ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
how to make tasty dishes from leftover cakes in marathi

उरलेल्या केकपासून बनवा हे स्वादिष्ट पदार्थ

बर्थ डे हा प्रत्येकासाठीच खास असतो. आजकाल लहान असो वा मोठी व्यक्ती प्रत्येकासाठी घरी वाढदिवसाचा केक मागवला जातो. काही जण आवडीने घरातच केक बनवतात. आजकाल इतरांच्या बर्थडेला केक घेऊन जाण्याची अथवा ऑनलाईन केक पाठवण्याची पद्धत आहे. ज्यामुळे बर्थडे घरात जवळजवळ दोन ते चार केक नक्कीच असतात. घरात माणसं कमी असतील तर केक खूप उरण्याची शक्यता असते. अशा वेळी उरलेल्या केकचं काय करायचं हा प्रश्न असतो. कारण केक जास्त दिवस टिकू शकत नाहीत एक ते दोन दिवसांत केक संपवणं गरजेचं असतं. अशा वेळी तुम्ही उरलेल्या केकपासुन घरीच निरनिराळे पदार्थ बनवू शकता. ज्यामुळे व्हरायटी मिळाल्यामुळे उरलेला केक लगेच संपेल आणि वाया जाणार नाही.

असे बनवा घरीच तुमचे आवडते आईस्क्रिम केक (Ice Cream Cake Recipe In Marathi)

उरलेला केक वापरून बनवा हे स्वादिष्ट पदार्थ

उरलेल्या केकचा वापर कसा करायचा हे तुम्हाला एकदा कळलं की घरात कधीच उरलेला केक फेकण्याची वेळ येणार नाही. यासाठी या टिप्स फॉलो करा.

  • उरलेला केकपासून टफल्स बनवू शकता. टफल्स लहान मुलांना खूप आवडतात. त्यामुळे घरातील आणि शेजारच्या लहान मुलांना हे टफल्स देऊन त्यांचे मन जिंकू शकता. यासाठी केकचे टुकडे मिक्सरमध्ये बारीक करा आणि त्यात व्हनिला इसेन्स, चॉकलेट पावडर, ड्रायफ्रूट घालून लाडू बनवा. चॉकलेट वितळवून त्यात डिप करून मस्त फ्रीज करा.
  • उरलेला केक वापरून तुम्ही कस्टर्ड पुडिंग बनवू शकता. ज्यामुळे घरात एक वेगळा गोड पदार्थ तुम्हाला बनवता येईल. यासाठी दूध उकळून घ्या आणि त्यात थोडं कस्टर्ड पावडर टाका. शिजल्यावर त्यात केकचे तुकडे कुस्करून टाका ड्रायफ्रूटने सजवून सर्व्ह करा.
  • जर  तुम्हाला कुकीज आवडत असतील तर तुम्ही उरलेल्या केकचा वापर कुकीज बनवण्यासाठी करू शकता. यासाठी एका भांड्यात मैदा, अंडे, चॉकलेटचे तुकडे आणि बटर मिक्स करा. त्यात केक कुस्करून टाका आणि एकत्र करून कुकीजचा आकार द्या. ओव्हन प्रीहिट करून त्यात कुकीज पंधरा मिनीटे बेक करा.
  • उरलेल्या केक पासून तुम्ही मिल्क शेक बनवू शकता. यासाठी केक, आईस्क्रिम, दूध मिक्स करा आणि ग्लासात ओतून आईस्क्रिमसोबत सर्व्ह करा. चॉकलेट केक रेसिपी मराठीत, घरच्या घरी बनवा सोपे केक (Chocolate Cake Recipes In Marathi)
  • केक उरला असेल तर त्यापासून केक पॉप्स बनवणं मस्त कल्पना आहे. यासाठी तुम्हाला गरज आहे फक्त केक मिक्सरमध्ये बारीक करून घेण्याची यात बटर, चीज मिसळा आणि मस्त लाडू बनवून ते सर्व्ह करा.
  • केक उरला तर तुम्ही त्यापासून पुडिंगदेखील बनवू शकता. यासाठी केक मिक्सरमध्ये बारीक करा, त्यात बटर, दूध, ड्रायफ्रूट टाका आणि फ्रीजमध्ये सेट करा वरून चेरीने सजवून सर्व्ह करा. 

बिस्किटांपासून बनवा मस्त केक, बिस्किट केक रेसिपी (Biscuit Cake Recipes In Marathi)

ADVERTISEMENT
09 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT