ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
पावसाळी चपला लागत असतील तर पायांची अशी घ्या काळजी

पावसाळी चपला लागत असतील तर पायांची अशी घ्या काळजी

पावसाळा सुरु झाला की, पावसाळी चप्पलांची खरेदी करायची हे अगदी प्रत्येकाचे ठरलेले असते. त्यानिमित्ताने खूप जणांना शॉपिंग करण्याची संधी मिळते. पावसाळी चपला लागण्याची तक्रार ही इतर चपलांच्या तुलनेत खूप जास्त असते. खूप जणांना चांगल्या आणि महागड्या चप्पल घेतल्या तरी देखील त्या पायाला लागतात. पावसाळ्यात घेतल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या चपला कितीही चांगल्या असल्या तरी खूप जणांना त्याचे प्लास्टिक लागते. तुम्हालाही पावसाळी चपला लागत असतील तर अशा चपलांची खरेदी केल्यानंतर तुम्ही काही सोपे उपाय केले तर तुम्हाला या चप्पल पायांना अजिबात लागणार नाहीत. चला जाणून घेऊया सोपे उपाय

वेदनादायी शू बाईटवर ’15’ घरगुती उपाय आणि इतर टीप्स (How To Prevent Shoe Bites In Marathi)

बँडेज लावा

हल्ली वॉटरप्रुफ बँडेज मिळतात. त्या बँडेज तुम्ही चप्पल ज्या ठिकाणी लागत असेल त्या ठिकाणी आधीच लावून ठेवा. पावसाळी चपला या खूप वेळा मागच्या बाजूला किंवा अंगठाच्या बाजूला आणि जर जास्त कडक असतील तर वरच्या वाजूला लागतात. त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही चपला लागण्याचा त्रास असेल तर तुम्ही आधीच त्याला बँडेज लावून ठेवा. त्यामुळे तुम्हाला चप्पल आहे त्या ठिकाणी मुळीच लागणार नाही. आणि चप्पल लागली तर त्याचा त्रास थोडासा कमी होण्यास तुम्हाला मदत मिळेल.

हिल्समध्ये चालता येत नाही? तुम्ही निवडत आहात चुकीचे हिल्सचे प्रकार

ADVERTISEMENT

चपलांना लावा बँडेज

तुम्हाला थोडी आधीच खबरदारी घ्यायची असेल तर तुम्ही आणलेल्या तुमच्या नव्या चप्पलांना आधीच लागत असलेल्या ठिकाणी बँडेज लावा. म्हणजे काही दिवस तरी तुम्हाला चप्पल लागणार नाही. बँडेजचा फुगीर भाग तुम्हाला चप्पलांना लावायचा आहे. त्यामुळे एक गादी तयार झाली की, त्यामुळे चप्पल थेट त्वचेला लागत नाही. तुम्ही काही दिवसांसाठी चप्पलांना अशाप्रकारे बँडेज लावून ठेवा. तुम्हाला थोड्या दिवसांनी चपला लागणार नाही.

मुलायम आणि कोमल पायांसाठी झटपट घरगुती उपाय (Foot Care Tips In Marathi)

व्हॅसलीन जेली

 कोणतेही पावसाळी शूज घालण्याआधी तुम्ही पायांना व्हॅसलीन जेली लावा. त्यामुळे तुमच्या पायांना चप्पल लागणार नाही.पहिले काही दिवस तुम्ही तुमच्या पायांना पेट्रोलिअम जेली लावा. म्हणजे तुम्हाला पायांना दुखापत होणार नाही. पण जर तुम्ही फ्लिप फ्लॉप चप्पल घालत असाल तर जेली पायांच्या तळव्यांना लावू नका त्यामुळे पाय सरकण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जेली लावताना थोडी जपून लावा. 

खोबरेल तेल लावा

जर तुमच्या पायांना चप्पलांमुळे जखमा झाल्या असतील. तर तुम्ही पायांना खोबरेल तेल लावा. पाय स्वच्छ करुन तुम्ही त्यांना खोबरेल तेल लावा. त्यामुळे जखमा बऱ्या होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला अशा जखमा झाल्या असतील तर पायांना खोबरेल तेल लावायला मुळीच विसरु नका.

ADVERTISEMENT

कैलास जीवन

कैलास जीवन किंवा त्यासारखे एखादे मलम हे देखील तुमच्या पायांच्या जखमेची जळजळ कमी करण्यास मदत करते. तुमच्याकडे याचपद्धतीचे एखादे क्रिम किंवा मलम असेल तर तुम्ही ते लावा म्हणजे तुम्हाला थंड वाटेल. ज्या ठिकाणी चप्पल लागते त्याठिकाणी तुम्ही क्रिम आधीच लावून ठेवा. म्हणजे तुम्हाला त्रास कमी होईल. 

आता पावसाळी चप्पल लागत असतील तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. 

13 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT