ज्योतिष शास्त्रामध्ये कोणत्याही व्यक्तीचं भविष्य सांगण्यासाठी त्या व्यक्तीची जन्म तारीख, वार आणि वेळ या गोष्टी महत्त्वाच्या समजण्यात येतात. व्यक्ती ज्या दिवशी जन्म घेतात त्या वाराचाही त्यांच्या आयुष्यावर प्रभाव असतो असंही म्हटलं जातं. आठवड्यातील ज्या वाराला एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो त्याचा परिणाम त्याच्या व्यक्तीमत्वावर पडत असतो असं ज्योतिष शास्त्रात मानण्यात येते. त्यामुळे आपण या लेखातून कोणत्या वाराला जन्म झाला असून त्याचा व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो हे जाणून घेणार आहोत. प्रत्येक माणसाचा जन्म हा वाराप्रमाणेच वेळ आणि तारखेवरही अवलंबून असतो. पण वाराचा नक्की काय परिणाम होत असेल याची जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला या लेखातून आम्ही ती देण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्योतिष शास्त्र हा इतर शास्त्राप्रमाणे एक अभ्यास आहे. यामधून कोणत्याही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अभ्यासानुसारच इथे आम्ही त्याचे विश्लेषण देत आहोत.
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली
दिवस आणि त्याचे ज्योतिषिय कनेक्शन
Shutterstock
रविवारचा स्वामी हा सूर्य आहे
सोमवारचा स्वामी हा चंद्र मानण्यात येतो
मंगळवारावर नावाप्रमाणेच मंगळ हा ग्रह स्वामीत्व गाजवतो
बुधवारवर बुध ग्रहाचा प्रभाव आहे
गुरूवारवर गुरूचा प्रभाव आहे
शुक्रवारावर शुक्राचा अधिक प्रभाव असतो
तर शनिवारवर शनि ग्रहाचा प्रभाव असतो
तुमच्या चपलांवरुन कळतो तुमचा स्वभाव, जाणून घ्या तुमचा स्वभाव
वाराप्रमाणे व्यक्तीमत्वावर प्रभाव
सोमवार
सोमवारी ज्या व्यक्तींचा जन्म होतो अशा व्यक्ती बहुतांश आत्मप्रेरित असतात. दयाळूपणा आणि चांगल्या स्वभावासाठी या व्यक्ती ओळखल्या जातात. येणार सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींना या व्यक्ती व्यवस्थित हाताळतात. सुरूवातीला या व्यक्तींचे अभ्यासात जास्त लक्ष नसते पण काही काळानंतर व्यवस्थित लक्ष देऊन या व्यक्ती आपले करिअर व्यवस्थित घडवतात.
मंगळवार
मंगळवारी ज्या व्यक्तींचा जन्म होतो त्या व्यक्ती काही अंशी रागीट स्वभावाच्या असतात. पण त्यांच्या मनात मात्र कोणतीही कटुता नसते. जी गोष्ट त्यांच्या मनात आहे तीच त्यांंच्या ओठावर असते. त्यामुळे बऱ्याचदा त्यांना काही माणसांपासून दूर व्हावं लागतं. या व्यक्ती बऱ्याचदा अहंकारीही असतात. त्यामुळे त्यांना त्याचा आयुष्यात त्रास होतो. दुसऱ्यांना मदत करण्यासाठी या व्यक्ती नेहमीच पुढे असतात. तसंच या व्यक्ती नेता होण्याच्या स्वभावाच्या असतात.
बुधवार
बुधवारी जन्म झालेल्या व्यक्ती या धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात सहभागी होणाऱ्या असतात. कोणत्याही नकारात्मक गोष्टी करण्यासाठी या व्यक्ती धजावत नाहीत. तसंच या व्यक्ती आपले पाळेमुळे नेहमीच जमिनीशी जोडून ठेवतात. कोणत्याही गोष्टीमध्ये मी पणा आणणे यांना जमत नाही. आपल्या कामाला या व्यक्ती प्राधान्य देतात आणि या व्यक्तींना मूर्ख बनवणं सोपं नसतं.
गुरूवार
ज्या व्यक्तींचा जन्म गुरूवारी झाला आहे त्यांचे व्यक्तिमत्व समजूतदार आणि रोमान्सला प्राधान्य देणारे असते. कोणत्याही संकटात अगदी शांत राहून अगदी सहजतेने उपाय काढणाऱ्या या व्यक्ती असतात. आपले मित्र आणि कुटुंब यांची साथ या व्यक्तींना जन्मभर मिळते. तसंच या व्यक्ती खूपच नशिबवान असतात.
शुक्रवार
शुक्रवारी ज्या व्यक्तींचा जन्म झाला आहे त्या व्यक्ती अतिशय मजेशीर आणि आनंदी स्वभावाच्या असतात. या व्यक्तींचा वेगळेपणा गर्दीतूनही जाणवतो. कोणत्याही संकटात या व्यक्ती अतिशय सहनशीलतेने उभ्या राहतात. एखादी गोष्ट ठरवल्यावर या व्यक्ती त्या पूर्णत्वाला नेतातच.
शनिवार
ज्या व्यक्तींचा जन्म शनिवारी होतो त्या व्यक्ती शेती, व्यापार अथवा टेक्निकल क्षेत्रात हुशार असतात. आपल्या सुरूवातीच्या दिवसात या व्यक्ती खूपच हाल अपेष्टा सहन करतात. पण यातूनच कोणाशी कसे वागायचे ते या व्यक्तींना जास्त कळू लागते. या व्यक्तींना आपल्या आई वडील आणि भाऊ बहिणींची जास्त साथ मिळत नाही.
रविवार
रविवारी जन्म झालेल्या व्यक्ती या जास्त अॅक्टिव्ह नसतात. कामामध्येही आळसपणा यांचा शत्रू ठरतो. मात्र नशीब यांना नेहमी साथ देते. तसंच या वक्ती बहुतांशी लाजऱ्या असतात. समाजामध्ये जास्त मिसळणं या व्यक्तींना आवडत नाही.
12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.