ADVERTISEMENT
home / आरोग्य
कुल्हडमधून चहा पिण्याचे फायदे, हाडं राहतात मजबूत

कुल्हडमधून चहा पिण्याचे फायदे, हाडं राहतात मजबूत

बऱ्याच जणांच्या दिवसाची सुरूवात चहाशिवाय होत नाही. चहा नसेल तर पूर्ण दिवस खराब होतो. सकाळी सकाळी चहा पिण्याचा आनंदच काही वेगळा असतो. जास्त जण काचेच्या कपातून अथवा ग्लासमधून चहा पिण्याला प्राधान्य देतात. पण फार जुन्या काळी मातीच्या भांड्यातून अर्थात कुल्हडमधून चहा प्यायला जायचा. कारण हा चहा केवळ स्वादच वाढवत नाही तर याच्या मातीच्या सुगंधाने तुम्हाला सतत चहा प्यावासा वाटतो आणि तुमचे मनही उल्हासित राहते. उत्तर भारतात आणि काही गावांमध्ये आजही कुल्हडमधूनच चहा प्यायला जातो. आरोग्यासाठी याचा खूपच फायदा होतो. आपल्या शरीरातील हाडं मजबूत राहण्यासाठी याचा फायदा होतो. त्यामुळेच बऱ्याच ठिकाणी याचा वापर केला जातो. त्यामुळे तुम्हीही तुमच्या दैनंदिन आयुष्यात याचा  वापर करून घेतला तर तुम्हाला फायदाच मिळेल. सध्या अनेक ठिकाणी डिस्पोजल कप वापरण्यात येतात. यामुळे सध्या व्हायरसच्या दिवसात अधिक संपर्कात येण्याचा धोका असतो. तुम्ही स्टील, काच अथवा थर्माकोल, प्लास्टिकच्या ग्लास वा कपाऐवजी कुल्हडचा वापर केल्यास तुम्हाला अधिक फायदा मिळेल. 

चहामध्ये साखरेपेक्षा वापरा मध, जाणून घ्या फायदे

कुल्हडमध्ये चहा पिण्याचे फायदे

प्लास्टिकने बनलेले ग्लास अथवा काचेच्या ग्लासातून चहा पिणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. याने शरीराला नुकसान पोहचते आणि हे पर्यावरणासाठीही योग्य  नाही. मातीने बनलेले कुल्हड हे इकोफ्रेंडली असून खराब झाल्यानंतर फेकल्यासदेखील हे मातीतच मिसळतात. याचे  अनेक फायदे आहेत. कुल्हडमधून चहा प्यायल्यास, तुमचे पचनतंत्र बिघडत नाही आणि शरीरातील हाडं मजबूत राखण्यास  मदत मिळते. याशिवाय मातीच्या भांड्यामध्ये क्षार असतात ज्यामुळे, अॅसिडिक त्रास असतील तर ते कमी होण्यास  मदत  मिळते. कारण यामध्ये कॅल्शियम जास्त  प्रमाणात असते आणि ते शरीरातील अॅसिड कमी करण्याचे काम करतात. तसंच कुल्हडमधून येणारा मातीचा सुगंध हा चहामध्ये इतका अप्रतिम मिक्स होतो की, त्यामुळे चहाचा अधिक स्वाद येतो आणि ताजेपणा मिळतो. 

जिऱ्याचा चहा वजन कमी करण्यासाठी आहे फायदेशीर, शरीरासाठी आहे डिटॉक्स

ADVERTISEMENT

प्लास्टिक, फोम कपमधून चहा पिऊ नका

डिस्पोजल कप अथवा प्लास्टिक कपमधून चहा पिणं शक्यतो टाळा. हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. डिस्पोजल कप हे पॉलीस्टिरीनपासून बनलेले असतात. गरम गरम चहा त्यात ओतल्यावर त्याचे तत्व चहामध्ये उतरते आणि पोटामध्ये जाते. यापासून काही गंभीर पोटाच्या समस्या उद्भवण्याचा धोका असतो. तसंच यामुळे पोट खराब होऊन पचनक्रियेवर सर्वात जास्त परिणाम होताना दिसतो. यामध्ये असणारे अॅसिड चहामधून पोटात जाते आणि आतड्यांमध्ये  जमा होते जे शरीरावर वाईट परिणाम करताना दिसते. 

कच्च्या हळदीचा चहा पिऊन वाढवा प्रतिकारशक्ती

काचेच्या कपानेही होते नुकसान

अनेक ठिकाणी अगदी चहाच्या गाडीवरही चहा काचेच्या कपातून दिला जातो. पण आपण बऱ्याचदा बघतो की काचेचे कप स्वच्छ होत नाहीत. हे ग्लास तसेच विसळले जातात. यामध्ये बॅक्टेरिया तसाच टिकून राहातो आणि हे शरीरासाठी आणि आरोग्यासाठी नक्कीच हानिकारक आहे. पण असे कुल्हडच्या बाबतीत होत नाही. मुळातच मातीचा असल्याने यावर बॅक्टेरिया टिकून राहात नाही. काचेच्या कपाने इन्फेक्शनची जोखीमही जास्त असते. त्यामुळे तुम्ही सहसा चहा पिताना कुल्हडचा वापर केलात तुम्हाला अनेक फायदे मिळतील आणि अन्य त्रासांपासून सुटकाही मिळेल. आरोग्यासाठी अत्यंत चांगला उपयोगी ठरणारा हा कुल्हडचा चहा तुम्हीही नक्कीच ट्राय करायला हवा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
20 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT