ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
लॉकडाऊनच्या काळात घरीच करा हे उपाय, नाही होणार चिडचिड

लॉकडाऊनच्या काळात घरीच करा हे उपाय, नाही होणार चिडचिड

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातलेला आहे. ज्यामुळे देशातील कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या भयंकर महामारीपासून सुटका मिळवण्यासाठी देशभरात सध्या लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. सर्व शाळा, कॉलेज, कार्यालये 15 एप्रिलपर्यंत बंद करण्यात आलेली आहेत. याचप्रमाणे लोकांना सुरक्षित राहण्यासाठी घरात राहण्याची विनंती केली जात आहे. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून  असं घरात अडकून पडल्यामुळे लोकांच्या मानसिक स्थितीवर विपरित परिणाम होताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाप्रमाणे लोकांच्या ताणतणाव आणि नैराश्यातदेखील वाढ होताना आढळत आहे. यासाठीच जाणून घ्या घरात अडकून पडल्यामुळे निर्माण होणारा ताणतणाव कसा दूर करावा.

Shutterstock

कौंटुबिक वातावरण खेळीमेळीचे ठेवा –

सध्या सर्वजण आपल्या कुटुंबासोबत घरात एकत्र राहत आहेत. ज्यामुळे दररोज कामानिमित्त घराबोहर असलेली मंडळी बऱ्याच काळानंतर अशी एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. मात्र त्यामुळे घरातील कौटुंबिक कलह वाढण्याची भिती निर्माण झालेली आहे. घरात अडकून पडण्याची भावना आणि आपल्याच माणसांचे सतत जाणवणारे दोष यामुळे घरात प्रत्येकाची चिडचिड होत आहे. खरंतर हा लॉकडाऊन म्हणजे तुमचे कौटुंबिक नाते सुंदर करण्याची एक संधीच आहे हे ओळखा. कारण त्यानिमित्ताने तुम्ही पुन्हा तुमच्या कुंटुंबासोबत एकत्र वेळ घालवू शकत आहात. यासाठी आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ द्या, सर्वांनी एकत्र बसून नाश्ता, जेवण करा. एकत्र मनोरंजनाचे कार्यक्रम पाहा, घरातील कामे वाटून घ्या, एकमेकांची काळजी घ्या आणि सर्वांनी मिळून जगावर आलेलं हे संकट लवकर दूर व्हावं यासाठी प्रार्थना म्हणा म्हणजे घरात खेळीमेळीचं वातावरण निर्माण होईल. कारण प्रार्थना केल्यामुळे मन शांत निवांत होण्यास लवकर मदत होते. 

ADVERTISEMENT

छंद जपा –

अनेक वर्षांनी तुम्हाला घरात राहण्याची अशी संधी मिळाली आहे. नेहमी शाळा, कॉलेज, ऑफिसच्या कामांसाठी तुम्हाला सतत धावपळ करावी लागते. मात्र आता तुमच्या कडे नक्कीच चांगला वेळ आहे. या काळाचा सदुपयोग करण्यासाठी भूतकाळात मागे पडलेल्या तुमच्या आवडीच्या गोष्टींचा मागोवा घ्या. असे अनेक छंद होते जे जपण्यासाठी तुम्हाला  पुरेसा वेळच मिळाला नव्हता. आता ते छंद जपण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे लॉकडाऊनचा हा काळ तुमच्यासाठी सुखावह होईल. 

Shutterstock

व्यायाम, योगासने आणि मेडिटेशन करा –

होम क्वारंटाईनमुळे तुम्हाला आता जीम अथवा व्यायामासाठी घराबाहेर जाणं नक्कीच शक्य नाही. मात्र व्यायाम हा निरोगी राहण्यासाठी फार महत्त्वाचा असतो. शिवाय व्यायामामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते. यासाठीच जर घरात राहून तुमचे मन निराश झाले असेल तर तुमच्या दिनक्रमात व्यायामाचा समावेश करा. घरात राहून घरच्या घरी चालणे, योगासने, प्राणाायाम अथवा मेडिटेशन तुम्ही नक्कीच करू शकता. ज्यामुळे तुम्हाला घरातदेखील प्रसन्न वाटेल.

ADVERTISEMENT

मित्रमंडळीसोबत फोन आणि सोशल मीडियावर संपर्कात राहा –

माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही कारणासाठी इतरांवर अवलंबून असतोच. सोशल डिस्टंसमुळे आता तुम्हाला एकटं एकटं वाटणं स्वाभाविक आहे. घरात राहिल्यामुळे एकटेपणा वाटत असेल तर त्यावर एक सोपा उपाय म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजाच्या संपर्कात राहणं. यासाठी तुमच्या मित्रमंडळींना फोन करा, व्हिडिओ कॉल करा. ज्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबतच सतत आहात ही भावना तुमच्या मनात निर्माण होईल आणि तुम्हाला एकटं वाटणार नाही. 

Shutterstock

स्वयंपाकात मन रमवा –

आहाराचा आणि मनाचा अतिशय जवळचा संबध असतो. कारण आवडते पदार्थ खाण्यामुळे तुम्हाला  आनंदी वाटतं तर नआवडते पदार्थ खाणं सर्वांसाठीच कंटाळवाणं असतं. तुम्ही काय खाता यावरून तुमचं मन आनंदी अथवा निराश होऊ शकतं. सध्या लॉकडाऊन जरी असलं तरी जीवनावश्यक गोष्टींचा पूरवठा नक्कीच सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला आवडणारे खाद्यपदार्थ घरीच बनवा आणि कुटुंबासोबत मिळून त्याचा आस्वाद घ्या. घरी तयार केलेले सर्व पदार्थ नक्कीच पौष्टिक असणार त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी हे नक्कीच उत्तम ठरेल मनाला आनंदी करण्याचा हा एक मस्त उपाय आहे. 

ADVERTISEMENT

शांत झोप घ्या –

निरोगी राहण्यासाठी माणसाला कमीत कमी सहा ते आठ तास झोपेची नितांत गरज असते. मात्र नेहमी दगदगीच्या जीवनशैलीमुळे तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही. कामानिमित्त सकाळी लवकर उठण्यामुळे आणि रात्री उशीरा झोपण्यामुळे तुमची झोप पूर्ण होत नाही. मात्र आता काही दिवस तुम्हाला कुठेच जाण्यासाठी धावपळ करायची नाही आहे. तेव्हा दररोज पुरेशी झोप घ्या ज्यामुळे तुमचे मन शांत आणि निवांत राहण्यास मदत होईल. शिवाय यामुळे तुमची घरात राहण्यामुळे होणारी सततची चिडचिडदेखील कमी होईल.

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

CoronaVirus : घरात असावी या वस्तूंची तरतूद

सावधान! एसी लावल्यामुळे वाढू शकतो कोरोना संक्रमणाचा धोका

31 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT