सौंदर्य ही अशी गोष्टी आहे जी प्रत्येकालाच हवी असते. आजकाल स्त्रीयांप्रमाणेच पुरूषही आपल्या आपल्या सौंदर्याबाबत जागरूक असतात. सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण सतत चेहरा आरश्यामध्ये न्याहाळत असतो. चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी काही जणांना सतत चेहरा धुण्याची सवय असते. चेहरा धुणं हे कितीही चांगलं असलं तरी वारंवार चेहरा धुण्यामुळे तुमचे नुकसानदेखील होऊ शकते. यासाठी चेहरा कधी आणि कसा धुवावा हे तुम्हाला माहीत असायलात हवं.
चेहरा धुताना करू नका या चुका-
चेहरा धुण्यासाठी चेहऱ्यावर साबण लावू नका. कारण त्यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. चेहरा धुण्यासाठी एखाद्या सौम्य फेस वॉश अथवा क्लिंझरचा वापर करा. मात्र लक्षात ठेवा वारंवार फेस वॉश अथवा क्लिंझर वापर करणे टाळा. दिवसभरात एक वेळा क्लिंझर आणि दोन वेळा फेस वॉश तुम्ही वापरू शकता. इतर वेळी चेहरा धुण्याची वेळ आल्यास केवळ पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
चेहऱ्यावर चांगल्या प्रकारची उत्पादने वापरा
चेहऱ्यासाठी कधीच कोणतेही सौंदर्य उत्पादन त्यावरील माहिती न वाचता वापरू नका. कारण प्रत्येकाची त्वचा वेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे प्रत्येक त्वचेवरील उपचारदेखील त्या त्वचेला सूट होतील असेच करण्याची गरज असते.
चेहऱ्यावर सतत स्क्रबिंगचा वापर करणे
चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाण्यासाठी चेहऱ्याला स्क्रबिंगची गरज असते. मात्र सतत चेहऱ्याला स्क्रबिंग केल्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. यासाठी आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळाच स्क्रबरचा वापर करा.
आमची शिफारस – Lotus herbals apriscrub fresh apricot scrub तुमच्या मऊ त्वचेसाठी नक्कीच उत्तम आहे. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही हे स्क्रबर 221 रू. ला खरेदी करू शकता.
चेहऱ्यावर रगडून मसाज करणे
चेहऱ्याच्या त्वचेचे पोषण होण्यासाठी चेहऱ्यावर नियमित मॉश्चराईझर लावणं फार गरजेचं आहे. मात्र यासाठी चेहऱ्यावर एखादे मसाज क्रिम अथवा मॉश्चराईझर लावताना ते फार चोळून अथवा रगडून लावू नका.
चेहरा घाईघाईत धुणे
कधी कधी घाई घाईत चेहरा धुताना पुरेशी स्वच्छता घेतली जात नाही. कारण त्यामुळे चेहऱ्यावरील फेस वॉश अथवा त्यातील केमिकल्स त्वचेवर तसेच राहतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. यासाठी कितीही घाई असली तरी चेहरा स्वच्छ धुवा
चेहरा टॉवेलने रगडून पुसणे
चेहरा धुतल्यावर तो तुम्ही कसा कोरडा करता हे फार महत्त्वाचे आहे. कारण बऱ्याच जणांना चेहरा रगडून पुसण्याची सवय असते. असे केल्यामुळे तुमच्या त्वचेचे नक्कीच नुकसान होऊ शकते. यासाठी चेहरा धुतल्यावर तो एखाद्या सुती कापडाने अथवा टर्कीशच्या टॉवेलने टिपून घ्या.
चेहरा पुसण्यासाठी अस्वच्छ टॉवेल वापरणे
चेहरा पुसताना अस्वच्छ टॉवेल वापरल्यामुळे तुमच्या त्वचेवर इनफेक्शन होऊ शकते. यासाठी तुमचा टॉवेल दररोज स्वच्छ करा.
आमची शिफारस Himalaya herbals purifying neem face wash तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. जे चेहरा स्वच्छ करण्यासाठी उत्तम असून 131 रू. उपलब्ध आहे.
दिवसभरात किती वेळा चेहरा धुणे योग्य आहे ?
चेहरा वारंवार धुतल्यामुळे चेहऱ्यावरील आवश्यक नैसर्गिक तेल निघून जातं. ज्यामुळे चेहरा कोरडा होतो. कोरड्या त्वचेवर सुरकुत्या लवकर दिसू लागतात. शिवाय चेहऱ्यावर ग्लो आणि चमक येण्यासाठी त्वचेवर नैसर्गिक तेल असणं गरजेचं आहे. मात्र चेहरा नीट स्वच्छ करणंदेखील तितकच गरजेचं आहे. यासाठी दिवसभरात दोन ते तीन वेळा चेहरा स्वच्छ करण्यास काहीच हरकत नाही. मात्र सतत चेहरा धवू नका कारण त्यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते.
आणखी वाचा
जाणून घ्या केसांना कधी आणि कसं लावावं ‘हेअर ऑईल’
केस न वाढण्यामागची ही कारणं तुम्हाला माहीत आहेत का
निरोगी राहण्यासाठी नियमित प्या ‘नारळपाणी’
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम