मेथीचा कडवटपणा खूप जणांना आवडत नाही. त्यामुळेच मेथीपासून बनवलेले लाडूही खूप जणांना आवडत नाही. मेथीचे लाडू ज्यांना खूप आवडतात. त्यांना मेथीचे लाडू खाताना काही वाटत नाही. पण काही जणांना मेथीचा लाडू हा मुळीच आवडत नाही. कारण मेथीचा लाडू कडू असल्यामुळेच असा लाडू खाणे ते टाळतात. पण घरीच मेथीचा चविष्ट आणि पौष्टिक असा लाडू बनवता येऊ शकतो. हा लाडू बनवणे फारच सोपे आहे. मेथी ही आरोग्यासाठी फारच चांगली असते. वजन कमी करणे, डाएबिटीज नियंत्रणात ठेवणे, पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन वाढवण्यासाठी आणि अन्य अनेक फायद्यांसाठी मेथीचे लाडू हे फारच फायद्याचे ठरतात. मेथीचा लाडू घरी बनवण्याचा विचार करत असाल तर मेथीचा लाडू बनवण्याची सोपी पद्धत
असा बनवा मेथीचा लाडू
मेथीचा लाडू घरीच बनवायचा विचार करत असाल तर तुम्ही अशापद्धतीने मेथीचा लाडू बनवू शकता.
साहित्य: 1 वाटी मेथीचे दाणे, 1 ½ वाटी मूग डाळ, चवीनुसार गुळ पावडर, ½ वाटी डिंक, खारीक पूड, काजू-बदाम यांची पूड, तूप, वेलची पूड
कृती :
एक मोठी कढई घेऊन त्यामध्ये तुम्हाला मेथीचे दाणे भाजायला घ्यायचे आहेत. मेथीचे दाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
मेथी दाणे जास्त घातले तरच लाडू कडू होतो. तो कडवटपणा टाळण्यासाठी आणि मेथीसोबत अन्य काही गोष्टींचे फायदे मिळवण्यासाठीच त्यामध्ये मूग डाळ घातली जाते. त्यासाठीच मेथीनंतर तुम्ही मूग डाळ भाजून घ्या. त्याच कढईत तूप गरम करुन त्यामध्ये डिंक फुलवून घ्या. उरलेले सगळे साहित्य जवळ ठेवा.
आता एका मोठ्या पसरट भांड्यात मूग डाळ आणि मेथी दाणे थंड करायला ठेवा. एक मिक्सरचे भांडे घेऊन थोडे रवाळ अशी याची पूड करुन घ्या. लाडू हा टाळूला चिकटू द्यायचा नसेल तर त्यात थोडी कणी लागलेली चांगली लागते. त्यामुळे मिक्सरमधून हे काढताना त्यामध्ये रवा राहील याची काळजी घ्या.
मेथी आणि मूग डाळीचे हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. आता त्यामध्ये गूळाची पावडर, फुलवून वाटलेला डिंक, खारीक पूड, काजू-बदाम पूड , वेलच पूड आणि गरम केलेल तूप त्यामध्ये घाला.
आता एक- एक करुन लाडू वळून घ्या. तुमचे तुपाचे मस्त लाडू तयार
मेथीच्या लाडूमध्ये अशा अनेक गोष्टी एकत्र केल्यामुळे ते अधिक पौष्टिक बनतात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने घरीच हे मेथीचे लाडू करा.
अधिक वाचा
नागपंचमीसाठी बनवा खास पुरणाचे दिंड
श्रावणातच आहे खमंग, कुरकुरीत अळूवडीचा खरा स्वाद, रेसिपी खुमासदार!
कडू कारल्याची भाजी अशी करा चविष्ट आणि मिळवा फायदेच फायदे