आयुष्यात अनेक लोकं येत जात असतात. काही लोकं मनात घर करुन जाताता तर काही लोकं डोक्यात जातात. काही लोकांबद्दल उगाच मनात खूप राग असतो. त्यांनी काही केलेले असो वा नसो पण काही कारणास्तव हा राग कायम सोबत राहतो. तुमच्याही आयुष्यात अशी व्यक्ती आहे का? तिचे तुमच्या आजुबाजूला असणे तुम्हाला अजिबात आवडत नाही. पण असा राग सतत मनात राहिल्यामुळे तुम्हाला आवडत नसलेल्या नाही तर तुमचे आयुष्य पणाला लागते. कारण त्या द्वेषामध्ये तुम्ही इतके त्रास करुन घेता की तुम्हाला तुमच्याबद्दल विचार करता येत नाही. अशावेळी तुम्ही काय करायला हवे ते जाणून घेऊया.
मुलांमध्ये आईपासून विभक्त होण्याची चिंता सतावत असेल तर आईने काय करावे, जाणून घ्या
विचार करणे सोडा
आता तुम्हाला न आवडणारी ही व्यक्ती तुमचा बॉस देखील असू शकते किंवा कोणीही तुमच्या अगदी घरातील व्यक्तीही असू शकते. अशावेळी तुम्हाला त्रास होण्यामागे कारण असते तुमचा सतत विचार करणे. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीबद्दल सतत विचार करत राहाल किंवा त्याच्याबद्दल बोलत राहाल तर तुम्हाला त्या व्यक्तीचा जास्तीत जास्त तिरस्कार होत राहील. पण एखाद्या व्यक्तीचा इतका विचार कराच कशाला? कारण त्यामुळे तुमचा वेळ वाया जात आहे याचा अंदाज तुम्हाला येत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी तुमच्या विचारामधून काढा. तुमचे विचार हे दुसऱ्यांसाठी नाही तर आपल्या स्वत:साठी आहे हे लक्षात ठेवा तरच तुम्ही तुमच्यामध्ये बदल घडवून आणू शकाल.
दुसऱ्यांशी सतत तुलना करणे स्वत:साठी ठरते हानिकारक
चर्चा करु नका
अनेकदा खूप जण काही विषय नसला की, आपला राग काढण्यासाठी त्या व्यक्तीचा विषय काढून तासनंतास चर्चा करत बसतात. त्यामुळे तुमचा वेळ वाया जातोच. इतकेच नाही तर तुम्ही तुमच्या आयु्ष्यातील काही महत्वाचे तास नको त्या कारणासाठी वाया घालवता. त्यामुळे कोणत्याही कारणासाठी उगाचच तुम्हाला आवडत नसलेल्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही चर्चा करु नका. चर्चा कराल तितकी तुमची जखम अधिक ओली होईल. त्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला असेल किंवा तुमच्यासोबत काही वाईट केले असेल तरी देखील तुम्हाला पुढे जायचे असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचा विचार सोडणेच गरजेचे असते. तुमच्या चर्चांमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी असू द्या. तुम्ही नक्कीच त्या व्यक्तीला विसराल.
Toxic Relationship मध्ये गुंतून राहणं किती आहे धोकादायक, काय करायला हवं
विचार बदला
राग किंवा एखाद्यावर असलेला लोभ ही अत्यंत वाईट अशी गोष्ट आहे. जी तुमच्या आयुष्यात एक वेगळाच बदल घडवते. शक्य असल्यास तुम्ही त्या व्यक्तीला त्याच्या त्या गोष्टीसाठी माफ करा. तुम्ही माफ केले तर तुमच्या मनातून ती व्यक्ती बाहेर जायला किंवा मनात आलेले नकारात्मक विचार जायला तुम्हाला नक्की मदत मिळेल. माफ करणे हा सगळ्यात मोठा उपाय आहे. तो सहजासहजी होणार नाही. पण तुम्ही थोडा प्रयत्न कराल तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवण्यास मदत होईल.
आता मनातून नकारात्मक विचार काढण्यासाठी या काही गोष्टी नक्की करा.