ADVERTISEMENT
home / xSEO
Javal Kadhane Vidhi Marathi

बाळाचा जावळ विधी संपूर्ण माहिती | Javal Kadhane Vidhi Marathi

हिंदू संस्कृतीमध्ये बाळाचे जावळ काढणे (javal vidhi marathi)हा एक महत्त्वाचा विधी केला जातो. ज्यामध्ये बाळाच्या जन्माच्या वेळी आलेले डोक्यावरील सर्व पहिले केस काढून टाकले जातात. हिंदू संस्कृतीत हा विधी करणे बंधनकारक असून त्यामागे अनेक शास्त्रीय आणि धार्मिक कारणे आहेत. बाळाची चाहूल लागताच ते बाळ झाल्यावर असे अनेक विधी असतात. साधारणपणे बाळ एक वर्षाचे झाल्यावर जावळ विधी घरात केला जातो. त्यासाठी तज्ञ न्हाव्याला जावळ विधीसाठी आग्रहाचे आमंत्रण दिले जाते. बाळाला आईच्या अथवा मामाच्या मांडीवर बसवून त्याचे विधीपूर्वक जावळ काढले जाते. यासाठीच जाणून घेऊ या बाळाचा जावळ काढणे विधी म्हणजे नेमके काय (javal vidhi kasa karava) आणि कसा करावा जावळ विधी (javal vidhi marathi) यासोबतच वाचा बाळाच्या नामकरण विधीसाठी सुंदर मेसेज (Namkaran Invitation Message In Marathi).

सोळा संस्कारांपैकी एक जावळ विधी | Javal Kadhane Vidhi Marathi

Javal Kadhane Vidhi Marathi
Javal Kadhane Vidhi Marathi

जावळ विधी (javal vidhi marathi) हा बाळ वर्षाचे झाल्यावर केला जाणारा पवित्र विधी असून भारतीय संस्कृतीनुसार बाळावर जावळ संस्कार करणे अतिशय गरजेचे आहे. पूर्वीच्या काळी माणासाच्या आयुष्यात जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक टप्प्यावर केले जाणारे एखादे कार्य म्हणजे केला गेलेला एक पवित्र संस्कार असे. मानवी जीवनात असे एकूण सोळा संस्कार महत्त्वाचे मानले जातात. मानवी जीवनात या संस्कारांची सुरूवात गर्भसंस्कारापासून होते. जावळ संस्कारदेखील याच सोळा संस्कारांपैकी एक आहे. अन्नप्राशन संस्कारानंतर बाळावर केला हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. ज्यामध्ये बाळाचे डोक्यावरील संपूर्ण जावळ काढले जाते. प्राचीन शास्त्रानुसार पहिल्या, तिसऱ्या अथवा पाचव्या वर्षी मुंडन संस्कार अथवा जावळ संस्कार बाळावर करण्याची पद्धत आहे. या संस्काराचा हेतू बाळाची शुद्धी करणे अथवा नकारात्मक गोष्टींपासून बाळाचे संरक्षण करणे हा आहे. वाईट गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी बाळाची नजर काढणे ही जशी प्रथा आहे अगदी त्याचप्रमाणे बाळाचे जावळ काढल्यामुळे (javal kadhane vidhi) त्याचे जीवनातील वाईट गोष्टींपासून रक्षण होते अशी एक मान्यता आहे. एवढंच नाही तर जावळ विधीमागे धार्मिक कारणासोबत अनेक शास्त्रीय कारणे देखील आहेत. बाळाचे जावळ काढण्यामुळे बाळाच्या केसांची वाढ चांगली होते कारण बाळाचे जन्मापासून असलेले केस पातळ असतात पण जावळ काढल्यावर बाळाचे केस मजबूत आणि घनदाट होतात. बाळाचे केस काढण्यामुळे त्याच्या शरीराचे योग्य पोषण होते असंही मानलं जातं. कारण मानवी शरीराला हाडे आणि दातांच्या मजबूतीसाठी पुरेशा व्हिटॅमिन डीची गरज असते. बाळाच्या वाढीच्या काळात बाळाला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी पूर्वजांनी जावळ विधी सुरू केला असू शकतो. कारण केस काढण्यामुळे त्याच्या शरीरात सूर्यप्रकाशाद्वारे मिळणारे व्हिटमिन डी योग्य पुरेशा प्रमाणात शोषले जाते. बाळाच्या वाढीच्या काळात त्याला कोवळे ऊन उघड्या अंगावर देण्याची पूर्वी पद्धत होती. काही तज्ञ्जांच्या मते जावळ विधी केल्यामुळे बाळाच्या मेंदूची वाढ आणि विकास योग्य प्रकारे होतो. त्यामुळे बाळ हुशार आणि तल्लख बुद्धीचे होण्यासाठी देखील जावळ विधी पूर्वी केला जात असावा.

जाणून घ्या गर्भसंस्कार कसे करावे (Garbh Sanskar In Marathi)

जावळ विधीबाबत असलेले समज | Belief Behind Javal Vidhi Marathi

Javal Kadhane Vidhi Marathi
Javal Kadhane Vidhi Marathi

जावळ विधीबाबत प्रत्येक धर्मात आणि समाजात विविध समज आणि गैरसमज आहेत. त्यामुळे चालत आलेल्या पंरपरेनुसार जावळ विधी अनेक समाजामध्ये केला जातो. 

ADVERTISEMENT

हिंदू संस्कृतीनुसार मानवी देह हा 84 योनी फिरून आल्यावर मिळतो अशी मान्यता आहे. याचा अर्थ असा की मानवी जीवनावर जीवनचक्रातील या प्रत्येक योनीचा परिणाम होत असतो. या सर्व योनी फिरून आल्यावर जेव्हा  मानवी जीवन प्राप्त होते तेव्हा या सर्व योनीमधील संस्कारापासून मुक्त होण्यासाठी, भूतकाळापासून मुक्ती मिळण्यासाठी आणि शारीरिक-मानसिक शुद्धतेसाठी जावळ विधी केला जात असावा. मात्र यामागे प्रत्येक समाजात असलेले समज निरनिराळे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या बुद्धिमत्तेनुसार जावळ विधी करावा अथवा करू नये हा निर्णय घ्यावा. जरी तुम्हाला प्राचीन परंपरेनुसार आलेली ही विचार धारा मान्य नसेल तरी बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी बाळाचे केस काढण्यास काहीच हरकत नाही. 

बाळाचा जावळ विधी कसा करावा | Javal Vidhi Kasa Karava

Javal Kadhane Vidhi Marathi
Javal Kadhane Vidhi Marathi

वैदिक शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जावळ विधी अथवा जावळ संस्कारासाठी बाळाचे वय साधारणपणे एक, तीन पाच इतके असावे. पण आजकाल सर्वाच्या सोयीनुसार बाळ एक वर्षाचे झाले की कधीही त्याचा जावळ विधी (javal vidhi marathi) करता येतो. जावळ विधीसाठी बाळाचे वय एक वर्षापेक्षा कमी नसावे कारण असे असल्यास बाळाचे केस काढताना त्रास होण्याची शक्यता असते. कारण एक वर्षापर्यंतच्या बाळाच्या डोक्याच्या कवठीचा संपूर्ण विकास झालेला नसल्यामुळे बाळाची टाळू कोवळी असते. अशा काळात बाळाच्या डोक्याला कोणतीही दुखापत होता कामा नये.

​सुरक्षित जावळ विधीसाठी टिप्स | Tips and Care for Safety During Javal Vidhi

  • बाळाच्या जावळविधीसाठी एक शुभमुहूर्त निवडला जातो.  कारण जावळ मूहुर्तावर बाळाचे जावळ काढणे शुभ मानले जाते. पण जर तुम्हाला ते शक्य नसेल तर इतर कोणत्याही शुभ मुहूर्तावर जावळ विधी केला जाऊ शकतो.
  • वेदपंडीत यांनी केलेल्या मंत्रोच्चाराच्या जयघोषात बाळाचे जावळ काढले जाते. यासाठी घरात खास होम हवन, पूजापाठ केले जाते. 
  • बाळाच्या आईच्या अथवा मामाच्या मांडीवर घेऊन बाळाचे जावळ काढण्याची पद्धत आहे. यामागे बाळावर प्रेम करणारी माणसे जवळ असतील तर बाळ अस्वस्थ होणार नाही असा हेतू असावा.
  • काही जण जावळ विधी घरी करतात तर काही जण एखाद्या पवित्र तिर्थक्षेत्री जावून बाळाचे जावळ काढतात.
  • बाळाचे केस काळजीपूर्वक काढण्यासाठी तज्ञ्ज न्हाव्याला मानापानासह आमंत्रित केले जाते.
  • बाळाचे जावळ काढल्यानंतर गंगाजल अथवा पवित्र पाण्याने बाळाचे डोके धुतले जाते आणि बाळाच्या डोक्याला चंदन आणि हळदीचा लेप लावला जातो. बाळाला जावळ काढताना एखादी जखम झाली असेल तर ती बरी होण्यासाठी आणि बाळाचे उष्णतेपासून संरक्षण व्हावे यासाठी असे केले जात असावे.
Javal Kadhane Vidhi Marathi
Javal Kadhane Vidhi Marathi

बाळाचा जावळ विधी (javal kadhane vidhi) हा साधारणपणे बाळ एक वर्षाचे झाल्यावर केला जातो. सहाजिकच बाळ नाजूक आणि लहान असल्यामुळे बाळाचे केस काढताना बाळाच्या सुरक्षेसाठी काही गोष्टींची योग्य काळजी घ्यायला हवी.

  • बाळाला जावळ विधी आधी दूध अथवा जेवण भरवून घ्यावे आणि त्याची झोप पूर्ण झाली असेल याची काळजी घ्यावी. कारण जर जावळ विधी करताना त्याला भूक लागली अथवा झोप आली तर ते कंटाळू शकते आणि त्यामुळे त्याला दुखापत होऊ शकते.
  • बाळाच्या जावळ विधीसाठी लहान मुलांचे केस काढण्यात तरबेज असलेला एखादा तज्ञ्ज न्हावीच बोलवावा.
  • बाळाचे जावळ काढण्यासाठी वापरण्यात येणारी साधनसामुग्री स्वच्छ आणि निर्जंतूक असावी. ज्यामुळे बाळाला केस काढल्यानंतर इनफेक्शन होणार नाही.
  • जावळ विधीनंतर बाळाला कोमट पाण्याने अंघोळ घालावी. कारण केस काढल्यामुळे त्याच्या अंगावर लहान केस चिकटलेले असू शकतात. ज्यामुळे त्याला पुरळ अथवा इनफेक्शन होण्याची शक्यता असते.

बाळाचे जावळ काढणे हा एक पारंपारिक, धार्मिक विधी असून त्याचे अनेक वैज्ञानिक फायदे आहेत. असं असलं तरी जावळ विधी करावा की करू नये याबाबत प्रत्येक समाजात विविध मतांतरे आहेत. काही समाजामध्ये फक्त मुलांचा जावळ विधी केला जातो मुलींचा केला जात नाही. काही जण जावळ संस्कार अगदी रितसर, पारंपरिक पद्धतीने करतात तर काही जण आधुनिक काळात सोयीचे पडेल अशा पद्धतीने जावळ विधी करतात. त्यामुळे बाळाचे जावळ करावे की करू नये हा सर्वस्वी त्याच्या आईवडिलांचा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त बाळाचे जावळ काढताना त्याला कोणताही त्रास होणार नाही आणि सुरक्षित पद्धतीने जावळ काढले जाईल याची प्रत्येक आईवडिलांनी काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला आम्ही दिलेली जावळ विधीची माहिती कशी वाटली हे आम्हाला कंमेट मधून जरूर कळवा.

ADVERTISEMENT

हेही वाचा –

भातुकलीचा खेळ, बालपणीच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न (Bhatukali Khel In Marathi)

19 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT