ADVERTISEMENT
home / मनोरंजन
khun mangalsutra

खण मंगळसूत्राचा ट्रेंड, समिधा गुरूचा मराठमोळा साज

खणाची साडी आणि मराठमोळा साज हा नक्कीच आपल्या सर्वांचा आवडता लुक आहे. आपल्याकडे नेहमीच नवनवे ट्रेंड येत असतात. त्यामध्ये केवळ साडी अथवा कपड्यांचेच नाहीत तर अगदी दागिन्यांचे ट्रेंडही असतात. यामध्ये महिलांचा अगदी जिवाभावाचा विषय म्हणजे मंगळसूत्र (khun mangalsutra). खणाची साडी (khun saree) नेसल्यानंतर आपण अगदी दागिन्यांनी स्वतःला मढवतो. अशा दागिन्यांमध्ये आता नवी भर घातली आहे ती म्हणजे खण मंगळसूत्राने. अभिनेत्री समिधा गुरूने (Samidha Guru) आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या व्हायरल होत आहेत. यामध्ये निळ्या रंगाच्या खणाच्या साडीवर अप्रतिम असे खण मंगळसूत्र समिधा गुरूने घातले आहे. तिचा हा लुक खूपच व्हायरल होताना दिसून येत आहे. 

अधिक वाचा – खतरों के खिलाडीमध्ये टीव्हीवरील आदर्श सून करतेय जबरदस्त स्टंट

समिधा गुरू सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. सध्या ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत समिधा काम करते आहे. तर इतर अनेक मालिकांमधून तिने आपली ओळख निर्माण केली आहे. समिधा वेगवेगळ्या प्रोजेक्टवरही काम करत असते. तिने काही दिवसांपूर्वीच खण साडीतील आपला एक फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो व्हायरल होत आहे त्याचे कारण म्हणजे तिने यामध्ये परिधान केलेले खणाचे मंगळसूत्र. अत्यंत वेगळे आणि नाजूक असे हे मंगळसूत्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. मुळातच समिधा दिसायला सुंदर आणि त्यात तिची अप्रतिम उंची. त्यामुळे तिने नेसलेली ही खणाची साडी तिच्यावर अत्यंत शोभून दिसत आहे. या खणाचे मंगळसूत्र आणि कानातले पाहून अगदी अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या चाहत्यांनीही तिला या लुकसाठी खूपच कौतुकास्पद कमेंट्स दिल्या आहेत. श्री क्रिएटिव्ह्ज यांनी या मंगळसूत्राचे डिझाईन केले असून समिधा या लुकमध्ये अप्रतिमच दिसून येत आहे. 

अधिक वाचा – अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या घरी दुहेरी गोडवा, जुळ्या मुलांचा जन्म

ADVERTISEMENT

खणाची चलती

अनेक सणवारांना सध्या खणांच्या साड्यांचा ट्रेंड अर्थात चलती आहे. त्यामुळे आपल्याला अनेक समारंभामध्येही खणाच्या साड्या दिसून येतात. पण त्यावर नक्की कोणता साज करावा हे मात्र काही जणांना चांगलंच उमगलं आहे आणि समिधा गुरूच्या या फोटोवरून तिलाही हे नक्कीच चांगले उमगले असल्याचे दिसून येत आहे. अत्यंत माफक दागिने आणि खणाच्या साडीवर खणाच्या मंगळसूत्राचा हा साज तिच्या सौंदर्याची शोभा अधिक खुलवतो आहे. नक्कीच तिच्या या फोटोमुळे आता खणाच्या मंगळसूत्राचा ट्रेंड चालू होईल यात काहीच शंका नाही. नाजूक आणि तितकेच लक्षवेधक असे हे मंगळसूत्र आता अनेक महिलांचे लक्ष वेधून घेईल हे नक्की. समिधाने ‘शुभमंगल सावधान’ मधून खलनायिकेचे काम करून अनेकांना आपल्या अभिनयाने आपलंसं करून घेतले आहे. तर सध्या अजूनही बरसात आहे या मालिकेत उमेशच्या बहिणीची व्यक्तिरेखा ती साकारात आहे. नाटक, मालिका, चित्रपट कोणत्याही माध्यमातून ती तितक्याच प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत येते. त्यामुळे तिचा चाहतावर्गही खूपच दांडगा आहे. आता समिधा अजून कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून दिसणार याचीही तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र तोपर्यंत तिचे अफलातून फोटोशूट पाहूनच चाहत्यांना समाधान मानावे लागणार आहे. 

अधिक वाचा – जान्हवी कपूरचा वेडिंग प्लॅन, या पद्धतीने पार पडणार लग्नसोहळा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

03 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT