ADVERTISEMENT
home / मनोरंजन
prajakta hanamghar baby shower

ही मराठमोळी अभिनेत्री नव्या भूमिकेसाठी तयार, लवकरच होणार आई

गेल्या दोन वर्षात अनेक सेलिब्रिटींनी लग्न केली आहेत तर काहींनी आई – बाबा होण्याचा निर्णय घेतला आहे. आता यामध्ये अजून एका मराठमोळ्या अभिनेत्रीची भर पडली आहे. ‘विनोदाची राणी’ म्हणून घराघरात पोहचलेली प्राजक्ता हनमघर हिने आपण लवकरच आई होणार असल्याचे सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत जाहीर केले आहे. ‘फू बाई फू’, ‘कॉमेडीचा जीएसटी’ आणि ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ यामधून प्रेक्षकांच्या समोर आलेली आणि आपल्या कॉमेडीच्या तुफान टायमिंगने आपले फॅन बनवणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता हनमघर (Prajakta Hanamghar). प्राजक्ताने आपल्या डोहाळे जेवणाचे फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. प्राजक्ताने आपल्या विनोदी अंदाजाने आणि विनोदाच्या टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या मनात अगदी कमी वेळात घर केले आहे. त्यामुळे या गोड बातमीमुळे तिचे चाहते आनंदी झाले असून तिच्यावर आनंदाचा वर्षाव करत आहेत. 

अधिक वाचा – प्रतिक्षा संपली, Money Heist चा होणार शेवट

डोहाळे जेवणाचे फोटो 

Instagram

प्राजक्ता हनमघरने आपल्या सोशल मीडियावर आपल्या डोहाळे जेवणाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. यानंतर तिच्या इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणी आणि तिच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. प्राजक्ताच्या घरी चिमुकल्याचे आगमन होणार आहे आणि त्यामुळे सर्वांनाच आता आनंद झाला आहे. 2017 मध्ये रजत ढाळे (Rajat Dhale) बरोबर प्राजक्ताने लग्नगाठ बांधली आणि आता तिने आई होण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थातच तिच्यासाठी ही नवी भूमिका ठरणार आहे. कारण हे तिचं पहिलंच बाळंतपण आहे. प्राजक्ताचा नवरा रजत हा मुळचा धुळे इथला असून पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये काम करतो. अफालातून संवादकौशल्य, विनोदाचं टायमिंग आणि आपली अभिनय करण्याची क्षमता यामुळे प्राजक्ताने एक वेगळं स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलं आहे. त्यामुळेच तिला विनोदाची राणी असंही म्हटलं जातं. दरम्यान सध्या प्राजक्ता कोणत्याही कार्यक्रमात का दिसत नाही याचं कारण आता तिच्या चाहत्यांना समजलं आहे. मात्र तिच्या या आनंदात आणि सुखात तिचे चाहतेही सहभागी झाले आहेत. 

अधिक वाचा – नागिन 6′ मध्ये महक चहल आणि रिद्धिमा पंडितची एन्ट्री

ADVERTISEMENT

लवकरच होणार आई 

‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मालिकेतील तिची भूमिका खूपच गाजली होती. तर आता खऱ्या आयुष्यात एक नवी भूमिका पेलण्यासाठी प्राजक्ता तयार झाली आहे. डोहाळे जेवणाच्या या फोटोंमध्ये प्राजक्ता खूपच आनंदी आणि अप्रतिम दिसत आहे. अगदी मराठमोळ्या हिरव्या साडीमध्ये आणि संपूर्ण डोहाळे जेवणाच्या खास पोषाखात तिने फोटो काढून घेतले आहेत. इतकंच नाही तर अगदी पारंपरिक रितीने डोहाळेजेवण करत झोपाळा आणि फुलांच्या माळा हे सर्व अगदी कोडकौतुकाने प्राजक्ताने करून घेतलं आहे आणि तिच्या नवऱ्यानेही तिला फोटोमध्ये तितकीच साथ दिल्याचेदेखील दिसून येत आहे. नुकतेच तिचे डोहाळे जेवण पार पडले असून आता दोनच महिन्यात बाळाची गुड न्यूज मिळणार आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्गही आनंदी झाला आहे. त्यामुळे सध्या प्राजक्ता जरी कोणत्याही कार्यक्रमात दिसत नसली तरीही आता चाहत्यांना अजिबातच चिंता करण्याची गरज नाही. तर अनेकांनी प्राजक्ताला सोशल मीडियावर भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत आणि कमेंट्सचा वर्षावही केला आहे. 

अधिक वाचा – Bigg Boss 15: मराठी स्पर्धकांचा यावर्षी आहे पगडा, प्रेक्षकही खूष

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

01 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT