ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
हिवाळ्यात उबदार कपड्यांची निगा राखण्यासाठी सोप्या टिप्स

हिवाळ्यात उबदार कपड्यांची निगा राखण्यासाठी सोप्या टिप्स

हिवाळ्यात थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण लोकरीच्या अथवा उबदार कपड्यांचा वापर करतो. उब देणारे कपडे घातले की थंड हवा आणि गारव्याचा त्रास होत नाही. थंडीच्या दिवसांमध्ये यासाठीच निरनिराळ्या प्रकारचे स्वेटर, लेदर जॅकेट, हुडी, शॉल, मफ्लर, स्टोल, थर्मल्स, श्रग, कानटोपी, हातमोजे, पायमोजे बाजारात उपलब्ध असतात. हिवाळ्यात फॅशनेबल दिसण्यासाठी हे कपडे मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असतो. मात्र थंडीचे चार महिनेच हे ठेवणीतले उबदार कपडे कपाटाबाहेर असतात. त्यानंतर पुन्हा वर्षभरासाठी ते कपाटात ठेवून दिले जातात. कधी कधी थंड हवेच्या ठिकाणी वेकेशनवर जाताना पुन्हा आपल्याला त्यांची आठवण येते. यातील लोकरीचे कपडे अतिशय नाजूक आणि हलके असतात. जर हे कपडे चुकीच्या पद्धतीने धुतले आणि वाळवले तर ते खराब होतात. लेदर जॅकेट्स आणि बुट्स तर फारच सांभाळावे लागतात. यासाठीच हिवाळ्यात तुमच्या लोकरीच्या कपड्यांची कशी काळजी घ्यायची हे  जरूर वाचा. 

उबदार कपडे धुताना घ्या ही काळजी –

तुम्ही तुमचे उबदार कपडे कसे धुता हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा आपण सर्वच कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुण्यासाठी टाकतो. मात्र उबदार कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यामुळे खराब होतात. तुमच्या प्रत्येक कपड्यावर विकत घेताना एक लेबल लावलेलं असतं. त्यावर ते कसे धुवाव याच्या सूचना दिलेल्या असतात. त्या पाळल्यास तुमच्या कपड्यांचं नुकसान होत नाही. लोकरीचे अथवा उबदार कपडे वॉशिंग मशीनमध्ये न धुता हलक्या हाताने टबमध्ये धुवावेत. असे कपडे धुण्यासाठी डिर्टंजटचा वापर करू नये. लोकरीचे कपडे धुण्यासाठी खास सौम्य फॅब्रिक वॉश बाजारात मिळतात. अशा फॅब्रिक वॉश अथवा एखाद्या सौम्य शॅंम्पूने हे कपडे धुतल्यास या कपड्यांचा मऊपणा तसाच राहतो. 

Shutterstock

ADVERTISEMENT

उबदार कपडे सुकवताना काय काळजी घ्यावी –

लोकरीचे कपडे कधीच उन्हात सुकवू नये. हिवाळ्यात कपडे लवकर सुकण्यासाठी उन्हात कपडे वाळत घातले जातात. मात्र बऱ्याचदा लोकरीच्या कपड्यांना डाय करण्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर केलेला असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही हे कपडे उन्हात वाळत घालता तेव्हा त्यांचा रंग फिकट होण्याची दाट शक्यता असते. लोकरीचे कपडे घट्ट पिळून अथवा हॅंगरवर अडवून सुकवू नयेत कारण त्यामुळे त्यांचा आकार बदलण्याची दाट शक्यता असते. थंड हवेच्या ठिकाणी  असे कपडे सुकवण्यासाठी खास ड्रायरचा वापर केला जातो. तुम्ही हलक्या हाताने त्यातील पाणी काढून ते कपडे सुकवण्याच्या स्टॅंड अथवा दोरीवर लटकवून सुकवू शकता.

Shutterstock

लोकरीचे कपडे इस्त्री करताना राहा सावध –

प्रत्येक कापडाला इस्त्री करताना निरनिराळ्या तापमानाची गरज असते. लोकरीच्या कपड्यांना अगदी कमी तापमानावर इस्त्री करावी. शिवाय काही स्वेट टीशर्टंना आतील बाजूने हलक्या तापमानावर इस्त्री करावी लागते नाहीतर ते जळण्याची शक्यता जास्त असते. 

ADVERTISEMENT

Shutterstock

तुम्ही तुमचे कपडे कसे ठेवता हे महत्त्वाचं

लेदरचे कपडे अथवा लेदरचं जॅकेट तुम्ही ते कसं ठेवता हे खूप महत्त्वाचं आहे. लोदरचे कपडे तुम्ही धुवू शकत नाही. यासाठीच बाहेरून घरी आल्यावर ते थोड्यावेळ मोकळ्या हवेत ठेवून द्या. कारण आपल्या शरीराचा घाम त्यामध्ये मुरण्याची शक्यता असते. जरी तुम्ही ते धुवू शकला नाही तरी एखाद्या मऊ केस असलेल्या ब्रशने ते तुम्ही वरच्यावर स्वच्छ नक्कीच करू शकता असं केल्यामुळे त्यावरील धुळ निघून जाते. लेदरच्या कपड्यांना अधून मधुन मोकळ्या हवेत ठेवून द्या. ज्यामुळे त्यांना घाणेरडा वास येणार नाही.  तुमचे लोकरीपासून तयार केलेले अथवा इतर सॉफ्ट कपडे धुतल्यानंतर चांगले वाळवल्याशिवाय कपाटात ठेवू नका. लोकरीच्या कपड्यांची घडी घातल्यावर दोन कपड्यांच्या आतील भागात टिश्यू पेपर अथवा बटर पेपर ठेवा. ज्यामुळे इतर कपड्यांचे रंग त्यांना लागणार नाहीत. सुकलेला सोनचाफ्याची फुलं अथवा कडूलिंबाची सुकलेली पानं एखाद्या सुती कापडात गुंडाळून कपाटात ठेवा. ज्यामुळे तुमच्या कपड्यांना हवेतील आर्द्रतेमुळे येणारा घाणेरडा वास येणार नाही. 

 

ADVERTISEMENT

 

Shutterstock

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहारात असा करा सुंठाचा वापर

ADVERTISEMENT

सिल्कच्या साड्यांची काळजी घेण्यासाठी खास टिप्स

खादी – कायम टिकणारी फॅशन, नेहमीचा ट्रेंड

23 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT