कोरोनानंतर प्रत्येक निर्मात्याने आता त्यांच्या आगामी चित्रपटांसाठी कंबर कसली आहे. चित्रपटगृहाच प्रेक्षकांना परत यावं यासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवनवीन बदल होताना दिसत आहेत. लवकरच करण जौहरचा ‘रॉकी और रानी’ हा प्रेमपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे रणवीर सिंह आणि आलिया भट… एवढंच नाही या चित्रपटात जया बच्चन, शबाना आजमी आणि धर्मैंद यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे कारण रॉकी और रानीमध्ये पहिल्यांदाच दिग्गज अभिनेत्री जया बच्चन विनोदी भूमिका साकारणार आहे.
Year Ender: यावर्षी सर्वात जास्त प्रसिद्ध झाल्या या वेबसिरीज
जया बच्चन साकारणार हलवाईची भूमिका
‘रॉकी और रानी’मध्ये जया बच्चन रणवीर सिंहच्या आजीची भूमिका साकारणार असून या भूमिकेला विनोदी शैली देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात जया बच्चन यांची हलवाई म्हणजेच मिठाईवालीची भूमिका आहे. ही अशी एक महिला आहे जी सुरतमध्ये मिठाईचं दुकान चालवते आणि तिला सतत हसायला आवडतं. जया बच्चन यांचा हा सर्वात मजेशीर रोल असेल. जया बच्चन यांनी आजवर बऱ्याच गंभीर भूमिका केलेल्या आहेत त्यामुळे अशा नव्या आणि हटके भूमिकेत जया बच्चन यांना पाहणं नक्कीच उत्सुकता वाढवणारं असेल.
ही मराठमोळी अभिनेत्री नव्या भूमिकेसाठी तयार, लवकरच होणार आई
कधी होणार ‘रॉकी और रानी’ प्रदर्शित
दिल्लीमध्ये सध्या रॉकी और रानीचं शूटिंग सुरू आहे. शूटिंग दरम्यान जया बच्चन कॅमेऱ्यासमोर मौजमस्ती करताना दिसत आहे. जया बच्चन यांच्या या भूमिकेचा परिणाम शूटिंग सेटवर पडताना दिसत आहे. कारण त्यांनी आजवर अशा भूमिका कधीच केलेल्या नाहीत. त्यामुळे भूमिकेत परफेक्ट होण्यासाठी जया बच्चन सध्या ऑफ कॅमेरापण मस्करी करताना दिसत आहेत. त्याचं कारण सांगताना त्या शेअर करतात की कदाचित करणला जॉनी लिव्हरच्या डेट मिळाल्या नाहीत म्हणून त्याने या चित्रपटासाठी मला साइन केलं. रॉनी और रॉकी 10 फेब्रुवारी 2022 ला प्रदर्शित होणार आहे. रॉकी और रानीमध्ये करण जौहर स्टाईलची एकूण आठ दहा गाणी असणार आहेत.ज्याला संगीत दिलं आहे प्रीतम आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी… कथानक इशिता मौहत्रा, शशांक खैतान आणि सुमित रॉय यांनी लिहीलं आहे. स्वतः करण याचं दिग्दर्शन करत असून चित्रपटाची निर्मिती हीरू यश जौहर, करण जौहर आणि अपूर्व मेहता करत आहेत. त्यामुळे 2022 मध्ये संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र पाहण्यासाठी पुन्हा एकदा एक फॅमिली ड्रामा प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज होत आहे.