ADVERTISEMENT
home / Natural Care
अंडरआर्म्स स्वच्छ करण्यासाठी करा स्क्रबचा वापर, होईल फायदा

अंडरआर्म्स स्वच्छ करण्यासाठी करा स्क्रबचा वापर, होईल फायदा

अंडरआर्म्स म्हणजेच काखेच्या त्वचेबाबत हल्ली प्रत्येक महिला फारच आग्रही असते. अंडरआर्म्स काळवंडू नयेत ते स्वच्छ, नितळ दिसावे यासाठी अनेक उपाय केले जातात. पण हे उपाय आपण काही ठराविक काळासाठीच आपण करतो. अंडरआर्म्सची काळजी चेहऱ्याप्रमाणेच करणे फार गरजेचे असते. तुमचे अंडरआर्म्स स्वच्छ करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी स्क्रब हा उत्तम पर्याय आहे. काय! तुम्ही या पूर्वी कधीच अंडरआर्म्सची अशा प्रकारे काळजी घेतली नाही? चला तर जाणून घेऊया अंडरआर्म्स स्क्रब करण्याचे फायदे

अंडरआर्म्स काळवंडलेत? मग रोजच्या रोज अशी घ्या काळजी

अंडरआर्म्सला स्क्रब करण्याचे फायदे

अंडरआर्म्सला स्क्रब करण्याचे फायदे

Instagram

ADVERTISEMENT
  • अंडरआर्म्समध्ये असलेले केस आणि त्याला चिकटलेला घाम हा नुसता पाणी किंवा साबणाने जात नाही. स्क्रबचा उपयोग केला तर अंडरआर्म्सची त्वचा स्वच्छ होण्यास मदत मिळते. तुमचा घाम निघून जातो आणि तेथील त्वचा कोरडी होते. 
  • ज्यावेळी वॅक्सिंग केले जाते. त्यावेळी केसांसोबत त्या जागेवरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत मिळते. त्यामुळे काखेतील काळे डाग आणि इनग्रोन केस बाहेर पडायला मदत होते. 
  • आपल्या हातांखाली सतत घाम साचलेला असतो. त्याला चेहऱ्याच्या तुलनेत म्हणावे तितके ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे येथील त्वचेला कायम घाम असतो. ज्यावेळी आपण स्क्रब करतो त्यावेळी तेथील त्वचेला आवश्यक असलेला रक्तपुरवठा मिळतो. 
  • चेहऱ्याप्रमाणे अंडरआर्म्सची त्वचाही नाजूक असते. त्यामुळे तुम्ही त्वचा स्वच्छ होईल म्हणून स्क्रबचा उपयोग करणार असाल तर माईल्ड स्क्रबचा उपयोग करा आणि कमीत कमी वेळासाठी तुम्ही त्याचा उपयोग करा. संपूर्ण शरीर स्वच्छतेसाठी आपण शॉवरच्या वेगवेगळ्या जेल वापरू शकता.
  • स्क्रबचा वापर केल्यानंतर त्वचा स्वच्छ करुन त्यावर मॉश्चरायझर लावायला विसरु नका. 
  • स्क्रबचा वापर जास्त वेळासाठी करणे हे देखील त्वचेसाठी चांगले नसते. त्यामुळे आठवड्यातून केवळ दोनच वेळा तुम्ही याचा वापर करा.

अंडरआर्म्समधील Dark Patches घालवण्यासाठी 7 सोप्या टिप्स

 

स्क्रबची निवड करताना

अनेकांसाठी चांगल्या प्रोडक्टची निवड करणे हे फारच कठीण असते.अंडरआर्म्ससाठी जर स्क्रबची निवड करत असाल तर तुम्ही अत्यंत माईल्ड अशा स्क्रबची निवड करा. स्क्रबमध्ये फार जाड आणि कठीण कण असता कामा नये. जर तुम्ही रोज स्क्रब करण्याचा प्रयत्न करणार असाल तर तुम्हाला माईल्डपेक्षाही कमी कण असलेले स्क्रब वापरणे गरजेचे आहे. शूगर, बदाम,पपई असे स्क्रब तुम्ही यामध्ये वापरु शकता. 

अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी पीलिंग आहे उत्तम पर्याय

लक्षात घ्या या गोष्टी

अनेकांच्या अंडरआर्म्सचा रंग हा तुलनेने अधिक काळा असतो. त्यांना लगेचच स्क्रबचा वापर केल्यानंतर त्वचेचा रंग उजळलेला दिसणार नाही. पण तुमच्या काखेतील इनग्रोन केस आणि इतर गोष्टी त्यामुळे आपोआपच कमी होतील. पण त्वचा उजळण्यासाठी त्वचा अधिक चांगली दिसण्यासाठी थोडा वेळ नक्कीच जाईल. त्यामुळे एकाच दिवशी जास्तीत जास्त स्क्रब करण्याचा प्रयत्न करु नका. त्यामुळे काखेत जखमा होऊन त्वचा अधिक काळवंडली जाईल. 

ADVERTISEMENT

अंडरआर्म्स स्क्रब करा आणि मिळवा फायदा

तुमच्या त्वचेसाठी मॉश्चरायझर असते फारच गरजेचे म्हणून नक्की ट्राय करा My Glammचे हे प्रोडक्ट 

13 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT