ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
फिटनेससाठी ब्राऊन ब्रेड खाताय? जाणून घ्या ब्राऊन आणि व्हाईट ब्रेडमधील फरक

फिटनेससाठी ब्राऊन ब्रेड खाताय? जाणून घ्या ब्राऊन आणि व्हाईट ब्रेडमधील फरक

हल्ली आरोग्याकडे, फिटनेसकडे आपण इतके लक्ष देतो की, आपण खात असलेल्या पदार्थांमधून आपल्याला पोषकतत्वे मिळावी असे आपल्याला वाटते. हल्ली लोक व्हाईट ब्रेडचे सेवन करण्याऐवजी मल्टी ग्रेन किंवा ब्राऊन ब्रेड खातात. पण तुम्ही खात असलेल्या या मल्टीग्रेन किंवा ब्राऊन ब्रेड आणि व्हाईट ब्रेडमध्ये नेमका काय फरक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला ही माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला ब्राऊन ब्रेड आणि व्हाईट ब्रेडमधील नेमका न्युट्रीशनल फरक काय हे जाणून घेणार आहोत. मग करुया सुरुवात

बिनधास्त खा भात कारण भात खाण्याचे आहेत भरपूर फायदे( Benefits of eating Rice in Marathi)

असा बनवला जातो पाव

ब्रेड बनवताना

shutterstock

ADVERTISEMENT

पाव बनवण्याची पद्धत ही एकच आहे आणि यासाठी साहित्यही अगदी सारखेच वापरले जाते. पाव बनवण्यासाठी मैदा, पाणी, मीठ आणि इस्ट हे साहित्य वापरले जाते. आता वेगवेगळ्या पद्धतीचे पाव बनवताना त्यामध्ये वेगवेगळ्या वाढीव गोष्टी घातल्या जातात.

ब्राऊन ब्रेड (Brown Bread)

गव्हापासून बनतो ब्राऊन ब्रेड

shutterstock

आता आपण सगळीकडे ब्राऊन ब्रेडची क्रेझ वाढत आहे. ब्राऊन ब्रेड हा तेव्हाच चांगला असतो ज्यावेळी तो गव्हापासून बनवला जातो. हल्ली केवळ गव्हाचा रंग येण्यासाठी रंग वापरला जातो. त्यामुळे तुम्ही या गोष्टीपासून सावध असायला हवे. त्यामुळे तुम्ही घेत असलेल्या ब्राऊन ब्रेडचे पॅकेट नीट पाहा. त्यामध्ये लिहिलेली न्युट्रीशनची यादी चेक करा तुमच्या लक्षात येईल.   ब्राऊन ब्रेड हा गव्हापासून बनवला जातो. त्यामुळे तो अधिक हेल्दी असतो असे म्हणतात. याचे कारण असे की, त्यामध्ये कॅलरीजच्या तुलनेत फॅटचे प्रमाण फारच कमी असते. त्यामुळे हा ब्रेड तुम्हाला एनर्जी देतो. याची चव तुम्हाला फार खास लागणार नाही. पण त्यासोबत तुम्ही अंडी किंवा इतर काही गोष्टी खाल्ल्या तर त्या पोटभरीच्या होतात. दिवसातून 2 स्लाईस या तुमच्यासाठी पुरेशा आहेत.  लहानमुलांनी किंवा ज्येष्ठांनी ब्राऊन ब्रेडचे सेवन करावे कारण त्यातून मिळणारे कॅल्शिअम हाडांच्या बळकटीसाठी आणि इतरगोष्टींसाठी आवश्यक असते. 

ADVERTISEMENT

म्हणून नियमित जेवणानंतर बडीशेपसोबत खा धणाडाळ

व्हाईट ब्रेड (White Bread)

व्हाईट ब्रेड

shutterstock

अगदी लहानपणांपासून आपण हा व्हाईट ब्रेड खातोय. सँडवीच किंवा इतर कोणत्याही रेसिपीसाठी आपण हा ब्रेड आपण वापरला असेल. व्हाईट ब्रेड हा मैद्यापासून बनलेला असतो. मैदा हा आरोग्यासाठी चांगला नाही हे जरी खरे असले तरी व्हाईट ब्रेड हे शरीरासाठी इतके घातक नाही. गव्हापासूनच मैदा तयार होतो. काही जणांच्या मते व्हाईट ब्रेड आणि ब्राऊन ब्रेडमध्ये फारसा फरक नाही. याच्या सेवनामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होत नाही. व्हाईट ब्रेडमध्ये 10 % जास्त कॅल्शिअम, आर्यन, मॅग्नीझ असते. यामध्ये फॅट आणि साखरेचे प्रमाण कमी असते. त्यामुळे हा ब्रेडही खाण्यास आणि आरोग्यास उत्तम आहे.

ADVERTISEMENT

पावामध्ये असणाऱ्या साखरेचे तथ्य

पावामध्ये असते साखर

shutterstock

आता जर तुम्ही पावाची रेसिपी पाहिली असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की, पावाच्या कोणत्याही रेसिपीमध्ये साखर नसते. यामध्ये उपलब्ध असलेल्या स्टार्जमुळे माल्टोज आणि फ्रुकटोझ हे घटक बाहेर पडतात ही एकप्रकारे साखर असते. त्यामुळे जरी ब्रेडच्या साहित्यामध्ये साखर नसली तरी ब्रेडच्या कोणत्याही प्रकारात बेकिंगनंतर साखर ही येतेच 

आता या दोन्ही ब्रेडमधील फरक जाणून घेतल्यानंतर तुम्ही कोणत्याही ब्रेडची निवड तुमच्या आहारात करु शकता.

ADVERTISEMENT

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

09 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT