ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
ice-water-facial-benefits-for-skin-in-marathi

Ice Water Facial चे त्वचेला मिळतात फायदे, घ्या जाणून

चमकदार त्वचा मिळविण्यासाठी महिला घरगुती उपायांपासून ते फेशियल करण्यापर्यंत सर्व प्रयत्न करतात. उन्हाळ्याच्या दिवसात केमिकलयुक्त क्रिम्समुळे त्वचेची जळजळ होणे अथवा फेशियल केल्याने अनेकांना त्रास होतात. पण चेहऱ्यावर चमक राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्वचेला थंडावा मिळावा यासाठी तुम्ही चेहऱ्यावर बर्फाच्या पाण्याने फेशियल (Ice Water Facial) करू शकता. सध्या आईस वॉटर फेशियल खूपच ट्रेंडमध्ये आहे. आईस फेशियलच्या मदतीने केवळ चेहऱ्याला थंडावाच मिळत नाही तर तुमची त्वचा अधिक चमकदार आणि सुंदर होण्यासही मदत मिळते. त्याशिवाय हे फेशियल करण्यसाठी तुम्हाला पार्लरमध्ये जायचीही गरज नाही. हे तुम्ही आरामात घरच्या घरीदेखील करू शकता. कोरियन आणि जपानी महिला (Korean and Japanese Women) या आईस वॉटर फेशियलचा अधिक वापर करतात. आईस वॉटर कसे करावे (How To Do Ice Water Facial) आणि याचे आईस वॉटर करण्याचे काय फायदे (Benefits Of Ice Water Facial) आहेत आपण पाहूया.

आईस वॉटर फेशियल करण्याची पद्धत 

आईस वॉटर फेशियल तुम्ही घरात अगदी सहजपणाने करू शकता. हे फेशियल करण्यासाठी ही आहे सोपी पद्धत 

  • एक मोठा बाऊल घ्या. त्यामध्ये बर्फाचे पाणी भरून घ्या
  • त्यानंतर या पाण्यात तुमचा चेहरा बुडवा 
  • साधारण 30 सेकंद तुम्ही तुमचा चेहरा या पाण्यात बुडवून ठेवा
  • त्यानंतर चेहरा वर काढा आणि कापसाने अथवा कॉटनच्या मऊ फडक्याने चेहरा पुसा
  • त्यानंतर पुन्हा बर्फाच्या पाण्यात 30 सेकंद तुम्ही तुमचा चेहरा या पाण्यात बुडवा
  • ही प्रक्रिया अशीच तुम्ही तीन ते चार वेळा करा 
  • पाण्यात चेहरा बुडवायचा नसेल तर तुम्ही बर्फाचे तुकडे कपड्यात गुंडाळून चेहऱ्यावर चोळावे 

आईस वॉटरचे फायदे (Benefits Of Ice Water Facial) 

Ice Water Facial

चेहऱ्याची सूज कमी करण्यासाठी – चेहऱ्याची सूज कमी करण्यासाठी आईस वॉटरचा उपयोग होतो. सकाळी उठल्यानंतर काही जणांच्या चेहऱ्यावर अथवा डोळ्यांवर सूज अर्थात पफीनेस दिसून येतो. हा पफीनेस कमी करण्यासाठी तुम्ही आईस वॉटर फेशियलचा वापर करू शकता. 

अॅक्नेपासून मिळते सुटका – उन्हाळ्याच्या दिवसात अनेकदा महिलांना चेहऱ्यावर पुळ्या येतात. विशेषतः तेलकट त्वचा असणाऱ्यांना अॅक्नेचा त्रास होतोच. चेहऱ्यावरील मुरूमं ही कोणत्याही महिलेच्या सौंदर्यामध्ये त्रासदायकच ठरतात. एकदा चेहऱ्यावर मुरूमं आल्यास, लवकर बरे होत नाहीत. मग अशावेळी तुम्हाला आईस वॉटर फेशियलची मदत घेता येते. 

ADVERTISEMENT

डोळ्याखालील काळी वर्तुळं – आईस वॉटर हे केवळ चेहऱ्यावरील डागच कमी करत नाहीत, तर डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळं कमी करण्यासाठीही याची मदत होते. डार्क सर्कल (Dark Circle) कमी करण्यासाठी बाजारामध्ये अनेक क्रिम्स आहेत. पण त्याहीपेक्षा आईस वॉटरचा अधिक चांगला फायदा होतो. आठवड्यातून तुम्ही दोन ते तीन वेळा डोळ्याखाली हा आईस वॉटर फेशियलचा प्रयोग केल्यास, काळी वर्तुळं जाण्यास मदत मिळते. 

तेलकट त्वचेसाठी आहे फायदेशीर – उन्हाळ्याच्या दिवसात तेलकट चेहऱ्यावर अतिरिक्त तेल आल्याने चेहऱ्यावर मुरूमं आणि अॅक्ने येतात. तेलकट त्वचेच्या काळजीसाठी तुम्ही तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये आईस फेशियल लुक समाविष्ट करून घ्या. या फेशियलमुळे चेहऱ्यावरील तेल कमी होण्यास मदत मिळते. 

आईस फेशियल करताना लक्षात ठेवा या गोष्टी 

Ice Water Benefits
  • मेकअप रिमूव्ह करण्यासाठी आईस वॉटरचा वापर करू नका. मेकअप काढण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचाच वापर करावा
  • बर्फाच्या पाण्याच्या फेशियलदरम्यान चेहऱ्यावर मेकअप लाऊ नका 
  • फेशियल करण्याच्या आधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या 
  • तुम्ही चेहऱ्यावर बर्फाचा वापर करणार असाल तर लक्षात ठेवा की, चेहऱ्यावर सरळ बर्फ लाऊ नका. नेहमी कपड्यामध्ये बांधूनच लावा 

आईस वॉटर फेशियलचे नुकसान 

आईस वॉटरचे फायदे आहेत त्याप्रमाणे त्याचे काही नुकसानही आहे. फेशियल करण्यापूर्वी तुम्हाला याबाबतही माहिती असायला हवी. जास्त थंड पाण्याने त्वचेवर जळजळ होऊ शकते. तसंच काही वेळ थंड पाण्यामुळे त्वचेवरील पोर्स बंद होतात. ज्यामुळे त्वचेत घाण साचून राहाते. त्यामुळे याचा वापर वर सांगितलेल्या योग्य पद्धतीनेच करावा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
20 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT