ADVERTISEMENT
home / मनोरंजन
हृता दुर्गुळे परत येतेय, नवी मालिका नवा लुक

हृता दुर्गुळे परत येतेय, नवी मालिका नवा लुक

फुलपाखरू या मराठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केलं आणि हृता दुर्गुळेच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळच पडली. आपल्या दिलखेचक अदा आणि अभिनय कौशल्याने ह्रताने खूप कमी वेळात चांगली प्रसिद्धी मिळवली. हृता आता तर अक्षरशः तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. सोशल मीडियावर ह्रताचे अनेक फॉलोव्हर्स आहेत. तिच्या ग्लॅमरस लुक आणि सुमधूर हास्याने तिने तरूणांची मनं जिंकून घेतली. सहाजिकच फुलपाखरू मालिका संपल्यावर ह्रता कोणत्या मालिका अथवा चित्रपटातून झळकणार याची उत्सुकता तरूणाईला लागली होती. ज्यामुळे फुलपाखरू नंतर हृताचे चाहते तिच्या नवीन मालिकेची अत्यंत आतुरतेने वाट बघत होते. आता त्यांची प्रतिक्षा संपली असून ह्रता पुन्हा एका डेली सोपमधून दररोज चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 

हृता दुर्गुळेची नवी मालिका

झी मराठीवर वाहिनीवर नुकताच एका मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि तो पाहून प्रेक्षक चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं आहे. कारण या नव्या मालिकेतून त्यांची आवडती अभिनेत्री हृता दुर्गुळे एका  नव्या रूपात त्यांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ह्रतासोबत अभिनेता अजिंक्य राऊत मुख्य भूमिकेत असणार आहे. अजिंक्यने यापूर्वी विठुमाऊली या मालिकेत विठ्ठलाची भूमिका साकारली होती. हृताप्रमाणेच अजिंक्यचेही अनेक चाहते आहेत. त्यामुळे ही नवी जोडी आणि नवी प्रेमकथा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मन उडू उडू झालं

प्रोमो पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की, फुलपाखरूप्रमाणेच ही मालिका एक प्रेमकथा असून यात हृता आण  अजिंक्यची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. ‘मन उडू उडू झालं’ असं या मालिकेचं नाव असून ही मालिका ३० ऑगस्ट पासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. या टीझरच्या संगीतावरून ही मालिका घराघरात आणि तरूणांच्या मनात धुमाकूळ घालणार असं वाटत आहे. हृताने या मालिकेचा टिझर आणि प्रोमो शेअर करत चाहत्यानांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना ‘कमिंग बॅक होम वाली फिलिंग’ असं म्हटलं आहे.  पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर मालिकेतून पुनरागमन करताना हृताचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.  हृता या मालिकेत एक वेगळ्या लुकमध्ये दिसतेय. तिचा प्रोमोमधील लुक पाहून फक्त मालिकेतला नायकच नाही तर तमाम महाराष्ट्राचं घायाळ झाला आहे यात शंकाच नाही. याआधी ह्रताने ‘दुर्वा’ आणि ‘फुलपाखरू’ या दोन मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘सिंगिग स्टार’ या शोचं सूत्रसंचालनही तिने केलं होतं. तसंच ‘दादा एक गुड न्यूज’ आहे या नाटकातूनही तिने काम केलं आहे. मात्र आता या नव्या मालिकेतून हृता आता दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

माझा होशील ना’ मालिका देखील घेणार का प्रेक्षकांचा निरोप

ADVERTISEMENT

खण मंगळसूत्राचा ट्रेंड, समिधा गुरूचा मराठमोळा साज

मालिकेचा अर्थ जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक,या नव्या मालिकेची होतेय चर्चा

04 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT