ADVERTISEMENT
home / आपलं जग
How to Plants Grow Faster at Home Gardening Tips in Marathi

घरात लावलेली झाडे लवकर वाढावी यासाठी सोप्या टिप्स

घराच्या बाल्कनीत एखादं रोप लावलं अथवा बी पेरलं तर त्याला मोठं होताना फळा,फुलांनी लगडताना पाहणं ही एक रोमांचक गोष्ट असते. पर्यावरणाची आवड असलेल्या प्रत्येकाच्या घरात एखाद दुसरं झाड असतंच. तुळस, फुलझाडं यासोबत आजकाल भाज्यांची लागवडही घरच्या घरी करता येते. त्यामुळे होम गार्डनिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. मात्र घरातील छोट्याशा कुंडीत झाड लावलं तर त्याचं योग्य पोषण होऊन त्याची वाढ जोमाने होण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला नक्कीच माहीत असायला हव्या. यासाठीच जाणून घ्या घरात लावलेली झाडे लवकर वाढण्यासाठी काही सोप्या टिप्स

Vaastu Tips : घरात कोणती झाडे लावावी आणि त्यांची लागवड

झाडे लवकर वाढण्यासाठी सोप्या टिप्स

घरात कुंडीत लावलेली रोपं जोमाने वाढावी असं वाटत असेल तर या टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या आहेत.

How to Plants Grow Faster at Home Gardening Tips in Marathi

कांद्याच्या सालीचे पाणी 

कांदा आपल्या घरात स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणावर लागतो. कांदा कापताना त्याची साल आपण फेकून देतो. पण ही साल फेकून न देता साठवून ठेवा आणि एका हवाबंद डब्यात सालीचे तुकडे आणि दोन ग्लास पाणी भरा. तीन ते चार दिवस हा डबा असाच बंद ठेवा. ज्यामुळे त्यातील पाण्यातून लिक्विड फर्टिलायझर निर्माण होईल. या पाण्यात दुप्पट पाणी मिसळा आणि तुमच्या घरातील फुलझाडांवर स्प्रे करा. ज्यामुळे फुलझाडांना कीड लागणार नाही आणि उत्तम खत मिळाल्यामुळे त्यांची वाढ जोमाने होईल.

ADVERTISEMENT

जाणून घ्या टेरेस गार्डनिंग मराठी टिप्स (Terrace Gardening Tips In Marathi)

चहा पावडर

घरात वापरलेली चहापावडर अथवा ग्रीन टी तुम्ही तुमच्या होम गार्डनसाठी खत म्हणून वापरू शकता. कारण हे तुमच्या झाडांसाठी एक सेंद्रिय खत आहे. यासाठी चहा झाल्यावर उकळलेली चहापावडर चांगली धुवून घ्या. ज्यामुळे त्यातील साखरेचा गोडवा निघून जाईल. नाहीतर झाडाला मुंग्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. धुतलेली चहापावडर चांगली उन्हात सुकवा आणि मग ती तुमच्या झाडांच्या मुळाजवळ टाका. 

झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त आणि सोप्या टिप्स (Plants To Grow From Cuttings In Marathi)

जुन्या आणि टाकाऊ औषधी गोळ्या 

घरात नेहमी अनेक औषधी गोळ्या असतात ज्या तुम्हाला फेकून द्याव्या लागतात. तुम्ही या खराब झालेल्या औषधी गोळ्या तुमच्या झाडांसाठी वापरू शकता. कारण या गोळ्यांची पावडर झाडांमध्ये घातली तर त्यामुळे झाडांना कीड लागत नाही आणि झाडांची वाढ जोमात होते.

ADVERTISEMENT

घरच्या झाडांची काळजी कशी घ्यावी याच्या सोप्या टिप्स (How To Care For Indoor Plants)

झाडे नेहमी सूर्यप्रकाशात ठेवा 

जर तुम्हाला तुमच्या घरातील झाडे लवकर वाढावी असं वाटत असेल तर त्यांना योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या. कारण  झाडांना सूर्यप्रकाश मिळाला नाही तर त्यांची वाढ खुंटते आणि ती लवकर मरून जातात. झाडांना त्याची पोषणमुल्ये तयार करण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश गरजेचा असतो. यासाठी घरात झाडे अशा ठिकाणी लावा जिथे त्यांना दिवसभर सूर्यप्रकाश मिळेल.

झाडांना द्या योग्य पोषण

जर तुम्हाला तुमच्या घरातील झाडे लवकर वाढावी असं वाटत असेल तर त्यांनी योग्य पोषण मिळेल याची काळजी घ्या. कारण माणसाप्रमाणेच झाडांनाही पोषणाची गरज असते. यासाठी एका बादलीत अर्धे भरेल एवढं पाणी घ्या. त्यात एक वाटी तांदळाचे पाणी आणि सीव्हीड एक्सट्रॅक्ट मिसळा. हे पाणी तुमच्या झाडांना आठवड्यातून एकदा घाला. ज्यामुळे झाडांचे योग्य पोषण होईल आणि झाडे जोमाने वाढतील. 

06 Oct 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT