासाठी तुमच्या साडीला व्यवस्थित इस्त्री करून ठेवा आणि त्यावर कोणतीही सुरकुती असू देऊ नका. सुरकुत्या असतील तर निऱ्या काढताना त्रास होतो आणि दिसायलाही चांगले दिसत नाही. बऱ्याचदा निऱ्या नीट असतील आणि सुरकुती असेल तर त्यामध्ये ती लाईन दिसून येते. त्यामुळे साडी नेसलेली खराब दिसते. त्यामुळे त्याला योग्य इस्त्री करून घ्या.
स्टेप – 2
त्यानंतर आता साडी नेसायला सुरूवात करा. या गोष्टीची काळजी घ्या की, साडीचा पहिला फोल्ड असेल तोच अगदी व्यवस्थित सुरू करायला हवा. त्यामध्ये उंच अथवा लहान असं करू नका. तसं झालं तर पूर्ण साडीच्या निऱ्या विस्कटतात. त्यामुळे उठता बसताना निऱ्या वेगवेगळ्या होतात. साडीच्या निऱ्यांचा पहिला फोल्ड चुकीचा असेल तर तो पेटीकोट अर्थात परकरातून बाहेर दिसून येतो आणि मग साडीचा लुक अगदीच खराब दिसतो.
स्टेप – 3
आता साडीच्या निऱ्या काढायला सुरूवात करा. पहिल्या दोन निऱ्या काढून त्या परकरच्या आत खोचा. त्यानंतर त्याच्यावर फॉलच्या बाजूने निऱ्या काढा. हा निऱ्या परफेक्ट गॅपमध्ये दिसायला हव्या. त्यानंतर या निऱ्या तुम्ही पायाच्या तळव्याखाली ओढून घ्या. त्यानंतर वरून पुन्हा एकदा तुम्ही नीट निऱ्या काढून त्या व्यवस्थित सरळ रेषेत दिसत आहेत की नाही पाहून घ्या.
ब्रायडल आऊटफिटसाठी बनारसी साडी आहे उत्तम पर्याय
स्टेप – 4
आता तुम्ही पायाच्या तळव्यांमधील निऱ्या सोडून द्या. त्यानंतर ज्या निऱ्या काढल्या आहेत त्या डाव्या बाजूला वळवा आणि परकरच्या आत तुम्ही खोचून घ्या. खोचताना त्याचा चोळामोळा होणार नाही याची काळजी घ्या. तसंच साडीचा पहिला फोल्ड टाईट आहे की नाही याचीही काळजी घ्या. साडीच्य निऱ्या काढल्यानंतर त्याला पिनअप करा. जेणेकरून त्या विचित्र दिसणार नाहीत आणि एका रेषेत राहतील. तसंच सुटणार नाहीत.
साडीचे नव्या ट्रेंडमधील 5 प्रकार – कशी नेसावी साडी
स्टेप – 5
बऱ्याचदा पहिला फोल्ड काढल्यानंतर जेव्हा साडीच्या निऱ्या तयार होतात तेव्हा साडीचा काही भाग बाजूला उरतो. तो भाग महिला बऱ्याचदा तसाच परकरात खोचतात. मग त्यामुळे साडीचा लुक खराब होतो. त्यामुळे तुम्ही साडीच्या निऱ्यांसह हा भाग का अॅडजस्ट करता येईल आणि कसा व्यवस्थित दिसेल याकडेही लक्ष द्यायला हवे.
या 5 सोप्या स्टेप्सचा वापर करून तुम्ही साडीच्या निऱ्या अगदी सुंदर पद्धतीने काढून तुमचा लुक उत्तम करू शकता. तसंच एकदा हाताला सवय झाली की तुम्ही पटकन अगदी 5 मिनिट्समध्येही साडी नेसू शकता. तुम्हाला साडी नेसताना कोणतीही अडचण येणार नाही.
सेलिब्रिटींची पसंती ठरतेय महाराष्ट्रीयन खणाची साडी
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक