ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
ट्रॅव्हल फोटो चांगले येण्यासाठी अशी करा कपड्यांची निवड

ट्रॅव्हल फोटो चांगले येण्यासाठी अशी करा कपड्यांची निवड

बाहेर फिरायला गेल्यानंतर चांगले ट्रॅव्हल फोटो यावेत असे आपल्या सगळ्यांना वाटते. फेसबुक, इन्स्टावर असे काही फोटो पाहिल्यानंतर आपल्यालाही फोटोमध्ये उत्तम दिसायचे असते. पण फोटोच्या पोझला जितके महत्व आहे. तितकेच तुमच्या कपड्यांनाही आहे. तुम्ही नेमके कोणते कपडे घालून काय पोझ देता हे देखील तितकेच महत्वाचे आहे. अनेकांना प्रवासात कोणते कपडे चांगले दिसतील हे कळत नाही. म्हणूनच काही रंगसंगती आणि कपडे निवडीच्या काही खास टिप्स आम्ही आज देणार आहोत. चला करुया सुरुवात

या रंगाचे कपडे उजळवतात तुमचा स्किनटोन

कपड्यांवरील डिझाईन

अनेकांना कपड्यांवर असलेल्या बारीक बारीक नक्षी किंवा मोठ्या डिझाईन्स आवडतात .म्हणून त्यांच्या वॉर्डरोबमध्ये हमखास फुलं-पान- नक्षी असलेले कपडे असतात. कपड्यांवरील ही डिझाईन वाईट असे आम्ही मुळीच मानत नाही. पण कधीकधी डिझाईन मोठी झाली की, मात्र तुम्ही दिसण्याऐवजी फोटोमध्ये तुमच्या ड्रेसवरील डिझाईनच दिसत राहते. जर तुम्हाला फोटोमध्ये निसर्गसौंदर्य आणि तुम्ही दिसावे असे वाटत असेल तर प्लेन किंवा बारीक डिझाईन असलेले कपडे निवडा. ते अधिक सुंदर दिसतात. शिवाय फोटोत तुम्ही अधिक चांगले दिसता. 

प्री वेडिंग शूटसाठी असे निवडा कपडे आणि काढा सुंदर फोटो

ADVERTISEMENT

गडद रंगाची करा निवड

स्किनटोन कोणतीही असली तरी प्रवासात गडद कपडे घालणे हे नेहमीच फायद्याचे असते.त्याचे पहिले कारण असे की, हे कपडे लवकर खराब होत नाही आणि दुसरे म्हणजे फोटो चांगला येतो. बाहेर जाताना  प्रवासातील कोणत्याही फोटोमध्ये गडद रंग घातला की, तुमचा फोटो चांगला येणारच. लाल, केशरी, काळा, हिरवा, सी ग्रीन, निळा, मल्टी कलर असे रंग तुमचा फोटो अधिक चांगला करतात. त्यामुळे प्रवासात तुम्ही याच रंगाचा टीशर्ट किंवा पँटची निवड करा तुमचे फोटो हमखास चांगले येणार 

हवा असेल स्लिम लुक तर वापरा या रंगाचे कपडे

जॅकेट्सने दिसतात फोटो अधिक चांगले

अनेकदा फोटो काढताना मी जाड तर दिसत नाही ना! अशी भीती अनेकांना असते.यावर सोपा उपाय म्हणजे तुम्ही निवडलेल्या आऊटफिटवर छान जॅकेट घालणे. डेनिम जॅकेट यासाठी फारच उत्तम आहे. तुमचे फोटो रीच करण्यासोबतच तुम्हाला बारीक दाखवण्याचे काम अशा प्रकारचे जॅकेट करते. तुम्ही व्यवस्थित फिटचे जॅकेट घातले तर तुम्हाला शरीराचा फार विचार करावा लागत नाही. तुम्हाला जॅकेटमुळे एक चांगला ग्रेस मिळतो. 

ADVERTISEMENT

स्पोर्टस शूज दिसतात नेहमीच बेस्ट

इतर फेस्टिव्हल काळात ठिक आहे. पण ट्रॅव्हल करताना आपण नेहमीच असे शूज घालतो जे आपल्याला चालण्यास, धावण्यास अडथळा निर्माण करत नाही. स्पोर्टस शूज हा त्यासाठी अनेकांच्या आवडीच्या पर्याय. आता स्पोर्टस शूजही कलरफूल आणि थोड्या प्लॅटफॉर्म हिल्समध्ये मिळतात. ज्यामुळे तुमची उंचीही अधिक खुलून दिसते.जर तुम्ही नव्याने शूज घेणार असाल तर तुम्ही छान कलरफुल असे शूज निवडा कारण ते फारच उठून दिसतात. तुम्ही जीन्स किंवा जेगिंग्ज, पलाझो किंवा कोणत्याही स्टाईलची पँट घातली तरीही असे शूज चांगले दिसतात.

हे टाळा

  • ट्रॅव्हलिंगमध्ये फ्रिल्स किंवा लेयर्ड हात असलेले कपडे टाळा. 
  • जर तुम्ही फुल गाऊन घालत असाल तर प्रवासात असे गाऊन घालू नका. कारण त्यामुळे तुमचा लुक वेगळा दिसतो.
  • पंजाबी ड्रेस घालणार असाल तर ओढणी घ्यावी लागणार नाही असे ड्रेसचे गळे निवडा. 
  • चुडीदार घालणार असाल तर टॉपची फिटिंग ही थोडी सैल असू द्या. 
  • शॉर्ट कपडे घालण्याचा विचार असेल तर तुमच्या शरीरयष्टीचा विचार करा. फार घट्ट कपडे घालू नका. 

या काही गोष्टी लक्षात घेत ट्रॅव्हलिंग फोटो काढा आणि छान छान फोटो काढा.

प्रवासातही तुमची त्वचा ठेवायची असेल हायड्रेट तर नक्की ट्राय करा @MyGlamm चे मॉईश्चरायझर नक्की वापरा तुमची त्वचा राहिल हायड्रेट

23 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT