त्वचेची निगा राखण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात. स्किन केअर साठी अगदी पुर्वीपासून नारळाचे तेल आणि कोरफडाचा गर वापरला जातो. कोरफडामुळे सनबर्नमुळे होणारा दाह कमी होतो, त्वचेला थंडावा मिळतो. शिवाय त्वचा हायड्रेट राहण्यासाठी आणि सनबर्न कमी करण्यासाठी कोरफड अतिशय उत्तम ठरतं. खरंतर कोरफड असो वा नारळाचे तेल हे दोन्ही प्रॉडक्ट त्वचेसाठी उत्तमच आहेत. मात्र जेव्हा प्रश्न त्वचेवरील सनबर्नचा असतो तेव्हा कोरफडाच्या गरापेक्षा नारळाच्या तेलाचा फायदा जास्त असू शकतो. कारण नारळाच्या तेलामुळे तुमच्या त्वचेवरील सनबर्न कमी होतो आणि त्वचा मऊ, तजेलदार होते. यासाठी जाणून घ्या नारळाच्या तेलाचा सनबर्न कमी करण्यासाठी कसा वापर करावा.
सनबर्नवर नारळाचे तेल लावावे की कोरफडाचा गर –
सनबर्नमुळे त्वचेवर होणारी जळजळ आणि दाह नारळाचे तेल आणि कोरफड दोघांमुळेही बरा होतो. नारळाच्या तेलातील फॅटी अॅसिडमुळे त्वचा हायड्रेट राहते आणि पटकन बरी होते. खरंतर कोणत्या उपायाचा त्वचेवर काय परिणाम होणार हे तुमची त्वचा किती भाजली आहे यावर अवलंबून आहे. कारण सनबर्न कमी प्रमाणात असेल तर त्यामुळे तुमच्या त्वचेचा फक्त वरचा थर भाजला जातो. अशावेळी नारळाच्या तेलाने तुम्ही तुमचे सनबर्नचे डाग कमी करू शकता. मात्र जर तुम्हाला खूप सनबर्न झाले तर तर यासाठी तुम्ही त्वचा रोगतज्ञ्जाचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कारण अशा गंभीर स्वरूपातील सनबर्न केवळ नारळाच्या तेलाने बरे होऊ शकत नाही. नारळाच्या तेलामध्ये त्वचेच्या वरच्या थरावरच उपचार करता येतात. शिवाय कोरफडाप्रमाणे नारळाचे तेल थंडावा देणारे नसते. याचाच अर्थ असा की तुमची भाजलेली त्वचा थंड झाल्यावरच तुम्ही त्यावर नारळाचे तेल लावू शकता. भाजलेली त्वचा थोडी नॉर्मल झाल्यावर त्यावर नारळाचे तेल लावल्यास त्यामुळे तुमच्या त्वचेला मॉईस्चर मिळते आणि त्वचा लवकर बरी होण्यास मदत होते. त्चचेवरील डेड स्किन जाऊन नवीन त्वचापेशी निर्माण होण्यासाठी त्वचेवर नारळाचे तेल लावणे फायदेशीर ठरते.
मग कोरफडाचा गर सनबर्नसाठी कधी वापरावा –
जर सुर्यप्रकाशाने तुमची त्वचा पोळून ती लालसर झाली असेल तर त्वचेला थंडावा देण्यासाठी तुम्ही कोरफडाच्या गराचा वापर करू शकता. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेचा दाह त्वरीत कमी होऊ शकतो. कोरफडामध्ये त्वचेला बरे करणारे, थंडावा देणारे, दाह कमी करणारे घटक असतात. शिवाय त्यात त्वचेसाठी उपयुक्त व्हिटॅमिन ए आणि ईपण असते. म्हणूनच तुम्ही सर्वात आधी सनबर्न बरे करण्यासाठी कोरफड वापरायला हवे आणि मग नारळाचे तेल. चांगल्या परिणामासाठी तुम्ही नारळाच्या तेलात कोरफडाचा गर मिसळूनही ते लावू शकता. सनबर्न कमी कधी होणार हे निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे तुमच्या त्वचेवर कितीप्रमाणात सनबर्न झाले आहे यावर काय उपचार करायचा हे ठरवा. सनबर्न गंभीर स्वरूपातील असेल तर त्वचा रोग तज्ञ्जांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. त्याचप्रमाणे सनबर्न टाळण्यासाठी नियमित चांगल्या सनस्क्रिन लोशनचा वापर करा. दुपारी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत थेट सुर्यप्रकाशात जाणे टाळा. जर सनबर्न झाले तर सतत जखमेला हात लावू नका. अशा काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा सनबर्नचा त्रास कमी करू शकता.
सनबर्न पासुन सुटका मिळाल्यावर त्वचेची नियमित काळजी घेण्यासाठी मायग्लॅमचे स्किन केअर प्रॉडक्ट अवश्य ट्राय करा.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
चेहरा देत असेल असे संकेत तर आताच थांबवा स्क्रबिंग
ब्रश की हाताची बोटे, चेहऱ्यावर फेसपॅक लावण्यासाठी काय आहे उत्तम