home / आपलं जग
Pregnancy Symptoms In Marathi

Pregnancy Symptoms In Marathi | गरोदरपणाची लक्षणे मराठी

कोणत्याही महिलेसाठी आई होणं हा जगातील सर्व सुखांपेक्षा आनंद देणार असतं. पण ही खूषखबर कळणार कशी की तुम्ही प्रेग्नंट आहात की नाही? साधारणतः पाळी वेळेवर न येणं हा तुमची गर्भधारणा झाल्याचा संकेत मानला जातो आणि प्रेग्नंट असल्याचाही. पण आजच्या बदलत्या जीवनशैलीत खाण्याच्या सवयीतील बदलांमुळे, तणाव आणि धावपळीमुळे पाळी वेळेवर न येणं, पाळी काही काळासाठी बंद होणं किंवा पाळी अनियमित येणं ह्या साधारण गोष्टी झाल्या आहेत. त्यामुळे अनेक महिलांमध्ये हया बाबतीत गैरसमज निर्माण होतो आणि त्यांना आपण प्रेग्नंट आहोत असं वाटू शकतं. पण जर तुम्हाला तुमच्या शरीरात काही बदल जाणवत असतील तर तुम्ही शरीरसंबंधानंतर २१ दिवसांच्या आत ही प्रेग्नंसी टेस्ट करू शकता. काही कारणामुळे २१ दिवसांच्या आत टेस्ट करता नाही आली तर अशा स्थितीत गर्भावस्थेची चिन्ह जाणून घेणं महत्वाचं आहे. ह्यासाठी तुम्हाला शरीरात होणाऱ्या छोट्या छोट्या हार्मोनल बदलांबाबत जाणून घ्यायला हवं. आम्ही तुम्हाला गरोदर आहे हे किती दिवसात कळत व सर्व गर्भधारणा लक्षणे (Pregnancy Symptoms In Marathi) सांगणार आहे. ही लक्षण आढळल्यास ताबडतोब प्रेग्नंसी टेस्ट करून घ्यावी आणि टेस्ट केल्यावर तुम्हाला कळेलच की तुम्ही प्रेग्नंट आहात.

Very Early Signs Of Pregnancy 1 Week In Marathi | गर्भधारणा झाली कसे ओळखावे

गरोदर आहे हे किती दिवसात कळतं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर प्रेग्नंसीची लक्षणं जाणवण्याची काही ठराविक वेळ नसते. प्रत्येकाची शरीर संरचना आणि यंत्रणा वेगळी असते. हे प्रत्येक महिलेच्या शरीरावर अवलंबून आहे. तुम्हाला प्रेग्नंसीची लक्षण गर्भधारणेच्या एक दिवसानंतरही दिसू शकतात किंंवा 1-2 महिन्यानंतरही दिसू शकतात. जर तुम्हाला दोन महिन्यापर्यंत काही लक्षण दिसली नाही तर काळजीचं काही कारण नाही. ह्या दरम्यान भ्रूण विकसित होण्यासाठी अजून एक महिना आवश्यक असतो आणि असंही होऊ शकतं की त्यानंतर लक्षण दिसू शकतात. 

डॉक्टरांचं काय म्हणणं 

शरीरसंबंध झाल्यानंतरच्या काळात शुक्रजंतू हे गर्भाशयातून बीजनलिकेत शिरून गर्भनलिकेत स्त्रीबीजाच्या चारही बाजूंनी चिकटतात आणि महिलेच्या शरीरांमध्ये ह्यूमन कोरियोनिक गॉनाडोट्रोपिन (एचसीजी) हार्मोन बनण्यास सुरूवात होते. असं मानलं जातं की ही प्रक्रिया 10-15 दिवसानंतर सुरू होते. HCG हार्मोन्स बनण्याची प्रक्रिया प्रेग्नंसी दरम्यान सुरू होते. पण ही प्रक्रिया प्रेग्नंसीच्या 11 व्या आठवड्यात थांबू ही शकते. हीच वेळ असते जेव्हा महिलांना प्रेग्नंसीची लक्षण (Pregnancy Lakshan In Marathi) स्पष्टपणे दिसू लागतात. चला जाणून घेऊया गर्भधारणा झाली कसे ओळखावे –

वाचा – जाणून घ्या गरोदरपणात बाळाची वाढ कशी होते

Pregnancy Symptoms In Marathi | गर्भधारणा लक्षणे

तुम्ही जर गर्भवती असाल तर काही लक्षणं लगेच दिसून येतात. जाणून घ्या गरोदर असल्याची लक्षणे (Symptoms Of Pregnancy In Marathi) खालीलप्रमाणे.  

पोट फुगणं किंवा पोटात दुखणं

pregnancy symptoms in marathi
Pregnancy Symptoms In Marathi

पाळी न येता ही पोटात वारंवार कळ उठणे. ब्लॉटींग म्हणजेच पोट फुगणं अशा समस्या जाणवणं. पोट फुगणं हे गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदलामुळे ही होऊ शकतं. खरंतर, गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात शरीरामध्ये प्रोजेस्टेरॉनची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते.ज्यामुळे शरीरातील मांसपेशी शिथील होतात. ह्यामुळे पचनक्रिया हळूवार होते आणि परिणामी पोट फुगते, गॅस, ढेकरा येणं आणि बैचेन वाटणं ह्या समस्यांना सामोरं जावं लागतं. खासकरून जेवण झाल्यानंतर हे जास्त होतं.

मूड स्विंग आणि चिडेचिडेपणा

गर्भधारणेदरम्यान अचानक तुमचे मूड्स म्हणजेच मनोवस्थेत बदल होण्यास सुरूवात होते. अनेक प्रकारे भावनिक चढउतार होऊ लागतात. कधी एकदम राग येतो तर कधी एकदम हसू. कधी मन उदास होत तर कधी एवढं आनंदी वाटू लागतं की कळतच नाही. खरंतर हे गर्भावस्थेदरम्यान रक्तातील अॅस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची शरीरातील मात्रा वाढल्याने हार्मोनचा स्तर वेगाने वाढतो. हा वाढलेला हार्मोनचा स्तर तुमच्या मनोवस्थेवर परिणाम करू शकतो. त्यामुळे ह्या दरम्यान चिंता आणि चिडचिडेपणा होणं साहजिक आहे.

उलटी होणं आणि मळमळणं

Symptoms Of Pregnancy In Marathi
Symptoms Of Pregnancy In Marathi

जर तुम्हाला गेल्या काही दिवसांमध्ये उलटी होणं किंवा मळमळणं यासारख्या समस्या जाणवल्यास शक्यता आहे की, तुम्ही प्रेग्नंट आहात. कारण सकाळी उठताच मळमळणं किंवा उलटी होणं ही प्रेग्नंट असल्याची प्रमुख लक्षण आहेत. तसं पाहिल्यास हे प्रत्येकाच्या शरीरावर अवलंबून आहे. बऱ्याचश्या महिलांना प्रेग्नंसीदरम्यान उलट्या होत नाहीत आणि तर काही महिलांना गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत उलट्या होणं आणि मळमळणं असा त्रास होतो.

पाळी न येणं

जर तुमची पाळी नियमित येत असेल आणि जर त्या महिन्यात वेळेवर आली नाहीतर शक्यता आहे की तुम्ही प्रेग्नंट आहात. पण जर तुमची पाळी अनियमित असेल तर अशावेळी प्रेग्नंट असण्याची शक्यता कमी असते. प्रत्येक महिलेला माहीत असते की, तिची पाळी महिन्याच्या किती तारखेला येईल. कारण साधारणतः पाळीचे चक्र हे 28 दिवसांचे असते. 28 ते 30 दिवसानंतर परत पाळी येते. पण 28 ते 30 दिवस होऊन गेल्यावरही पाळी न आल्यास काळजी वाटणं स्वाभाविक आहे.

गरोदरपणात छातीत दुखणे कारणे

वारंवार लघवीला जावं लागणं

प्रेग्नसीमध्ये वारंवार लघवीला जावंस वाटणं हे एक प्रमुख लक्षण आहे. हा त्रास प्रेग्नसीच्या सहाव्या आठवड्यानंतर अजूनच वाढतो. खरंतर गर्भावस्थेच्या दरम्यान शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे किडनीमधील रक्ताभिसरण वेगाने होऊ लागते आणि मूत्राशयात लघवी लवकर भरली जाते. ज्यामुळे वारंवार लघवी लागण्याची समस्या उद्भवते. जसजसा बाळाचा विकास होऊ लागतो. हा त्रास अजूनच वाढतो.

थकवा आणि अशक्तपणा जाणवणं

थकवा जाणवणं ही साधारण गोष्ट आहे. पण जर जास्त प्रमाणात थकवा आणि अशक्तपणा जाणवत असल्यास ही प्रेग्नंसीची सुरूवातीची लक्षण (pregnancy lakshan in marathi) आहेत. कारण गर्भावस्थेच्या सुरूवातीच्या काळात आपले शरीर बाळाला आश्रय देण्यासाठी स्वःताला तयार करते. ह्या दरम्यान थकवा जाणवणं स्वाभाविक आहे.

वाचा – गरोदपणाच्या तिसऱ्या महिन्यात काय घ्यावी काळजी

शरीराचं तापमान वाढणं

गर्भवती असल्यास शरीराचे तापमान बऱ्याचदा सामान्य तापमानापेक्षा अधिक असते. जसे सामान्य व्यक्तीच्या शरीराचे तापमान साधारण 98.3 फॅरेनहाइट असते. गर्भावस्थेदरम्यान महिलांच्या शरीराचे तापमान थोडे वाढते. हे साधारण 0.5 फॅरेनहाइट पासून 1 फॅरेनहाइटपर्यंत वाढू शकते. जर गेल्या काही दिवसात तुमच्या शरीराच्या तापमानात बदल जाणवत असेल तर एकदा प्रेग्नंसीची खात्री करून घ्या.

बध्दकोष्ठता आणि छातीत जळजळणं

गर्भवस्थेदरम्यान महिलांच्या शरीरांमध्ये होणाऱ्या बदलांचा परिणाम तिच्या पचनक्रियेवरही होतो. ज्यामुळे पोटात गॅस होण्याचा त्रास वाढतो. पोटात गॅस होण्याची समस्या गर्भधारणेच्या पहिल्या आठवड्यापासून ते नवव्या आठवड्यांपर्यंत असू शकते. पचनक्रियेत होणाऱ्या बदलांमुळे छातीत जळजळ होते. तुम्हाला अचानकसुध्दा छातीत जळजळ होत असल्याचं जाणवतं. बध्दकोष्ठता आणि छातीत जळजळणं ही प्रेग्नंसची सुरूवातीची लक्षण आहेत. तुम्हालाही हा त्रास होत असल्यास वाचा हा लेख.

स्तनांमध्ये दुखणे आणि जडपणा जाणवणं

स्तनांमध्ये जडपणा, सूज किंवा दुखत असल्यास ही प्रेग्नंट असल्याची लक्षण आहेत. जसं पाळीदरम्यान स्तन संवेदनशील झाल्याचं जाणवतं. तसंच प्रेग्नसीदरम्यान ही होतं. पण सहाव्या आठवड्यापर्यंत स्तन अजूनच संवेदनशील होतात. जर तुमच्या स्तनांमधील निळ्या रक्तनलिका साफ दिसत असतील आणि स्तनांची टोकं गडद काळ्या रंगाची दिसत असतील तर ही प्रेग्नंसीची लक्षण असू शकतात. कारण गर्भावस्थेदरम्यान हार्मोन्समुळे स्तनांमधील रक्तप्रवाह वाढतो.

सतत डोकं दुखणं

जेव्हा डोक्यातील शिरा जास्त रक्तांमुळे प्रसरण पावतात. तेव्हा डोकेदुखी किंवा मायग्रेनची समस्या जाणवते. हे गर्भावस्थेच्या सुरूवातीच्या लक्षणांमधील प्रमुख कारण आहे. हे दुखणं कधी कमी किंवा कधी जास्त ही असू शकतं. पण हळूहळू हे आपोआपच बरं होतं.

तीव्र इच्छा होणं किंवा डोहाळे लागणं

तीव्र इच्छा होणं किंवा क्रेविंग होणं म्हणजे एखादी खास गोष्ट खाण्याची तलफ येणं ही गर्भवती असण्याच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. गर्भवती महिलांमध्ये एखाद्या विशिष्ट पदार्थाबद्दलचे आकर्षण वाढते आणि प्रत्येक वेळी ती खाण्याची इच्छा होते. असं पाहण्यात आलंय की, ह्या काळात महिला साधारण तेच पदार्थ सेवन करणे जास्त पसंत करतात.

श्वेत पदर किंवा व्हाइट डिस्चार्ज

महिलांमध्ये अत्याधिक व्हाइट डिस्चार्ज होणं ही एक साधारण बाब आहे. पण प्रेग्नंसीदरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे हा डिस्चार्ज खूप जास्त होऊ शकतो. तुमची इच्छा असो वा नसो पण ह्याचा एक फायदा ही आहे. हो, ह्या डिस्चार्जमुळे तुमचा कुठल्याही प्रकारच्या मूत्रविकांरापासून बचाव होतो. हे प्रेग्नंसीदरम्यान खूप वाढते.

वास घेण्याची शक्ती वाढणे

जर तुम्हाला जाणवतं की,तुमचे नाक जरा जास्तच वेगाने काम करत आहे. म्हणजे अगदी लांबवरचा वास तुम्हाला आरामात घेता येतोय. तर हे प्रकरण जरा वेगळं आहे. खरंच, गर्भावस्थेच्या दरम्यान महिलांमधील वास घेण्याची शक्ती वेगाने विकसित होते. ह्या काळात हार्मोनल बदलांमुळे वास घेण्याची शक्ती वाढते.

तर ही होती गर्भधारणा लक्षणं. आता पुढे जाणून घेऊया प्रेग्नंसी कशी कराल कन्फर्म.  

वाचा – Pregnancy First Month Care Tips

How To Confirm Pregnancy | गर्भधारणा झाली कसे ओळखावे

Pregnancy Symptoms Marathi
Pregnancy Symptoms Marathi

जर एखाद्या महिलेची पाळी चुकली असेल आणि वर दिलेली लक्षण जाणवत असतील, तर एकदा ह्या गोष्टीवर प्रेग्नंसी टेस्ट करून शिक्कामोर्तब करून घ्या. पहिल्यांदा तुम्ही होम प्रेग्नंसी टेस्ट किटचा वापर करू शकता. ज्यात घरच्या घरी तुम्ही युरीन सॅम्पलच्या सहाय्याने जाणू शकता की तुम्ही प्रेग्नंट आहात की नाही? जर रिझल्ट पॉजिटीव्ह आला तर एखाद्या स्त्री रोग स्पेशलिस्टकडे जाऊन तपासून घ्या. अशावेळी डॉक्टर महिलांचे पोट आणि योनी तपासतात. तसंच गर्भाशय तपासून तुमच्याकडे गोड बातमी आहे का ते सांगतात. कारण गर्भधारणेनंतर गर्भाशयाचा बाहेरील भाग मुलायम होतो. ह्या सर्व बाबी बघून डॉक्टर तुम्हाला प्रेग्नंसीबद्दल सांगतात. गरोदरपणाचा काळ हा तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी खूप महत्त्वाचा असतो. या काळात बाळाची काळजी घेण्यासाठी तुम्ही नियमित गर्भसंस्कार करू शकता.

Pregnancy Week By Week | गर्भावस्थेतील आठवडे

गर्भावस्थेत प्रत्येक आठवड्यानुसार स्त्रीच्या शरीरात बदल होतात आणि त्याप्रमाणे गर्भाचीही वाढ होते. जाणून घ्या प्रेग्नन्सीतील प्रत्येक आठवड्याबाबत आणि गरोदर पहिला महिना लक्षणे.

गर्भधारणा पहिला आठवडा

पहिल्या आठवड्यात (1st Week of Pregnancy) स्त्रीच्या शरीरात खूप सारे बदल होत असतात. ह्यामध्ये भ्रूण विकसित होण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होते. ज्यामुळे मळमळणं, उलटी होणं किंवा थकवा येणं अशी लक्षणं दिसून येतात. ह्या काळात तोंडाची चव बदलते. कोणत्याही खाल्लेल्या पदार्थाची चव कळत नाही, फक्त आंबट वस्तूंची चव कळते.

टीप्स – पहिल्या आठवड्यात जास्त काही कळत नाही पण तरीही होणाऱ्या आईला स्वतःच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करायला हवा. होणाऱ्या आईने आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवावी. म्हणजे वेळेच्या वेळी सर्व गोष्टी करणे. शिळं किंवा पॅकेज्ड फूड खाऊ नये.

गर्भावस्थेचा दुसरा आठवडा

प्रेग्नंसीच्या दुसऱ्या आठवड्यात (2nd Week of Pregnancy) ही गर्भधारणेच्या पहिल्या आठवड्यात झालेले बदल कायम राहतात. ह्या काळात गर्भवती महिलेला थकवा, ताप, हातापायांना सूज आणि डोकेदुखीची तक्रार राहते. स्तनांवर हलकीशी सूज येऊ लागते आणि त्यांचा आकारही बदलतो. स्तन मऊ आणि संवेदनशील होतात.

टीप्स – प्रेग्नंसी नक्की करण्यासाठी स्त्री स्पेशलिस्ट मदत घेऊ शकता किंवा मेडीकल स्टोरमधून होम प्रेग्नंसी कीट खरेदी करू शकता आणि प्रेग्नंसी कन्फर्म करू शकता.

गर्भावस्थेचा तिसरा आठवडा

प्रेग्नंसीच्या तिसऱ्या आठवड्यात (3rd Week of Pregnancy) स्त्री दुसऱ्या आठवड्याच्या तुलनेत शरीरामध्ये जास्त बदल दिसू लागतात. आंतरिक बदलांबरोबरच बाह्य बदल ही होऊ लागतात. हे बदल आणि लक्षण बरेचदा गर्भवती महिलांना ओळखता येत नाहीत. तुमच्या माहितीसाठी दुसऱ्या आठवड्यात अंडाशयात तयार झालेले अंडे तिसऱ्या आठवड्यात पूर्णतः बाहेर येते. तिसऱ्या आठवड्यात स्त्रीच्या गर्भातील अंडे अंडाशयातून निघून ते फेलोपिअन ट्यूबमधून गर्भाशयात जाते आणि  शुक्राणु आणि अंडाणुच्या मिलनातून एक भ्रूण बनतं. गर्भधारणेच्या ह्या आठवड्यात सगळ्यात जास्त मॉर्निग सिकनेस जाणवतो. मॉर्निंग सिकनेसमुळे डोकं गरगरणं आणि उलटी यासारखा त्रास होतो. ह्या गर्भावस्थेदरम्यान शरीरात होणार बदल हे प्रमुख भाग आहेत.

टीप्स – या दरम्यान सतत आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात रहा आणि कुठलीही गोष्ट त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय करू नये.

वाचा – आई व्हायचं असेल तर तुम्हाला माहीत हवा Ovulation चा योग्य काळ

गर्भधारणा चौथा आठवडा

गर्भधारणेच्या चौथ्या आठवड्यात (4th Week of Pregnancy) मळमळल्यासारखं वाटू लागतं. हा गर्भावस्थेचा तो काळ आहे, जेव्हा गर्भाशयातील भ्रूणाच्या विकासाच्या प्रक्रियेला सुरूवात झालेली असते. ह्या काळात महिला पूर्णपणे गर्भवती झालेली असते. थोडंजरी काम केलं तरी थकल्यासारखं वाटतं. चिडचिडेपणा वाढतो. चौथ्या आठवड्यात भ्रूणाचा आकार हा कबूतराच्या अंड्यासारखा असतो. चौथ्या आठवड्यात विकसित झालेले अंडे गर्भाशयात पोचते आणि 72 तासानंतर हे गर्भाशयाच्या अस्तरामध्ये त्याची जागा घेऊ लागतं. गर्भाशयाच्या अस्तरामधील रक्तकोशिकांनी अंड्याला स्पर्श केल्यानंतर अंड्याचा विकास होऊ लागतो. प्रेग्नंसीच्या दुसऱ्या आठवड्यात उलटी येण्याची लक्षण वाढतात. जी 12 ते 18 आठवड्यापर्यंत दिसतात. काही महिलांना हा त्रास प्रसूतीपर्यंत जाणवतो. प्रेग्नसीदरम्यान उलटी होणं स्वाभाविक आहे. पण हा त्रास जास्त होणं हानिकारक असू शकतं. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गर्भावस्थेचा पाचवा आठवडा

गर्भावस्थेच्या पाचव्या आठवड्यात (5th Week of Pregnancy) शिशूच्या हृदयातील रक्तप्रवाहाची प्रक्रिया सुरू होते. ह्यासोबतचा त्याच्या अन्य अवयवांचा ही विकास होऊ लागतो. जो तुम्हाला जाणवतो. ह्या काळात आपल्या खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष द्या.

टीप्स – आता तुम्ही तुमच्या बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी योग्य तो आहार घेणं सुरू करावं आणि जर तुम्हाला धूम्रपान किेंवा दारू पिणं ह्या सवयी असतील तर त्या थांबवा.

वाचा – Symptoms Of 9th Month Pregnancy In Marathi

FAQ’s / गर्भावस्थेच्या लक्षणांबाबत विचारली जाणारे प्रश्न

symptoms of pregnancy in marathi
Symptoms Of Pregnancy In Marathi

प्रेग्नंसीबद्दल लोक खूप संभ्रमात असतात. हे योग्य आहे का? हे नॉर्मल आहे का? हे चुकीचं आहे का? याचा अर्थ काय? असे प्रश्न प्रत्येक महिला कधी ना कधी तरी सतावतात. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी सोशल वेबसाइट क्वोरा वर प्रेग्नंसीबाबत विचारलेले काही नेमके प्रश्न आणि त्यांची उत्तर देत आहोत.  

प्रश्न. प्रेग्नंसीच्या काळात जास्त तूप खाल्ल्यास नॉर्मल डिलीव्हरी सहज होते का?

उत्तर : प्रत्येक गर्भवती महिलेला घरातील वडिलधारी मंडळी जास्त तूप खाण्याचा सल्ला देतात. पण ह्यात काही तथ्य नाही. तूप हे चांगलं ल्यूब्रीकेंट मानलं जातं. जे पोट साफ ठेवण्यात मदत करतं. पण ह्याचा अर्थ असा नाही की, तूप जास्त खाल्ल्याने नॉर्मल डिलीव्हरी होईल.

प्रश्न. प्रेग्नंसीच्या दरम्यान सेक्स करणं सुरक्षित आहे का?

उत्तर : तसं तर प्रेग्नंसीच्या दरम्यान सेक्स करणं नुकसानकारक नाही. पण तरीही तुम्ही अॅलर्ट असलं पाहिजे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रेग्नंसीच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये सेक्स करू नये, कारण ह्यामुळे वेळेआधी डिलीव्हरी होऊ शकते किंवा बाळाला ही त्रास होऊ शकतो. असं म्हणतात की, ह्या काळात इंटरकोर्सशिवाय तुम्ही तुमच्या सहजतेनुसार संबंध ठेवू शकता.

प्रश्न. पाळीदरम्यान सेक्स केल्यास गर्भधारणा होत नाही?

उत्तर : बऱ्याच लोकांना असं वाटतं की, पाळीदरम्यान सेक्स केल्यास प्रेग्नंट राहणे अशक्य आहे. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा गैरसमज आहे. खरंतर स्पर्म योनीमध्ये ५ दिवस राहू शकतो आणि ह्या दरम्यान असुरक्षित सेक्स झाला आणि ऑव्ह्युलेशन लवकर झाले तर गर्भधारणा होऊ शकते.

प्रश्न. प्रेग्नंट होण्यासाठी रोज सेक्स करावा?

उत्तर : हा. एक मोठा गैरसमज आहे. जर कोणी मुलगी पाळीच्या 14 दिवसानंतर सेक्स करत असेल तर ती एकदा सेक्स केल्यावरही प्रेग्नंट राहू शकते.

You Might Like These:

गरोदरपणात सकाळीच उठल्यावर मळमळतंय…तर करा नैसर्गिकरित्या उपचार

गरोदरपणातही दिसा अधिक स्टायलिश (Pregnancy Outfit Ideas In Marathi)

प्रेगनेंसी के लक्षण

17 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this