ADVERTISEMENT
home / आरोग्य
स्तनदा मातांनी कोविड लस घेणे सुरक्षित आहे का, तज्ज्ञांचे मत

स्तनदा मातांनी कोविड लस घेणे सुरक्षित आहे का, तज्ज्ञांचे मत

कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता 16 जानेवारी 2021 पासून देशभरात लसीकरण (vaccination for covid 19) मोहिम सुरु करण्यात आली.  या लसीकरण मोहिमेत लहान मुले आणि गर्भवती महिलांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. परंतु आता कोरोना संसर्गाचे (Coronavirus) वाढते प्रमाण पाहता आता स्तनपान करणा-या महिलांना परवानगी देण्यात आली आहे. आणि अभ्यासाअंती हे स्पष्ट झाले आहे की याचा कोणत्याही प्रकारे नवजात मुलांवर परिणाम होत नाही.  लसीकरण सुरू झाल्यानंतर लवकरच सोशल मीडियावर गर्भवती महिला आणि स्तनपान देणा-या मातांच्या लसीकरणाबद्दल काही चुकीच्या अफवा पसरविण्यात आल्या. कोविड 19 (Covid 19) लस घेतलेल्या नवीन मातांबद्दल अनेक दिशाभूल करणारे दावेदेखील करण्यात आले. लसीकरणानंतर लगेचच नवजात बाळाला स्तनपान देऊ नये अशी देखील अफवा पसरविण्यात आली. परंतु तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार आता हा गैरसमज दूर झाला असून लसीकरणानंतर स्तनपान देण्यास काहीच हरकत नाही असे स्पष्ट झाले आहे. याविषयी आम्ही डॉ. सुरभी सिद्धार्थ, प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल, खारघर यांच्याकडून जाणून घेतले. 

तान्ह्या बाळाच्या पोषणासाठी कोविड काळातही करावे स्तनपात, फायदे

लसीकरणानंतर थांबवू नका स्तनपान

लसीकरणानंतर थांबवू नका स्तनपान

Freepik

ADVERTISEMENT

लसीकरण केल्यानंतरही तुम्ही बाळाला स्तनपान देऊ शकता. लसीकरणानंतरही स्तनपान (breast feeding) मुळीच थांबवू नये असा सल्ला देण्यात आला आहे. उलट आईच्या शरीरात असलेल्या अँटीबॉडीज आईच्या दुधातून बाळाला मिळतील आणि त्यामुळे बाळाला थोडं संरक्षण मिळेल. पण लसीमुळे कोणतीही हानी पोहोचणार नाही. लस खूपच सुरक्षित आहे. त्यामुळे बाळांना दूध पाजणाऱ्या स्त्रिया सध्या उपलब्ध असलेल्या सर्व लसी निर्धास्तपणे घेऊ शकतात.गरोदरपणात आई आणि गर्भ, जन्माला येणारं मूल दोघांच्या आरोग्याची आपल्याला काळजी असते. आपण त्यांना विशेष जपतो. म्हणून गरोदरपणात कोणतंही औषध किंवा लस घेण्यापूर्वी त्याचा काही विपरीत परिणाम होणार नाही ना किंवा पूर्ण सुरक्षित आहे ना याची आपण खात्री करून घेतो. कोविडच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की गरोदर महिलांना तीव्र कोविड होण्याचा धोका जास्त असतो आणि मुदतपूर्व प्रसूती होण्याचा धोका असतो. सध्या देशभरात कोविड संसर्गाचं प्रमाण जास्त आहे अशा या काळात तिचा इतरांशी जास्त संपर्क येत असेल किंवा ती आरोग्य कर्मचारी किंवा तिला लागण होण्याची शक्यता जास्त आहे असं काम करत असेल तर त्या स्त्रीला लागण होण्याचा धोका खूपजास्त आहे लस घेतल्यामुळे हा धोका नक्की कमी होईल.

आईच्या दुधामुळे नवजात बालकांना मिळते परिपूर्ण सुदृढ सुरुवात

त्यामुळे गर्भवती महिलांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन लसीकरणासंबंधी योग्य तो निर्णय घेण्यास हरकत नाही.सध्या उपलब्ध असलेल्या लसीमध्ये आर एन ए म्हणजे निष्क्रिय विषाणू किंवा त्यातल्या प्रोटीनचा वापर केला आहे. यापैकी कशातही जिवंत विषाणू नसल्याने त्याची शरीरात पैदास होऊ शकत नाही त्यामुळे कोणतीही समस्या निर्माण होण्याची शक्यता नाही.

टीप – ही माहिती आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांशी बोलून दिली आहे. मात्र तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योग्य ते पाऊल उचलावे. तुमच्या गर्भारपणात तुम्हाला आलेले अनुभव आणि तुम्हाला गरोदरपणात जाणवलेल्या काही गोष्टींनुसारच तुम्ही हे पाऊल उचलावे. तुमच्या शरीराबाबतीत तुमच्या डॉक्टरांना अधिक माहिती असल्याने त्याप्रमाणेच तुम्ही लस घ्यावी. 

ADVERTISEMENT

आईला असेल ताप आणि सर्दी, तर बाळाला स्तनपान करावे का

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

29 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT