ADVERTISEMENT
home / Festival
गुढीपाडव्यासाठी घरीच बनवा गुढीसाठी साखरगाठी

गुढीपाडव्यासाठी घरीच बनवा गुढीसाठी साखरगाठी

गुढीपाडवा आला की,घरात उत्साहाचे वातावरण असते. गुढी सजवण्यासाठी तुम्हीही घरी तयारी सुरु केली आहे का? गुढीसाठी काठी, गुढीला नेसवायला सुंदर साडी, ताम्हण आणि हो साखर गाठी… साधारण गुढीपाडवा जवळ आला की, रंगीबेरंगी साखरगाठी दुकानात दिसू लागतात. गोड लागणाऱ्या साखरगाठी गुढीला अगदी आवर्जून लावल्या जातात. या साखर गाठी बनवणे फार काही कठीण नाही. यंदा जर तुम्हाला घरीच अशा साखरगाठी बनवायच्या असतील तर आम्ही तुमच्यासोबत एक सोपी रेसिपी शेअर करत आहोत जी तुम्हाला अगदी सहज करता येईल. चला जाणून घेऊया पाडवा स्पेशल साखरगाठीची रेसिपी आणि द्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा (gudi padwa wishes in marathi).

साखरगाठी का लावतात?

साखरगाठी

Instagram

खास गुढीपाडव्याच्याच मुर्हुतावर या ‘साखरगाठी’ मिळतात. पण या साखरगाठी लावण्याचे मुख्य कारण अजूनही कोणालाही फारसे माहीत नाही. जुन्या काळात फारसे गोड उपलब्ध नसावे म्हणूनच साखरेचा उपयोग करुन अशा प्रकारच्या गाठी तयार जात असाव्यात. शिवाय साखरगाठी या लावायला खूपच सोप्या असतात. त्यामुळेच कदाचित साखरगाठी  लावल्या जात असाव्यात. 

गुढीपाडव्यासाठी‌ ‌खास‌ ‌रांगोळी‌ ‌डिझाईन्स‌ ‌(Rangoli‌ ‌Designs‌ ‌For‌ Gudhi Padwa)

ADVERTISEMENT

घरीच अशा बनवा साखरगाठी

Instagram

साखरगाठी या नुसत्या साखरेपासून बनवल्या जात असल्या तरी देखील त्यामध्ये थोडे इतर काही जिन्नस घातले जातात. त्यामुळे अगदी सहजच तुम्हाला करता येतील.

 साहित्य:
1 ते 2 वाटी साखर, लिंबाचा रस, मोल्ड,पांढरा स्वच्छ दोरा, चिमूटभर सोडा

कृती: 

ADVERTISEMENT
  • एका भांड्यात साखर घ्या. त्यामध्ये साखर बुडेल इतकेच पाणी घ्या. साखर चांगली विरघळली की त्यामध्ये लिंबाचा रस घाला. लिंबाचा रस घातल्यामुळे साखरेतील अस्वच्छता निघून जाईल. 
  • त्यामध्ये थोडासा इनो घातल्यानंतर थोडासा फेस येईल. पण गॅस बंद करुन त्यामध्ये इनो घाला. 
  • एकतारी साखरेचा पाक तयार झाल्यानंतर तुमच्या आवडीचे मोल्ड रचा. आणि त्यामध्ये साखरेचे लिक्विड घाला. त्याला छान वाळू द्या.  तुमची साखरगाठी तयार 

गुढीपाडव्यासाठी असा करा परफेक्ट महाराष्ट्रीयन लुक

अशी सजवा गुढी

गुढी घरीच सजवण्याचा विचार करत असाल तर  अगदीच सोपे आहे. यासाठी तुम्हाला एक लांब काठी आणि बांबू लागेल. एखादी गडद रंगाची साडी घेऊन त्याला मध्ये फोल्ड करा. त्याच्या  निऱ्या काढून ती बांधून घ्या. त्यावर साखरगाठी बांधून हार लावून घ्या.  त्यावर ताम्हण उलटे त्याला हळदी-कुंकवाची बोट ओढून घ्या. तुमची गुढी तयार. 

आता घरीच बनवा साखरेच्या या टेस्टी गाठी

You Might Also Like

ADVERTISEMENT

Gudi Padwa Wishes in English

09 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT