ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
mehndi

मेंदीचा रंग हातावर फिका झाल्यावर, कसा काढावा पटकन

लग्नाचा सध्या सीझन सुरू आहे. अत्यंत धुमधडाक्यात लग्न आणि लग्नसोहळे सध्या साजरे होताना आपण पाहत आहोत. त्यातही सर्वात जास्त मेंदी सोहळ्याचा थाट जास्त दिसून येतो. भारतीय लग्नाचा सर्वात मोठा हिस्सा म्हणजे मेंदी, संगीत आणि लग्नसोहळा. हिंदू लग्न विधी समारंभ आणि लग्नाच्या दरम्यान हल्ली मेंदी सोहळा खास आयोजित केला जातो. लग्नाच्या आधी मेंदी लावण्याचा आणि त्याचवेळी संगीताच्या कार्यक्रमाला खूपच मजा असते. तुमचे लग्न असो अथवा तुमच्या मित्रमैत्रिणींचे. हातावर मेंदी नेहमीच शोभा वाढवते. पण लग्न झाल्यानंतर हातावरील मेंदी काही जणांना पटकन निघून जावीशी वाटते. कारण काही जणांना ऑफिसला जायचे असते तर काही जणांना जास्त दिवस हातावर मेंदी आवडत नाही. तर काही जणांना मेंदी जात असताना तिचा होणारा फिकट रंग आवडत नाही. मग अशावेळी नक्की काय करायचं असाही प्रश्न पडतो. मेंदीचा रंग हातावर फिका झाल्यानंतर तुम्हाला जर ती पटकन काढून टाकायची असेल तर काही सोपे उपाय आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. 

ऑलिव्ह ऑईल आणि मीठ (Olive Oil and Salt)

तुम्हाला मेंदी पटकन काढायची असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑईल आणि मिठाचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही एक चमचा मीठामध्ये ऑलिव्ह ऑईल मिसळून पेस्ट तयार करून घ्या. हे तुमच्या मेंदीच्या हातावर तुम्ही व्यवस्थित लावा. साधारण 10 मिनिट्स तुम्ही हे तसंच ठेवा. ही प्रक्रिया तुम्ही एक दोन दिवस करा. दिवसातून तुम्ही साधारण दोन ते तीन वेळा हे करून पाहा. यामुळे मेंदीचा रंग अधिक फिका होऊन मेंदी निघण्यास मदत मिळते. चांगल्या परिणामांसाठी काही दिवस तुम्ही हा उपाय रोज करणे आवश्यक आहे. मात्र लवकरात लवकर मेंदी जाण्यासाठी याचा उपयोग होतो. 

अधिक वाचा – हातावरील मेंदी गडद रंगण्यासाठी घरगुतीपण परिणामकारक उपाय

ब्लीच (Bleach) 

हातावरील मेंदीचा रंग काढण्यासाठी तुम्हाला चांगल्या दर्जाच्या ब्लीचची गरज आहे. तुम्ही फेशिअल हेअर ब्लीचचा वापर यासाठी करू शकता. हे ब्लीच तुम्ही मेंदी लागलेल्या हाताला लावा. यामुळे मेंदीचा रंग निघून जाण्यास मदत मिळते. काही दिवसांतच तुम्हाला हातावरील मेंदी निघून गेलेली दिसेल. ब्लीचचा अत्यंत चांगला उपयोग होतो आणि त्याशिवाय मेंदी काढायलादेखील त्रास होत नाही. 

ADVERTISEMENT

हात धुवा (Wash your hands)

दिवसातून अनेकदा हात धुतल्यास, मेंदीचा रंग फिकट होतो. तसंच मेंदी लवकर निघण्यास मदत मिळते. तुम्ही सतत हात धुत असाल तर तुम्ही त्यानंतर आपले हात मॉईस्चराईज करायला विसरू नका. अन्यथा तुमचे हात कोरडे होऊ शकतात. पण तुम्हाला लवकर मेंदी काढून हवी असेल तर तुम्ही दिवसातून जास्तीत जास्त वेळा हात धुवा. तुम्हाला अन्य रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करण्याची गरज नाही. 

मिठाच्या पाण्यात हात भिजवा (Salt Water)

कोमट पाण्यात तुम्ही मीठ मिसळून घ्या. तुमचे हात तुम्ही साधारण 15-20 मिनिट्स हात तसेच पाण्यात ठेवा. काही वेळानंतर ही प्रक्रिया तुम्ही पुन्हा करा. त्यानंतर तुमचे हात मॉईस्चराईज करून घ्या. मेंदीचा रंग लवकर उतरेल. तुम्हाला जास्त दिवस मेंदी हातावर नको असल्यास, तुम्ही ही प्रक्रिया नक्कीच आजमावू शकता. पण तुम्हाला पाण्यात जास्त वेळ हात ठेवल्यामुळे त्रास होणार असले तर कमी वेळासाठी तुम्ही हे करून पाहू शकता. 

बेकिंग सोडा आणि लिंबू (Baking Soda and Lime)

बेकिंग सोडा (Baking Soda) आणि लिंबाची (Lime) एक जाडसर पेस्ट तुम्ही बनवा. तुम्ही ही पेस्ट तुमच्या मेंदी काढलेल्या हातावर लावा. काही वेळ सुकल्यानंतर तुम्ही हे थंड पाण्याने धुऊन घ्या. वास्तविक यामुळे हात कोरडे होऊ शकतात. मात्र तुम्ही हे धुतल्यानंतर मॉईस्चराईजर लावा आणि हात व्यवस्थित ठेवा. मेंदीचे हात लवकर कोरडे होतात. त्यामुळे हातांची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
17 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT