ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
घरगुती बिझनेस आणि नफा

एखाद्या घरगुती बिझनेसमधून नफा कसा ठरवावा घ्या जाणून

 लॉकडाऊनच्या या काळात खूप जणांना बराच मोठा आर्थिक मोठा फटका बसला आहे. त्यामुळे खूप जणांनी त्यांचे बिझनेस या काळात सुरु केले आहेत. घरी राहूनच काही छोटेखानी उद्योग केल्यामुळे खूप जणांच्या कुटुंबाला आधार मिळाला आहे. तुम्हीही घरी राहून चारपैसे कमावण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बिझनेसमधून नफा कसा काढायचा हा कळणे देखील तितकेच गरजेचे आहे. खूप वेळा मोठ्या जोमात बिझनेस सुरु केला जातो. पण त्यामध्ये  नफा किती काढायचा हे कळत नाही.  एखाद्या घरगुती बिझनेसमधून नफा कसा ठरवायचा ते जाणून घेऊया.

बिझनेस कोणता?

कच्चा माल, भाजी पोळी, जेवण, मसाले व्यवसाय, शिवणकाम, वाळवणीचे पदार्थ, दागिने विकणे, कपडे विकणे,बेकरी व्यवसाय (केक, चॉकलेट) असे वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस लोकांनी लॉकडाऊनच्या काळात घरात राहून सुरु केले आहेत. तुमचा बिझनेस कोणता? यावरुन तुमचा नफा ठरत असतो. त्यामुळे सगळ्यात आधी तुमचा बिझनेस यापैकी कोणत्या स्वरुपाचा आहे ते बघा. म्हणजे खाण्याशी संबधित की कोणत्या वस्तू विक्रीशी संबधित असे त्याचे विभाजन सर्वसाधारणपणे होते. तुम्ही काय विकता त्यावर त्याचा नफा किती काढायचा त्याचे गणित अवलंबून असतो. 

खाद्यपदार्थांवर नफा ठरवताना

सौजन्य : Instagram

सगळ्यात जास्त चालणारा आणि रोजच्या रोज गरज असणारा असा व्यवसाय आहे. त्याचा गल्ला हा रोजच्या रोज जमणारा असतो.  त्याचा नफा काढताना थोडा वेगळा व्यवहार ठेवावा लागतो. घरी राहून भाजीपोळी किंवा खाद्यपदार्थ विकताना त्यासाठी लागणारी मेहनत ही थोडी वेगळी असते. त्यामुळे त्याचा हिशोब करताना तुम्ही खालीलप्रमाणे करायला हवा.

सामानाचा एकूण खर्च – यामध्ये तुमचा कच्चा माल हा सगळा समाविष्ट असायला हवा. 

ADVERTISEMENT

गॅस किंवा शेगडीचा वापर – हा तुम्हाला मीटर किंवा सिलेंडरच्या वापरावर अवलंबून असतो.

असा काढावा नफा– तुमच्या एरियावर बरेचदा नफा किती काढायचा ते अवलंबून असतो. 

खर्चाच्या दु्प्पट हा नफा तुम्हाला खाद्यपदार्थांवर काढता येतो.
उदा. पुरणपोळी करण्यासाठी तुम्हाला 100 रुपये खर्च आला असेल तर त्याचा नफा दुप्पट म्हणजे 200 रुपये इतका काढता येतो.तुमच्या परिसरातील मागणी आणि त्याचे मिळण्याचे प्रमाण यावर अवलंबून असते. ( कधीकधी हा रेट तुम्ही कोणत्या क्वालिटीच कच्चा माल यावर देखील अवलंबून असतो. ) त्यामुळे आता तुमच्या जेवणातून तुम्हाला किमान दुप्पट फायदा मिळेल असे बघा 

दागिने किंवा कपडे विकताना

खूप जणांनी या काळात घरी राहून कपडे आणि इमिटेशन ज्वेलरी विकण्याचा व्यवसायही सुरु केला आहे. इमिटेशन ज्वेलरी आणि कपडे यामध्ये तुम्हाला खाद्यपदार्थांसारखा दुप्पट असा नफा काढता येत नाही याचे गणित थोडेसे वेगळे असते. तुम्ही वस्तू कितीला खरेदी केली आहे. तिला आणण्यासाठीचा खर्च त्यावर साधारण 10 ते 20% टक्के इतका नफा काढणे हे रास्त असते. कारण तुम्ही एखादी वस्तू खूप जास्त महागात विकली तर तुमच्याकडून या वस्तू कोणीच विकत घेणार नाही. अशा वस्तू विकताना तुम्हाला मार्केटच्या रेटचा अंदाज घ्यावा लागतो. उच्च क्वालिटीचे प्रोडक्ट रास्त किमतीत मिळाले तर ते अधिक पटापट जातात. त्यामुळे दागिने आणि कपडे विकताना याचा विचार नक्की व्हावा. 

ADVERTISEMENT

आता तुम्ही नेमका कोणता बिझनेस करता यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. 

अधिक वाचा

असा सुरू करा घरगुती व्यवसाय, सहज सोप्या कल्पना (Home Business Ideas in Marathi)

तुमच्या छंदातूनही मिळवू शकता पैसा जाणून घ्या कसा (Hobbies That Make Money In Marathi)

ADVERTISEMENT

पैसे वाचवायचे असतील तर ब्राईडने या गोष्टी टाळाव्यात

10 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT