ADVERTISEMENT
home / Diet
बेक्ड फराळ खरंच असतो का हेल्दी, जाणून घ्या सत्य

बेक्ड फराळ खरंच असतो का हेल्दी, जाणून घ्या सत्य

हल्ली आपल्या सगळ्यांना सगळंकाही हेल्दी हवं असतं. प्रत्येक ठिकाणी आपण किती कॅलरीज खात आहोत. याचा ट्रॅक हल्ली अनेक जणं ठेवतात. असे करत असताना मध्ये येणारे सण- उत्सव आणि त्यावेळी बनणारे चमचमीत पदार्थ तोंडाला पाणी आणतात. आता या खास पदार्थांचा अपमान तरी कसा करायचा असे अनेकांना वाटते. मग काळ तळलेले आणि गोड पदार्थ अगदी ताव मारुन खाल्ले जातात. पण असे पदार्थ शरीरातील फॅट म्हणजेच चरबी वाढवतात. लोकांचा ‘हेल्द कॉन्शिअस’स्वभाव पाहूनचं आता असेच पदार्थ हेल्दी बनवण्याच्या अनेक पद्धती काढण्यात आल्या आहेत. अनेक तळण्याच्या पदार्थांना ‘Baked’ पदार्थांचा पर्याय आणला आहे. दिवाळीच्या दिवसात अनेक ठिकाणी तेलकट पदार्थ टाळण्यासाठी बेक्ड फराळाचा पर्याय बाजारात सर्रास पाहायला मिळतो. पण बेक्ड फराळ खराच हेल्दी असतो का? जाणून घेऊया या मागचं सत्य. ज्यामुळे दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा (diwali padwa wishes in marathi) खऱ्या अर्थाने गोड होतील.

ओमेगा-3 युक्त आहार घेतल्यास हार्ट अटॅकमुळे येणाऱ्या मृत्यूचा धोका होतो कमी

तेलाचा होत नाही उपयोग

तेलाचा होत नाही उपयोग

Instagram

कोणतीही रेसिपी बेक्ड करण्याचा पहिला उपयोग म्हणजे तेलापासून सुटका. अत्यंत कमी तेलामध्ये हे सगळे पदार्थ केले जातात. तेलाचा उपयोग या सगळ्या रेसिपींमध्ये केवळ ब्रशने वरुन लावण्याइतकाच केला जातो. दिवाळीचे सगळे पदार्थ हे तेलात तळले जातात. चकली, करंजी, शेव, चिवडा या सगळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तेल असते. त्यामुळे कॅलरीज आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती यामध्ये सगळ्यात जास्त असते. बेक्ड फराळामुळे हे भीती कमी होते. तुम्ही अगदी डोळे झाकून करंजी किंवा तुमच्या आवडीचा शेव खाऊ शकता. चवीच्या बाबतीत सांगायचे झाले तर तळणीचा पदार्थ हा अधिक रुचकर लागत असला तरी देखील हे पदार्थही त्याच चवीचे लागतात. 

ADVERTISEMENT

दुधाच्या या रेसिपी तुमचं वजन घटविण्यासाठी ठरतील फायदेशीर

नॅचरल स्विटनर्सचा केला जातो वापर

साखर ही वजन वाढण्यासाठी कारणीभूत असते. फराळात वापरली जाणारी साखर ही किती असते हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. बेक्ड फराळामध्ये साखरेऐवजी खजूर,गुळ असे नैसर्गिक स्विटनर्स वापरले जातात. जे पदार्थाला आवश्यक असलेला गोडवा देतातच. शिवाय तुमच्या शरीराला उर्जा देतात. असे नॅचरल स्विटनर असलेले पदार्थ खाल्ले की, पोटाला फार जड वाटत नाही. शिवाय तुमचे वजनही वाढत नाही. बेक्ड फराळामध्ये साखर वापरली जात नाही असे नाही. तर बेक्ड फराळाचे काम तुम्हाला हेल्दी ठेवणे असल्यामुळे साखरेऐवजी वेगळे घटक वापरले जातात.

कुल्हडमधून चहा पिण्याचे फायदे, हाडं राहतात मजबूत

मैद्याऐवजी वापरले जाते गव्हाचे पीठ

बेक्ड फराळ असतो हेल्दी

Instagram

ADVERTISEMENT

मैद्यामध्ये ग्लुटेन असते. ग्लुटेन हे शरीरासाठी फार घातक असते. मैदा असलेले पदार्थ ग्लुटेनने भरलेले असते. गव्हाच्या पिठात फार कमी प्रमाणात ग्लुटेन असते. मैद्याच्या शंकरपाळ्यांऐवजी तुम्ही गव्हाच्या शंकरपाळ्या खा. यामध्ये तुम्ही गुळाचा उपयोग करुन हे पदार्थ तुम्ही बेक्ड करु शकता. बेक्ड पदार्थ हे चवीला खूप चांगले लागतात. शंकरपाळ्या या अनेकदा डालड्यामध्ये केलेल्या असतात. त्यामुळे त्या फार फॅट वाढवतात.  बेक्ड शंकरपाळ्या त्यामानाने फार हेल्दी असतात.  त्यामुळे तुम्ही रेसिपी पाहून त्यानुसार हे सगळे पदार्थ करु शकता.

आता बेक्ड फराळ का इतका हेल्दी आणि महाग असतो हे तुम्हाला नक्कीच कळले असेल. पण असा फराळ विकत घेताना तो योग्य ठिकाणाहून विकत घ्या. कारण अनेक ठिकाणी बेक्ड फराळच्या दरात फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. 

10 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT