ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
remedies-for-acne-between-eyebrows-in-marathi

आयब्रोजमध्ये पुळ्या येत असतील तर करा सोपे उपाय

पुळ्या या केवळ चेहऱ्यावरच येतात असं तुम्हाला वाटतं का? तर असं अजिबात नाही. अनेकांना आयब्रोज अर्थात भुवयांच्या मध्येही पुळ्या येतात आणि केसात आलेल्या या पुळ्यांचा चेहऱ्यावरील पुळ्यांपेक्षा अधिक त्रासही होतो. तसंच तुमच्या सौंदर्यामध्येही याची बाधा येतो. भुवयांमध्ये आलेल्या पुळ्या कधीकधी इतक्या त्रासदायक ठरतात की, त्यामध्ये पू देखील झाल्याची अनेकांना समस्या होते. खरं आहे मुरूमं ही शरीरावर कोणत्याही ठिकाणी होऊ शकतात. पण तेलकट चेहरा असणाऱ्या अथवा चेहऱ्यावर आणि कपाळावर अधिक ऑईल ग्लँड्स असल्यामुळे भुवयांमध्ये मुरूमं होणं हे अत्यंत सामान्य आहे.  पण यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आयब्रोज अर्थात भुवयांमध्ये जर पुळ्या येत असतील तर तुमच्यासाठी काही सोपे उपाय आहेत, ते तुम्ही वापरून पाहा. 

तज्ज्ञांचा सल्ला 

नॉर्मल, तेलकट अथवा कॉम्बिनेशन त्वचेवर मुरूमं आणि अॅक्ने येण्याचा धोका जास्त असतो. वास्तविक कपाळावर अधिक प्रमाणात ऑईल ग्लँड्स असतात. त्यामुळे कपाळावर डाग आणि मुरूमं अगदी सहज होतात. केसात कोंडा असल्यास, कपाळावर आणि भुवयांमध्ये हमखास भुवया होतात. त्यामुळे तेलकट त्वचेची विशेष काळजी घ्यायला हवी. 

भुवयांच्या मध्ये मुरूमं होत असल्यास उपाय 

योग्य उत्पादनांसह रोज क्लिनिंग आणि त्वचेची काळजी घेणे त्वचेवर होणारी मुरूमं आणि पुळ्यांपासून वाचण्यासाठी योग्य पद्धत आहे. पोर्सना तुम्ही तेलापासून वाचविले पाहिजे आणि चेहऱ्यावरील तेल कमी करण्याची गरज आहे. मुरूमं होऊ नयेत यासाठी सकाळी आणि रात्री चेहरा धुताना कोणत्याही मेडिकेटेड क्लिंन्झर अथवा साबणाचा वापर करावा. तसंच सकाळी चेहरा स्वच्छ केल्यानंतर कापसाच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा अथवा गुलाबपाण्याची मदत घ्या. हे चेहऱ्यावरील तेल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते आणि पोर्स स्वच्छ करते. यामुळे भुवयांमध्ये मुरूमं होत नाहीत. 

घरगुती एस्ट्रिंजेंट टोनरचा वापर

काकडीचा रस आहे योग्य एस्ट्रिंजेंट 

  • काकडीच्या रसात थोडेसे गुलाबपाणी मिक्स करा आणि कापसाच्या मदतीने चेहऱ्याला लावा 
  • हे तुम्ही साधारण 10 मिनिट्स चेहऱ्याला लावा आणि तसंच ठेवा त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा 

ग्रीन टी देखील आहे चांगला एस्ट्रिंजेंटचा स्रोत 

  • ग्रीन टी ची पाने अथवा टी बॅग एका कपमध्ये गरम पाणी घेऊन त्यात साधारण अर्धा तास भिजवून ठेवा 
  • त्यानंतर पाणी थंड करा, गाळून घ्या आणि मग हे पाणी तुम्ही तुमच्या त्वचेला लावा 

टी ट्री ऑईलचा वापरही करू शकता एस्ट्रिंजेंट स्वरूपात 

  • टी ट्री ऑईलचे 2 थेंब हे 2 मोठ्या चमच्याच्या पाण्यात अथवा गुलाबपाण्यात मिक्स करा 
  • हे तुम्ही भुवयांमध्ये आलेल्या मुरूमांवर लावा आणि काही वेळाने स्वच्छ करा

दालचिनीचा फेस मास्क 

Dalchini Benefits In Marathi

दालचिनीचा फेसमास्कदेखील तुम्ही मुरूमांवर लाऊन हे लवकर घालवू शकता. तुम्हाला हवं असेल तर चंदनाचा मास्क बनवूनही तुम्ही लाऊ शकता.

ADVERTISEMENT

साहित्य 

  • 1 चमचा दालचिनी पावडर 
  • अर्धा चमचा मेथी पावडर 
  • काही थेंब लिंबाचा रस 
  • काही थेंब मध 

बनविण्याची पद्धत 

  • सर्व साहित्य एकत्र करून त्याची पेस्ट बनवून घ्या 
  • हे केवळ तुम्ही पुळ्या आल्या आहेत त्याच ठिकाणी लावा आणि रात्रभर तसंच ठेवा 
  • सकाळी चेहरा स्वच्छ धुवा 

कडुलिंबाच्या पानांचा फेसपॅक 

Neem Benefits In Marathi

कडुलिंबाच्या पानामध्ये कार्बनिक सल्फर यौगिक असते जे मुरूमं लवकर संपुष्टात आणण्यासाठी मदत करतात 

साहित्य 

ADVERTISEMENT
  • 4 कप पाणी 
  • मूठभर कडुलिंबाची पाने 

बनविण्याची पद्धत 

  • एका तासासाठी 4 कप पाणी मंद आचेवर मूठभर कडुलिंबाची पाने घालून उकळवा
  • उकळल्यावर रात्रभर हे पाणी असंच झाकून ठेवा 
  • दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी गाळा आणि पानांची पेस्ट बनवा
  • पुळ्या आलेल्या ठिकाणी ही पेस्ट लावा 
  • पाण्याचा उपयोग बाकी त्वचा धुण्यासाठी करा 

अन्य उपाय 

  • तुमचे केस आणि स्काल्प पूर्णतः स्वच्छ आहे याची काळजी घ्या. जर स्काल्प तेलकट असेल अथवा त्यामध्ये कोंडा असेल तर या कारणामुळे मुरूमं अथवा पुळ्या होऊ शकतात
  • रात्री झोपताना केस चेहऱ्यापासून दूर ठेवा 
  • कोंडा असेल तर 1 चमचा अँटिसेप्टिक लोशन घालून गरम पाण्यात साबण मिक्स करून उशांची कव्हरं आणि टॉवेल्स धुवा 
  • आपल्या डाएटमध्ये ताजी फळं, कच्चे सलाड, अंकुरलेले धान्य, दही याचा समावेश करून घ्या आणि रोज 6-8 ग्लास पाणी प्या् 
  • एक ग्लास पाण्यात एका लिंबाचा रस मिक्स करा आणि सकाळीच याचे सेवन करा

या सोप्या उपायांचा वापर करून तुम्ही आयब्रोजमध्ये अर्थात भुवयांमध्ये झालेल्या पुळ्या कमी करू शकता. या नैसर्गिक गोष्टींमुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. मात्र तरीही याचा वापर करण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट नक्की करून घ्या.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

16 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT