ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
वेगळ्या झटपट रेसिपी

जेवणाचा कंटाळा आलाय, भाजीही नकोशी झालीय ट्राय करा या रेसिपी

 कधी कधी घरातील तोच तोच पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो. म्हणजे वरण- भात दिसला तरी देखील ते खाण्याची अजिबात इच्छा होत नाही. बरं याचा अर्थ काही बाहेरचं खाल्ल्यामुळेच बरे वाटेल असेही नसते. रोजच्या चवीपेक्षा थोडे वेगळे काहीतरी खाण्याची इच्छा असते. या उन्हाळ्यात तर काहीही खावेसे वाटत नाही. खूप जड किंवा त्याच त्याच चवीचे न खाता काहीतरी वेगळे खाण्यासाठीच या काही सोप्या रेसिपीज शेअर करत आहोत. त्या तुमच्या जेवणाची चव वाढवण्यास नक्कीच मदत करतील. जर तुम्हाला काही गोड खायचे असेल तर खीर रेसिपी देखील ट्राय करु शकता

 भरली मिरची

भरली मिरची

भरलेली तिखट मिरचीच तुम्ही आतापर्यंत खाल्ली असेल पण तुम्ही कधी थोडी आंबट- गोड अशी भरली मिरची खालेली आहे का? नसेल खाल्ली तर तुम्ही ती नक्की ट्राय करा. बाजारात भरणाऱ्या मिरच्यांपेक्षा थोडी लहान अशी मिरची मिळते. या मिरची खरंतरं तोंडी लावण्यासाठी दिल्या जातात. पण तुम्ही पोळी किंवा भातासोबत खाऊ शकता. 

साहित्य: भरण्यासाठीच्या मिरच्या, ओलं खोबरं, जीर, हळदं, शेंगदाणा, मीठ, तेल

कृती: 

ADVERTISEMENT
  • मिरची स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून टाकाव्यात. 
  • मसाल्यासाठी खबलेलं ओलं खोबरं, जीर, हळद, मीठ असे एकत्र करुन कोरडेट वाटून घ्यावे. 
  • आता एका तव्यावर थोडेसे तेल घेऊन आपण वाटलेला मसाला चांगला परतून घ्यावा. त्यात आवडत असल्यास शेंगदाण्याचे कूट घालावे.
  • तयार मसाला मिरच्यांमध्ये भरुन मिरच्या तेलात शिजवून घ्याव्यात. ही मिरची भातासोबत मस्तच लागते. 

बटाट्याचा रस

बटाट्याचा रस

डाळ, आमटी असं काही हेवी नको असेल मस्त भात आणि त्यावर चटकदार असे काही खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही मस्त बटाट्याचा रस्सा करु शकता.

साहित्य: बटाट्याच्या फोडी, 1 कांदा, 1 टोमॅटो, ठेचलेला लसूण, लाल तिखट, हळद, मीठ, तेल

कृती:

  •  एका कढईत तेल गरम करुन लसूण चांगला परतून घ्या. त्यामध्ये कांदा चांगला परतून घ्या. 
  • कांदा भाजला की, त्यामध्ये मसाले घालून मग टोमॅटो घाला. टोमॅटो चांगला गळल्यानंतर त्यामध्ये बटट्याच्या फोडी घाला.
    रस होण्याइतके पाणी घालून बटाटा चांगला शिजेपर्यंत आदाण आणा. तुमच्या चमचमीत बटाटा रस्सा तयार 
  • कधी कंटाळा आला तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

सावजी डाळ कांदा

सावजी डाळ कांदा

भाजी ज्यांना खाऊन खूप कंटाळा आला असेल अशांना सावजी डाळ कांदा देखील करु शकता. भात, पोळी, भाकरी यासोबत ही डिश चांगली लागते.

ADVERTISEMENT

साहित्य:  1 कप चणाडाळ, चिरलेला कांदा, सावजी काळा मसाला, लाल तिखट, लवंग, जिरे, तमालपत्र, काळीमिरी,मीठ, तेल आणि कोथिंबीर

कृती:

  • चणाडाळ रात्रभर भिजत घाला. दुसऱ्या दिवशी त्यातील पाणी निथळून घ्या. 
  • एका कढईत तेल गरम करुन त्यामध्ये खडे मसाले आणि कांदा घालून चांगलं परतून घ्या. 
  • त्यात लाल-तिखट आणि काळा मसाला घालून चांगलं एकजीव करा. 
  • त्यामध्ये चणाडाळ घालून एकजीव करुन पाणी घालून ही डाळ चांगली शिजू द्या. 
  • वरुन कोथिंबीर भुरभुरा तुमची सावजी डाळ कांदा तयार 

आता कंटाळा आल्यावर या रेसिपी नक्की ट्राय करा.

12 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT