ADVERTISEMENT
home / Festival
गुढीपाडवा: माहिती, महत्त्व, पूजा विधी | Gudi Padwa Information In Marathi 2022

गुढीपाडवा: माहिती, महत्त्व, पूजा विधी | Gudi Padwa Information In Marathi 2022

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी 2 एप्रिल 2022 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपरिक वेषभूषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी गुढीपाडवा निमित्त रांगोळ्या, देखावे,  शोभायात्रा काढून, एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात आणि मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं. यासाठीच जाणून घ्या गुढीपाडवा माहिती… यासोबतच यंदाच्या गुढीपाडव्यासाठी‌ ‌खास‌ ‌रांगोळी‌ ‌डिझाईन्स‌ ‌(Rangoli‌ ‌Designs‌ ‌For‌ Gudi Padwa)‌

 

गुढीपाडवा इतिहास (History of Gudi Padwa In Marathi)

गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा (गुढीपाडवा इतिहास) सांगितल्या जातात. असं म्हणतात की, महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली  कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरूवाताला तिची पुजा केली. या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढी पुजन केले जाऊ लागले. इतिहासात या दिवशी ब्रम्हदेवाने विश्व निर्मिती केली असं वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे.  पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येला परत आले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. म्हणूनच यशाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गुढीपाडवा का साजरा करतात यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरलं आणि तृतीयेला झालं होतं. म्हणूनच या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पुजा केली जाते. 

गुढीपाडव्याचे महत्त्व (Gudi Padwa Information in Marathi)

गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ सापडत असले तरी आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. आजच्या आधूनिक युगातही या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुडी पाडवा महत्व जाणून घेणं फार गरजेचं आहे. वास्तविक प्रत्येक सण साजरा करण्यामागे पुर्वजांचे काही उद्देश असतात. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो याचं प्रतिक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जातात. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी. नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातो. प्राचीन काळापासून  चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील किड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं. कडुनिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे. शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळही केली जाते. ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो. गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या अशा अनेक गोष्टींना विशेष महत्त्व असतं. मात्र त्यासाठी प्रत्येकाला गुढीपाडवा माहिती माहीत असायला हवी.

ADVERTISEMENT

1. गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते

काही जणांना विशेषतः नव्या पिढीला गुढी कशी उभारावी माहिती (Gudhi Kashi Ubharavi) कमी असलेली दिसून येते. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो. यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात. एक उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ केले जाते. त्याला रेशमी साडी अथवा वस्त्र नेसवून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा तांब्या, कडूलिंब, आंब्याची पाने, साखरेची माळ, फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते. घराच्या दारात अथवा खिडकीत गुढी उभारण्यात येते. गुढी हे स्नेहाचे, मांगल्याचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतिक मानले जाते. ज्यामधून विजयपताका उभाल्याचा आनंद व्यक्त होत असतो. घराबाहेर रांगोळी काढली जाते.

गुढीपाडवा इतिहास आणि उत्सवाचा आनंद

2. गुढीपाडव्याला करतात पारंपरिक वेशभूषा

गुढीपाडवा हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा सण आहे. शिवाय या दिवसापासून मराठी नवीन वर्षाला सुरूवात होते. सहाजिकच या नवीन वर्षाचे स्वागत पारंपरिक वेशभूषेने केले जाते. महिला गुढीपाडव्याच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे साडी लूक्स परिधान केलेल्या दिसतात. . महिला या दिवशी खास नऊवारी साडी, नथ, ठुशी असे पारंपरिक दागदागिने घालतात तर पुरुषमंडळी धोती, सलवार, कुर्ता असा पारंपरिक पेहराव करतात.

गुढीपाडवा साजरा केला जातो पारंपरिक वेषभुषेने

ADVERTISEMENT

3. गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढली जाते –

महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणीदेखील गुढीपाडवा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. रस्त्यावर चौकाचौकात मोठमोठया रांगोळ्या काढल्या जातात, पारंपरिक वेशभूषा केली जाते, लोझिम, ढोल ताशे आणि भव्यदिव्य देखावे करून मोठी शोभायात्रा काढली जाते. शहरातील सर्व समाजातील लोक यात सहभाग घेतात आणि मराठी नवीन वर्षाचे स्वागत करतात.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम 

2022 मध्ये गुढीपाडवा कधी साजरा होईल? Gudhi Padwa 2022 Information In Marathi

2022 मध्ये, हा पवित्र सण शनिवार, 2 एप्रिल रोजी साजरा केला जाईल.

हिंदू धर्मातील कोणत्याही सणाचे स्वतःचे महत्त्व असते आणि ते लोकांना नीट समजून घेणे आवश्यक असते. इंग्रजी सभ्यतेच्या जाळ्यात अडकून कुठेतरी आपण आपली प्राचीन व पुरुषी संस्कृती विसरत चाललो आहोत. हा लेख सादर करण्यामागचा आमचा उद्देश आपल्या सर्वांना आपल्या प्राचीन सणांची आणि पवित्र प्रसंगांची जाणीव करून देणे हा होता. आपला हिंदू धर्म आणि आपली भारतीय सांस्कृतिक सभ्यता आपण नेहमी विसरता कामा नये.

ADVERTISEMENT

गुढीपाडवा पूजा विधी | Gudi Padwa Puja Vidhi 2022

शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार केले आणि त्यावर पाणी शिंपडले, त्यांना जीवन दिले आणि प्रबळ शत्रूचा पराभव केला. त्याच्या विजयाच्या अपेक्षेने शालिवाहन शक सुरू झाला. त्याच दिवशी या कथेचा मथितार्थ असा की, त्यावेळी संपूर्ण हिंदू समाज बेहोश झाला होता. गुलामगिरी इतकी मादक बनली होती की ती भूतकाळाची गोष्ट बनली होती. समाजात क्षेत्रतेज संपले होते. शालिवाहनने आपल्या सामर्थ्याचा विसर पडलेल्या समाजात आत्मविश्वास आणि सशक्तीकरण निर्माण केले. त्याच दिवशी रामाने बळीचा पराभव करून दक्षिणेतील लोकांना शांत केले. यावेळी सर्वांनी ध्वजारोहण करून आनंद साजरा केला. असेही मानले जाते की लंका जिंकून श्रीराम अयोध्येला परतले तेव्हा लोकांनी ध्वजारोहण करून त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.\

गुढी पाडवा साठी रेसिपी | Gudi Padwa Recipes In Marathi

गुढीपाडवा हा खास महाराष्ट्रीयन पदार्थांसाठीही ओळखला जातो. पंगती फूड देखील या दिवशी कुटुंब किंवा मित्रांसोबत अतिशय खास साग्रसंगीत पद्धतीत शैलीत दिले जाते. महाराष्ट्रीयन थाळी म्हटलं की मनात येणारे पदार्थ म्हणजे श्रीखंडपुरी, खीरपुरी, बासुंदीपुरी, भाजीपुरी, पुरणपोळी, मसालाभात, कोशिंबीर, चटण्या, लोणचे, पापड, सीताफळ किंवा आलू वड्या, बत्तावडे किंवा भजी. या महाराष्ट्रीयन डिशमध्ये सर्व प्रकारचे स्वाद आणि रंग आहेत. जणू काही खाद्यपदार्थ आपल्या चव आणि रंगाने नवीन वर्षाचे स्वागत करत आहेत. त्यामुळे यंदा गुढीपाडवा साजरा करण्यासाठी काही खास महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ घरीच तयार केले पाहिजेत.

गुढी पाडवा साठी रेसिपी सविस्तर शिकण्यासाठी तुम्ही आमची हि पोस्ट वाचू शकतात – गुढीपाडव्यासाठी पारंपरिक आणि स्पेशल 14 पदार्थ

हे ही वाचा –

ADVERTISEMENT

Gudi Padwa Wishes In English

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

26 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT