ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
mayuri deshmukh

….म्हणून मयुरी देशमुख दिसते इतकी सुंदर, शेअर केलं सौंदर्याचं रहस्य

सध्या आपल्या अभिनयाने ‘इमली’ (Imli) मालिकेतून प्रेक्षकांना जिंकून घेत असलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh). कोरोना काळ, चित्रीकरणाच्या वेळा सांभाळणे या सगळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेणे हे नेहमीच महत्त्वाचे असते आणि ही काळजी नक्की कशी घेतली जाते असा प्रश्न चाहत्यांनाही असतो. आम्ही मयुरीशी यासंदर्भात बोललो आणि तिने आपल्या सौंदर्याचे काही गुपित ‘POPxo मराठी’सह शेअर केले आहे. खरं तर मयुरी आपल्याला आपल्यातलीच एक वाटते. अगदी घरगुती, सुंदर आणि तितकीच सालस आणि तरीही वेगळी. अशाच सुंदर मयुरीने नक्की काय सांगितले जाणून घेऊया.

घरगुती आणि ऑर्गेनिक गोष्टींवर भर 

Mayuri Deshmukh

आपल्या त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातही जर तुम्ही अभिनेत्री असाल तर नेहमीच चाहत्यांना असं वाटतं असतं की, अभिनेत्री महागड्या गोष्टींचा आणि उत्पादनांचा वापर करून आपले सौंदर्य जपतात. पण मयुरीशी बोलल्यानंतर तिने याबाबतीत स्पष्ट केले. मयुरी म्हणाली, ‘मला ऑर्गेनिक उत्पादनांचा वापर करायला जास्त आवडतं. त्यातही घरगुती पदार्थांचा वापर तर उत्तमच.’ मयुरी क्रुएल्टी फ्री उत्पादनांना प्राधान्य देते. घरगुती पदार्थ म्हणजे ती आपली त्वचा उत्तम राखण्यासाठी नक्की काय करते असं विचारल्यावर तिने अगदी लहानपणीपासूनचा आवडता नुस्खा सांगितला. ती म्हणाली, ‘लहानपणीपासूनच डाळीचं पीठ आणि त्यात दही मिक्स करून पेस्ट लावणे हा माझ्यासाठी आजही उत्तम उपाय आहे. त्वचा कोरडी असल्यामुळे दही मिक्स करून डाळीचे पीठ लावल्यावर त्वचा उत्तम राहाते. तसंच नियमित बनाना मास्क, कोको मास्क याचाही वापर मी करते.’ तसंच कोरड्या त्वचेसाठी आपण नियमित नारळाच्या तेलाचा वापर करत असल्याचेही मयुरीने यावेळी सांगितले. इतकंच नाही तर प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे उत्पादन कोणतेही असो वापरण्याआधी नक्की प्रत्येकाने पॅच टेस्ट करून घ्यावी असा प्रेमळ आणि काळजीपूर्वक सल्लाही तिने आपल्या चाहत्यांना दिला आहे. 

फॅशन म्हणजे साडी 

Courtesy – Instagram

मयुरीचे अनेक फोटो आपण पाहिले आहेत ज्यामध्ये ती सुंदरच दिसते. पण फॅशन म्हणजे तुझ्यासाठी नक्की काय असं विचारल्यावर मयुरी एका क्षणाचाही विलंब न करता म्हणाली, ‘साडी’. सध्या इमली या मालिकेतही मयुरी साडीमध्येच दिसून येते. त्यामुळे साडी ही दिसायला एलिगंट तर आहेच पण त्यामध्ये मला अगदी आरामदायी वाटतं असंही मयुरी म्हणाली. तर सर्वात आरामदायी म्हणजे ‘पायजमा’ सध्याचं फॅशन स्टेटमेंट म्हणायचं झालं तर घरात तेच अत्यंत आरामदायी वाटतं असंही मयुरीने अगदी दिलखुलासपणे मत व्यक्त केलं. यापेक्षा आरामदायी फॅशन स्टेटमेंट असूच शकत नाही सध्या असंही तिने हसत सांगितलं. 

योगाचाही होतो उपयोग 

या क्षेत्रात राहायचं म्हणजे फिट आणि फाईन राहणं अत्यंत गरजेचे आहे. सौंदर्याच्या बाबतीत जाणून घेता घेता मयुरीने तिच्या फिटनेसचंही रहस्य शेअर केलं. ‘घरगुती जेवणालाच मी प्राधान्य देते. अगदी सेटवर जातानाही मी माझा डबाच घेऊन जाते. महिन्यातील 28 दिवस चित्रीकरणात असल्यामुळे घरातील हेल्दी खाणं आपल्याला नेहमीच आवडतं. तेलकट खाऊ नका असा सल्ला काही मी देणार नाही. पण घरगुती खा. महाराष्ट्रीयन जेवणावरच भर देते.’ त्याशिवाय मयुरी आठवड्यातून दोन ते तीन वेळा योगा करतेच. योगामुळेही आरोग्य निरोगी राखायला फायदा होतो. 

ADVERTISEMENT

मयुरी सध्या गश्मीर महाजनीसोबत (Gashmir Mahajani) इमली या मालिकेतून प्रेक्षकांना रोज भेटत आहे. ही मालिका प्रेक्षकांना आवडतही आहे. मयुरीचे फॅन फॉलोईंग खूपच आहे. त्यामुळे तिच्या स्किन केअर रूटीन आणि फिटनेसबद्दल त्यांनाही जाणून घेण्याची उत्सुकता होती. मयुरीचे हे सौंदर्याचे गुपित आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवले आहे. तुम्हाला नक्की कसे वाटले नक्की आम्हाला सांगा आणि marathi.popxo.com वरील आर्टिकल लाईक आणि शेअर करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

30 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT