ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
french fries history

फ्रेंच फ्राईज कसे झाले तयार, वाचा मजेशीर इतिहास

कोणतेही फास्ट फूड खायला गेल्यानंतर सर्वात आधी ऑर्डर केली जाते ती म्हणजे फ्रेंच फ्राईजची. आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेंच फ्राईज आपल्याला चाखायला मिळतात. पण कुठेही गेल्यानंतर सर्वात पहिले खायला सुरूवात होते ती फ्रेंच फ्राईजने. पण कधी तुम्हाला हा प्रश्न मनात आला आहे का? फ्रेंच फ्राईज सर्वात पहिले नक्की कुठे आणि कसे तयार झाले? याचा नक्की इतिहास काय आहे आणि जगभरात याला इतकी प्रसिद्धी का बरं मिळाली असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखातून नक्की मिळतील. फ्रेंच फ्राईजचा मजेशीर इतिहास जाणून घ्या.

फ्रेंच फ्राईजचा इतिहास

french fries – freepik

फ्रेंच फ्राईजचा इतिहास अगदीच रंजक आहे. तुम्हाला कदाचित माहीत नसेल की सर्वात पहिले फ्रान्स आणि उत्तर बेल्जियमच्या आसपास बटाटा तळून खाण्याची पद्धत होती. तसंच इथे काही वस्तीतील लोक हे मासेदेखील तळून खायचे. पण थंडीच्या दिवसात जेव्हा नदीचे पाणी गोठून बर्फ तयार व्हायचा तेव्हा मासे मिळणं कठीण होतं. तेव्हा अन्य गोष्टी तळून खाण्यासाठी या लोकांनी प्राधान्य दिले. त्याच दरम्यान फ्रान्स आणि उत्तर बेल्जियमच्या परिसरातील लोकांनी बटाटा घेऊन लहान माशांचा आकार देऊन अर्थात बटाटे त्या स्वरूपात कापून त्यांना तळून खाण्याची सुरूवात केली. त्यानंतर या पदार्थाचा मुख्य खाण्यामध्ये समावेश झाला. यानंतर फ्रेंच फ्राईजची उत्पत्ती झाली आणि हा पदार्थ अधिक प्रमाणात प्रसिद्ध होऊन खाऊ जाऊ लागला. 

अधिक वाचा – बटाटा वडा रेसिपी मराठीतून, विविध पद्धतीने बनवा बटाटावडा (Batata Vada Recipe In Marathi)

फ्रान्स क्रांतीदरम्यान 

french fries history

तसंच तुम्हाला हेदेखील माहीत नसेल की, 17  व्या शतकादरम्यान फ्रान्स क्रांती घडली होती. त्यावेळी सैनिकांना खाण्यासाठीही फ्रेंच फ्राईज देण्यात येत होते. सैनिकांनाही हा पदार्थ आवडू लागला. काही लोकांना असे वाटते की फ्रान्समधील प्रसिद्ध पॅरिसियन पुलाच्या नावावर या फ्राईड बटाट्याचे नाव फ्राइट्स पॉंट न्यूफ असे ठेवले होते मात्र नंतर त्याचे नाव बदलून फ्रेंच फ्राईज असे करण्यात आले. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – तोंडाची चव बदलतील या 5 चटकदार रेसिपी,नक्की करुन पाहा

फ्रेंच फ्राईजची अन्य माहिती 

तुमच्या माहितीसाठी असे की, काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे हा पदार्थ सर्वात पहिले थॉमस जेफरसन या नावाच्या व्यक्तीने तयार केला होता. त्यानंतर हळूहळू समूचे युरोप आणि नंतर आशियाई देश, आफ्रिकी देश आणि खाडी देशांमध्ये हा पदार्थ अधिक प्रमाणात प्रसिद्ध झाला आणि खाण्यासाठी अधिक मागणी वाढू लागली. तसंच या पदार्थाला अनेक देशांमध्ये विविध नावे आहेत. उदाहरणार्थ स्किनी फ्रेंच फ्राईज, राऊंड फ्रेंच फ्राईज, क्लासिक फ्रेंच फ्राईज. अर्थात आपल्याकडे आता या पदार्थामध्ये भारतीय मसाल्यांचा वापर करून अथवा चीज आणि अन्य पदार्थांचा वापर करून वेगवेगळे फ्रेंच फ्राईज बनवले जातात. 

नक्कीच तुम्हालाही फ्रेंच फ्राईजचा हा इतिहास रंजक वाटला असणारच. आतापर्यंत नुसतं हॉटेलमध्ये जाऊन फ्रेंच फ्राईज आपण खात होतो. पण आता इतिहास जाणून घेतल्यावर अधिक मजेने आपण खाऊही शकतो आणि इतरांना याची माहितीही देऊ शकतो. विशेषतः तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लहान मुलांना या फ्रेंच फ्राईजचा इतिहास तुम्ही नक्कीच सांगा कारण त्यांनाही याचा इतिहास जाणून अधिक मजा येईल.

अधिक वाचा – सध्या घरात फ्रोझन फूडचा पर्याय, चटपटीत पदार्थांची रेलचेल 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

24 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT