ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’चं शूटिंग सुरू, अल्लू अर्जूनच्या ‘या’ चित्रपटाचा रिमेक

कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’चं शूटिंग सुरू, अल्लू अर्जूनच्या ‘या’ चित्रपटाचा रिमेक

कार्तिक आर्यनने सध्या एका पाठोपाठ एक चित्रपटाच्या शूटिंगचा धमाका लावला आहे. कारण नुकतंच त्याच्या आगामी चित्रपट धमाकाचं ट्रेलर प्रदर्शित झालं आणि त्याने लगेच दुसऱ्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवातदेखील केली. कार्तिक आर्यन सध्या बॅक टू बॅक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दिवसरात्र मेहनत करत तो त्याच्या सर्व चित्रपटांच्या शूटिंगची कामे पूर्ण करत आहे. नुकतंच त्याने आता त्याच्या आगामी चित्रपट ‘शहजादा’ च्या शूटिंगला सुरूवात केली असून त्याचा फोटो सोशल मीडियावर अपडेट केला आहे. 

पुन्हा आले ‘बंटी बबली’,सैफ अली खान- राणी दिसणार पुन्हा एकत्र

शहजादा या चित्रपटाचा आहे रिमेक

बॉलीवूडमध्ये अनेक हॉलीवूड आणि टॉलीवूड चित्रपटांचे रिमेक तयार होत असतात. हॉलीवूडप्रमाणेच टॉलीवूडचे चित्रपटांचे हिंदी रिमेक प्रेक्षकांना खूप आवडतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘शहजादा’देखील अल्लू अर्जूनच्या ‘अला वैकुंठपुरमलो’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. कार्तिकने त्याच्या इन्स्टा अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो बॅक पोझमध्ये शहजादा चित्रपटाचा क्लॅपर घेऊन उभा आहे. या फोटोसोबत त्याने शेअर केलं आहे की, “#Shehzada झाला सुरू” याचाच अर्थ कार्तिकने शहजादाच्या शूटिंगला सुरूवात केली असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येण्यास सज्ज झाला आहे.

मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड जबरदस्त भूमिकेत

ADVERTISEMENT

काय आहे शहजादाचे कथानक

शहजादा चित्रपटाचे दिग्दर्शन रोहीत धवन करत आहे. रोहीत वरूण धवनचा मोठा भाऊ आणि डेव्हिड धवनचा मुलगा आहे. कार्तिक आर्यनसोबत यात कृति सेननची मुख्य भूमिका असेल. सोबत परेश रावल आणि रोनित रॉयही एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, अल्लू अरविंद, अमन गिल करत असून चित्रपट पुढील वर्षी नोव्हेंबरला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाप्रमाणेच कार्तिक आर्यन पुढील वर्षी फ्रेडी, भुलभुलैया, धमाका या चित्रपटातून सर्वांसमोर येत आहे. ज्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. न थांबता न थकता दिवसाचे चोविस तास तो काम करताना दिसत आहे. कारण मागचे दीड वर्ष लॉकडाऊन आणि कोरोनामुळे वाया गेलं आहे. अनेक चित्रपटांचे शूटिंग रखडले होते तर चित्रपटगृह बंद असल्यामुळे काही चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. आता मात्र सर्व काही सुरळीत सुरू झालं असल्यामुळे कलाकार थोडी जास्त मेहनत घेऊन त्यांची कामे लवकर पूर्ण करताना दिसत आहेत. दिवाळीनंतर चित्रपटांचा धमाका सिनेमागृहात सुरू होईल ज्यामध्ये कार्तिकचे बॅक टू बॅक चित्रपट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

‘ओ माय गॉड 2’ मध्ये अक्षय कुमार साकारणार भगवान शंकर, फस्ट लुक केला शेअर

26 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT