Festival

नववर्षाचं पर्व साजरं करा.. गुढीपाडवा शुभेच्छा संदेश द्या (Gudi Padwa Wishes In Marathi)

Aaditi DatarAaditi Datar  |  Jan 2, 2020
Gudi Padwa Wishes In Marathi

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. महाराष्ट्रासोबतच गुढीपाडवा दाक्षिणात्य राज्यात आणि गोव्यातही उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. या नववर्षाच्या निमित्ताने आवर्जून एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मराठी (gudi padwa wishes in marathi) दिल्या जातात. या लेखात आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने दिले जाणाऱ्या शुभेच्छा म्हणजेच गुढीपाडवा एसएमएस (gudi padwa sms in marathi), गुढीपाडवा कोट्स (gudi padwa quotes in marathi) आणि गुढीपाडवा स्टेटस (gudi padwa status in marathi) पाहणार आहोत.

गुढीपाडवा मराठी शुभेच्छा कुटुंबासाठी – Gudi Padwa Wishes In Marathi For Family

Gudi Padwa Wishes In Marathi

Gudi Padwa Wishes In Marathi

आपल्या परिवाराला हक्काने शुभेच्छा द्या या शुभ सणाच्या निमित्ताने आणि साजरा करा नववर्षाचा जल्लोष. 

1. नवीन पल्लवी वृषलतांची, नवीन आशा नववर्षाची, चंद्रकोरही नवीन दिसते, नवीन घडी ही आनंदाची, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. 

2. नव्या संकल्पांनी करूया नववर्षाचा शुभारंभ, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. 

3. नववर्षाभिनंदन आईबाबा आणि आजीआजोबा.  

4. नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

5. नवंवर्ष नवा हर्ष….नवा जोश नवा उत्कर्ष…..नववर्षाभिनंदन. 

6. नव्या वर्षात आपल्या सर्वांच्या स्वप्नांना मिळो नवी भरारी, आयुष्याला लाभो तेजोमयी किनार, हीच सदिच्छा…नववर्षाच्या निमित्ताने आज !

वाचा – पहिल्या पाडव्यासाठी नवरदेवाचे उखाणे

7. नववर्षाची सुरूवात होवो न्यारी..सुखसमृद्धीने सजो आपली गुढी..हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी

8.आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला चला करू पुन्हा नव्याने सुरूवात एका चैतन्याच्या अध्यायाला..गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. 

9. पडता दारी पाऊल गुढीचे, आनंदी आणि मांगल्यमय होई जग सारे, या सणाला करू आनंदाचा जल्लोष कारण आले आहे हिंदू नववर्ष

10. पाडव्याची नवी पहाट, घेऊन येवा तुमच्या आयुष्यात सुखाची लाट, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. 

11. सण आला सौख्याचा पण काळजी घ्या
सण आणि शुभेच्छा देण्याच्या नादात 
कोरोनाची करू नका साथ
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

12. नववर्ष आला आता आपला फळांचा राजा पण येणार
मग तयार व्हा आणि नववर्षात ताव मारायला 
नववर्षाच्या आंबामय शुभेच्छा 

13. वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष 
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा 

14. यंदाही दिली नाही कोरोनाने भेटीची परवानगी
लांब राहून आपणही करूया त्याची रवानगी
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

15. लांब असू आपण या वर्षीही नाही होणार गाठीभेटी
तरी गुढी उभारताना आईबाबा नक्कीच होईल इमोशनल तुमची बेटी 
मिस यू आईबाबा…गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

गुढीपाडवा शुभेच्छा संदेश – Happy Gudi Padwa SMS In Marathi

गुढीपाडवा-शुभेच्छा-संदेश

इंग्रजी नववर्षाच्या सुरूवातीला शुभेच्छा देण्यापेक्षा हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देणं जास्त महत्त्वाचं आहे. 

1. नवी सकाळ, नवी उमेद, नवे संकल्प, नवा आनंद..तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा

2. चारी दिशांना आनंदाची आहे बहार..गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद..दारी सजली आहे रांगोळी..आसमंतात आहे पतंगाची रांग..नववर्ष  तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं 

3. आनंद होवो ओव्हरफ्लो..मस्ती कधीही न होवो लो..धनधान्याचा होवो वर्षाव..असं जाओ तुम्हाला नववर्षाचं पर्व 

4. ऋतूने बदलतं हिंदू वर्ष..नवं वर्ष येताच येते बहार..सगळीकडे दिसतो हा सुंदर बदल..असं असतं नववर्षाचं हे पर्व

5. तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद..विद्या मिळो सरस्वतीकडून..धन मिळो लक्ष्मीकडून..प्रेम मिळो सगळ्यांकडून..पूर्ण होवो प्रत्येक इच्छा..हॅपी गुडीपाडवा

6. दिवस उगवतो दिवस मावळतो वर्ष येतं वर्ष जातं पण प्रेमाचे बंध कायम रहातात, आपलं नातं असं दरवर्षी वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा, सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

7. गुढी उभारली असेल आज तुमच्याही दारी, चैतन्य आहे आज सर्वदारी…चला उत्साहाने साजरा करू नववर्षाचा हा आनंदोत्सव…शुभ गुढीपाडवा. 

8. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 

9. आशा-आकांक्षांचे बांधून तोरण..समृद्धीची गुढी उभारू द्वारी. गुढीपाडव्याच्या आणि नववर्ष पर्वाच्या हार्दीक शुभेच्छा. 

10. आयुष्य एका स्वप्नासारखे जगावे..प्रत्येक संवेदनेला जगून पाहावे..नववर्षाची नवी पहाट अनुभवताना..आपल्या सर्वांना मिळो नवी वाट..हॅपी गुढीपाडवा 

11. जुन्या गोष्टी मागे सोडून, स्वागत करूया नववर्षाचे, प्रगतीने आणि उत्साहाने भरलेले असो..तुमचे नववर्ष हे येणारे 

12. गुढीपाडवा आला आहे सुखसमृद्धीचा क्षण आला आहे नवा प्रवास नवा ध्यास घेऊन आला आहे आजचा दिवस खास 

13. नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र, चांदीचा तांब्या, कडुनिंबाची पानं, साखरेची माळ, अशी उभारूया समृद्धीची गुढी. नववर्षाभिनंदन. 

वाचा – रांगोळीचे विविध प्रकार आणि साध्या डिझाईन्स (Simple Rangoli Designs In Marathi)

14. नूतन वर्षाच्या तुमच्या संपूर्ण कुटुंबाला लक्षलक्ष शुभेच्छा. 

15. समृद्धीच्या गुढीसोबतच उभारूया विश्वास आणि प्रेमाची गुढी, मनातली काढूया अढी, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. 

16. रेशमी गुढी, कडुनिंबाचं पान, हे वर्ष तुम्हाआम्हा सगळ्यांना जावो छान, आमच्या कुटुंबातर्फे तुम्हाला नववर्षानिमित्त सदिच्छा. हॅपी गुढीपाडवा. 

17. हॅपी गुढीपाडवा

18. श्रीखंडपुरीची लज्जत, गुढी उभारण्याची लगबग, सण आहे आनंदाच आणि सौख्याचा तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. 

19. सण आला दारी, घेऊन शुभेच्छांची वारी, तुम्हाला जाओ नववर्ष छान, गुढीपाडवाच्या शुभेच्छा. 

20. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणं घेऊन आली सोनेरी दिवस, आला नववर्षाचा सण घेऊन आला सोनेरी भरारी. नववर्षाभिनंदन.

21. नववर्षाच्या आरंभाने होईल जुन्याचा नायनाट
अशीच सगळ्यांनी मिळून लावू कोरोनाची विल्हेवाट

22. यंदा उभारूया मास्कची गुढी 
दूर करूया मनातली जुनी अढी
तुम्हा सर्वांना नववर्षाभिनंदन 

23. यशासोबतच यंदा कोरोनावर मात करू 
जे होऊन गेले मागच्या वर्षी ते विसरू
आता नव्याने करू सुरूवात घेऊया
यशाची गुढी हातात. 
गुढीपाडव्याच्या गोड शुभेच्छा

24. पुन्हा होईल सर्व सुरळीत सांगत आहे नववर्ष
दूर होईल मनावरचं मळभ आणि होईल हर्ष
आनंदी राहा आणि गुढीपाडवा साजरा करा

25. घरीच राहू, गुढी उभारू, मग कशाला कोरोनाची भीती, सगळ्यांना आरोग्यदायी नववर्षाच्या शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मित्रमैत्रिणींसाठी – Happy Gudi Padwa Wishes In Marathi For Friends

happy gudi padwa in marathi -गुढी पाडवा शुभेच्छा

आपल्या मित्रमैत्रिणींना तर शुभेच्छा आवर्जून दिल्याच पाहिजेत. मग तुम्हीही आपल्या मित्रपरिवाराला नक्की पाठवा पुढील शुभेच्छा संदेश.

1. वडिलधाऱ्यांचा करा सन्मान..लहान्यांना द्या प्रेम..याच संकल्पाने करा नववर्षाचा जल्लोष

2. आली आहे बहार नाचूया गाऊया..एकत्र येऊन आनंद साजरा करूया..निसर्गाची किमया अनुभवूया..एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया.

3. निळ्या आभाळात शोभते उंच गुढी..नववर्ष आले घेऊन आनंदाची गोडी..गुढीपाडव्याच्या लाखलाख शुभेच्छा.

वाचा – गुढीपाडव्याचा झटपट तयार होणारा महाराष्ट्रीयन खास मेनू

4. नवीन पालवी आल्याने वृक्ष आहे आनंदी..अशाच मौसमात होते नवी सुरूवात..हॅपी न्यू ईयर साजरा नका करू..निसर्गाचा आनंदोत्सव असलेला हा गुढीपाडवा साजरा करूया

5. वृक्षांवर सजली आहे नवीन पानांची बहार..हिरवळीने सुंगधित झाली आहे निसर्ग अपरंपार..चला उभारूया गुढी, आनंदाची आणि समृद्धीची..हॅपी गुढीपाडवा

6. जुन्या आठवणीचं बांधून गाठोडं…करूया नव्या वर्षाचं स्वागत..जे घेऊन आलं आहे आनंदाचं पर्व…उभारूया गुढी परंपरागत…हॅपी गुडीपाडवा

7. हिंदू नववर्षाची सुरूवात..कोकिळा गाते प्रत्येक फांदीवर..चैत्र मास शुक्ल प्रतिपदेच्या पर्वावर..आनंदाचा क्षण घेऊन आलं आहे नववर्ष

8. नवा दिवस नवी सकाळ..चला एकत्र साजरं करूया..गुढीचं पर्व आणि एकमेकांना देऊया शुभेच्छा.

9. समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षासाठी हार्दिक शुभेच्छा.

10. नववर्ष आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…माझ्या मित्रपरिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

11. चैतन्यमय झाला सर्व परिसर नव्या पालवीने
गुढीपाडव्याची सुरूवात करू चांगल्या आठवणीने 

12. कोरोनाने केला हाहाकार
पण निसर्ग घेऊन आला आहे नवी बहार
नववर्षाभिनंदन… 

13. पुन्हा एकदा चैतन्याने गुढी उभारू
एकमेंकाना साह्य करू
नव्याने हिंदू नववर्षाला प्रारंभ करू 

14. कितीही दुःख आली तरी नवी सुरूवात होतेच
हाच घेऊनी संदेश आले आहे नवचैतन्याचे नववर्ष
गुढीपाडव्याच्या हार्दिश शुभेच्छा 

15. गो कोरोना म्हणता म्हणता पूर्ण वर्ष गेले
मग काय झाले पुन्हा हिय्या करू आणि पुन्हा कोरोनाला गो कोरोना गो करू 
गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा सज्ज होऊ 

गुढी पाडवा शुभेच्छा कोट्स – Happy Gudi Padwa Quotes In Marathi

गुढी पाडवा शुभेच्छा कोट्स - Happy Gudi Padwa Quotes In Marathi

गुढीपाडव्याचं मंगलपर्व आहे म्हटल्यावर एकमेकांना शुभेच्छा देताना तुम्ही हे गुडी पाडवा कोट्सही वापरू शकता. 

1. उभारून गुढी, लावू विजयपताका…नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

2. वर्षामागून वर्ष जाती, नवे क्षण नवी नाती घेऊनि येते नवी पहाट तुमच्यासाठी…नववर्षाभिनंदन. 

3. मंगलमय गुढी..लेऊनी भरजरी खण..आनंदाने साजरा करा पाडव्याचा सण

4. नव्या वर्षात होऊ दे मनाला नव्या विचारांचा स्पर्श, नवे वर्ष मग आणेल आयुष्यात नवा हर्ष..नववर्षाभिनंदन.

5. घरात आला आहे शुभ संदेश, गुढीचा करून वेष आले आहे नववर्ष, नववर्षाभिनंदन. 

6. नव्या वर्षाची करा दमदार सुरूवात आणि लिहा नव्या इतिहास. 

7. एक ताजेपणा, एक नाविन्य नवीन वर्षात करू काही नाविन्यपूर्ण…नववर्षाच्या शुभेच्छा. 

8. चला पुन्हा घेऊन नवी उमेद साजरं करू हे नवं वर्ष. 

9. आयुष्याला मिळेल नवी कलाटणी, चला गुढी उभारू आनंदाची. नवंवर्षाभिनंदन.

10. सुख-दुखाप्रमाणेच गुढीतही आहे कडू-गोड चवीचा मेळ..तसाच आहे जीवनाचा हा खेळ…पुन्हा घेऊ नव्या ध्यास आणि सुरूवात करू या नवीन वर्षाला खास.

वाचा – महाराष्ट्राची शान नऊवारी नेसण्याचे प्रकार

11. देवाच्या कृपेन सर्व संकट होऊ दे दूर
मनातील चिंता आणि हूरहून होऊ दे दूर
नववर्ष आलं आता तरी जा रे बाबा कोरोना दूर
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

12. गुढी उभारली, फुलं वाहिली, नमस्कार केला वाकून
देव म्हणाला जाईल कोरोनाच संकट तुम्ही फिरा तोंड झाकून 

13. मास्कची नवलाई अजूनही कायम आहे 
कोरोनाची चिंता अजूनही कायम आहे
तरीही नववर्षाची आतुरताही कायम आहे
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 

14. गुढी उभारून देवाला करा गाऱ्हाणं 
पुढच्या वर्षी नको देवा कोरोनाचं असणं 
आरोग्यदायी नववर्षाच्या शुभेच्छा 

15. सॅनिटायजर ठेवा सोबत मास्क लावा तोंडावर
नाहीतर नवीन वर्षात भेटीला येईल कोरोना आणि आनंद जाईल लांबवर 

गुढीपाडवा संदेश व्हॉट्सअपसाठी – Gudi Padwa Status In Marathi

गुढीपाडवा शुभेच्छा संदेश - Happy Gudi Padwa SMS In Marathi

गुढीपाडव्याच्या निमित्ताने एकमेकांची भेट नाही घेतली तरी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून मात्र शुभेच्छा संदेश आवर्जून पाठवले जातात. पाहा व्हॉट्सअपसाठी खास गुढीपाडवा संदेश. 

1. या वर्षी मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणार नाही तर तिघांना तुमच्याकडे पाठवणार आहे. ते म्हणजे सुख, शांती आणि समृद्धी…!!! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

2. एकनिष्ठ…कट्टर…मग येतात, नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला देणारे

3. आपलं नवीन वर्ष एकच गुढीपाडवा…नो हॅपी न्यू ईयर फक्त हॅपी गुडीपाडवा. 

4. नवचैतन्य आणते नववर्ष, श्रीखंड-पुरीचा आस्वाद घेत करा नवा संकल्प, चला करूया नववर्षाचा आरंभ. 

5. आनंदाची शिदोरी घेऊन आला गुढीपाडवा नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

6. आई भवानीच्या कृपेने नववर्षात मनासारखे घडू दे…!! सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!

7. तुमच्या इच्छाआकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…नववर्षात उभारा गुढी यशाची…नववर्षाभिनंदन. 

8. आयुष्याच्या वीणेवर छेडा सुखाचा सूर, नववर्ष घेऊन आले चैतन्याचा सण…गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. 

9. आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार, हाच विचार मनात घेऊन करूया नव्या वर्षाला सुरूवात. नववर्षाभिनंदन. 

10. गुढीपाडव्याच्या अनेक आख्यायिका आहेत..पण मला एकच माहीत आहे ती म्हणजे श्रीखंड-पुरी खाण्याची. नववर्षाभिनंदन. 

11. जुन्या आठवणींचं गाठोडं बांधून 
पाहूया नववर्षाची वाट
जे आणेल आनंदाची बहार
अशी गुढीपाडव्याची परंपरागत सुरूवात
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 

12. नव दुर्गांच्या आगमनाने सजते नववर्ष
गुढी उभारल्याने बहरते हे नववर्ष
कोकिळा म्हणते नववर्षाचा मल्हार
निसर्गाच्या संगीताला येतो आकार
चैत्राच्या सुरूवातीने होतो नवआरंभ
हाच आहे हिंदू नववर्षाचा प्रारंभ
हॅपी गुडी पाडवा

13. आयुष्य एक वीणा आणि सूर भावनांचे
गाऊया धुंद मग्न होऊन संगीत हिंदू नववर्षाचे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

14. गुढीपाडव्याच्या अनेक कथा 
गुढी आहे विजयाची पताका
वृक्ष सजतो चैत्र महिना
म्हणून हे आहे हिंदू नववर्ष
हॅपी गुढीपाडवा

15. कोरोनाला टाळू घरोघरी गुढी उभारू
नवचैतन्याने पुन्हा एकदा आयुष्य उभारू

मग तुम्हीही आपल्या जवळच्यांना आणि मित्रपरिवाराला यंदा खास गुढीपाडव्याच्या शुभेच्छा नक्की द्या.

You Might Also Like

Gudi Padwa Wishes in English